शुक्रवार, १८ सप्टेंबर, २००९

राजकारण.

नेत्यांनी कोणाचे ऐकावे? हल्ली आजूबाजूला मतलबी लोकांचा वेढा पडलेला असताना जनमानसाकडे पुढार्‍यांचे लक्ष जातच नाही. राजकारणाचा धंदा झाला आहे हे जनता जाणते पण हे जाणणारे ’जाणते’ नेते आहेत कोठे ? निवडणूकींच्या निकालाकडे पाहताना आज - उद्याचे वर्तमानपत्र जपून ठेवून वाचले तर निखळ करमणूकीची खात्री देता येईल.

मतलबी चमच्यांनी सरकारवर दबाव टाकून बरीच धोरणे आपल्याला सुखदायक करून घेतली आहेत. पण आता चमच्यांत देखील फूट पडली आहे- उदा. अनिल वि. मुकेश. अशाने नवी ध्रुवीकरणे जन्मास येऊ शकतात. आज मुख्यत: धार्मिक आणि निधर्मी असे दोनच गट असावे असे कॉंग्रेसला सोयीने वाटत होते ते संपेल. खरे म्हणजे हे धर्माधिष्ठीत ध्रुवीकरणच देशाला तारू शकते पण हे त्तथाकथित धार्मिक पक्षाच्याच नजरेत येत नसल्या मुळे पंचाईत होतेय.

मला वाटते या सर्व लोकांना धडा शिकविण्याची एक संधी येत्या निवडणूकीत आपल्याला मिळणार आहे. त्या वेळी पक्षाला मत न देता आपल्या विभागातील एखाद्या चांगले काम करणार्‍या उमेदवारास द्यावे हे उत्तम.
- Namdev Bamane