मंगळवार, १८ सप्टेंबर, २०१२

सोमवार, १७ सप्टेंबर, २०१२

मंगळवार, ११ सप्टेंबर, २०१२

सांस्कृतिक गणेशोत्सव हरवतोय.

गणेशोत्सव सुरू झाला , वाढत गेला , विस्तारत गेला ,सातासमुद्रापलीकडे गेला . पण , आज तो नेमका कुठेआहे , हे तपासून पाहण्याची वेळ आली आहे .गणेशोत्सवाची ' संस्कृती ' झपाट्याने बदलते आहेआणि त्याबरोबर सांस्कृतिक गणेशोत्सव हरवतचालला आहे . याची दखल आपण घेणार का ? आठवणीतल्या गणेशोत्सवाबदद्ल विचारले असताघरातल्या आणि गावातल्या गणेशोत्सवाबद्दल आजहीलोक भरभरून बोलतात . पण असं भरभरून बोलणारेलोक आज आजोबांच्या वयोगटातले आहेत आणित्यामुळेच त्यांच्याकडे सांगण्यासारखे बरेच आहे .कारण त्यांच्या काळात गणेशोत्सव सांस्कृतिकदृष्ट्या श्रीमंत होते . आताचा गणेशोत्सवआर्थिकदृष्ट्या ' श्रीमंत ' झाला आहे . पण , त्यातील सांस्कृतिक वातावरण वेगाने घसरत चालले आहे. संस्कृती , सांस्कृतिक या शब्दांचा अर्थ इथे केवळ टिपिकल सांस्कृतिक कार्यक्रमांपुरता मर्यादित नाही. दिवसभर मोठ्या आवाजात रेकॉर्डस लावल्याने आणि एक महापूजा घातल्याने सांस्कृतिक कार्यक्रमझाले असे वाटत असेल तर आपल्या समजुतीत नक्कीच काहीतरी गडबड आहे . पूर्वी जे कार्यक्रमव्हायचे त्यात सांगितिक , साहित्यिक तसेच नाटक - सिनेमांची मेजवानी असायची . महिलांसाठीअन्नकोट स्पर्धा व्हायच्या . ' सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी गणेशोत्सवाचे स्टेज हे एक महत्त्वाचेव्यासपीठ मानले जायचे . या व्यासपीठाने अनेक कलाकारही घडवले आहेत . भजनांपासून ते थोरा -मोठ्यांच्या व्याख्यानांपर्यंत आणि सिनेमांपासून ते स्पर्धांपर्यंत असं सर्वासाठी सर्वकाही या उत्सवातअसायचे . यातून कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे टिळकांचा हेतू साध्य होत होता .' असेवांद्र्यातील कला शिक्षक सुरेंद्र बागुल यांनी सांगितले . गल्लीतला , वाडीतला गणेशोत्सवही ' घरचा ' होऊन जायचा . पण काळ बदलला , माणसं बदललीआणि मूळ हेतूपासूनच आपण फारकत घेतली . त्या उत्सवामागच्या मूळ हेतूच्या जवळपासहीआजचा गणेशोत्सव जात नाही हे खेदाने लक्षात आणून द्यावेसे वाटते . उत्सवाचे स्वरूप ठरवण्याचेस्वातंत्र्य असले तरी ते काम आज मनोभावे होताना दिसत नाही . आपल्या गणपतीची आरतीकरायला कोणत्या हिरॉइनला बोलवायचे या विषयावर मिटींग्जमध्ये चर्चा झडतात . पण तेच एखाद्यागरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या शिक्षणाचा खर्च मंडळाने उचलायचा विषय निघाला तरत्याला अनेक फाटे फोडले जातात . गणेशोत्सवाच्या निमित्ताने लोक एकत्र येताहेत पण फक्त एकत्रयेतात आणि आल्यासारखे प्रसाद घेऊन निघून जातात . वेगवेगळ्या विचारांची माणसं एकत्र आलीतर वैचारिक देवाणघेवाणीतून पुढील वर्षभरासाठी किंवा किमान अकरा दिवसांमध्ये ध्वनीप्रदूषण ,पाणीप्रदूषण , कचरा होणार नाही असा जरी उपक्रम राबवला तरी बराच फरक पडेल . आजकाल काहीमंडळं असे सामाजिक उपक्रम हाती घेताना दिसतात पण विसर्जनाच्या वेळी सगळा कचरा पाण्यातटाकून अकरा दिवस पाळलेल्या नियमाला मूठमाती देतात , असे निरीक्षण पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्याउमा बोरसे यांनी नोंदवले . गणेशोत्सवाच्या काळात कायदे , नियम मोडण्याकडे कल असू नये असेविघ्नहर्ता गणेश मंडळाचे राजन बेळेकर सांगतात . तर नियमात राहूनही उत्सव तितक्याच उत्साहानेसाजरा करता येऊ शकतो असा अनुभव राजेंद्र वाडी गणेश मंडळाचे हिर्लेकर बंधू सांगतात . गणेशोत्सवाच्या काळात कोणते सांस्कृतिक कार्यक्रम सादर व्हावेत यावर आता बैठका होणे जवळपासबंदच झाले आहेत . एक कारण असे सांगितले जाते की , कार्यक्रमांमध्ये दर्जा राहिलेला नाही ,मनोरंजनाची साधने वाढल्यामुळे अशा कार्यक्रमांना लोक येत नाहीत . आणि तिसरे कारण म्हणजेकलाकार मंडळी अवाच्या सव्वा पैसे मागतात अशी तक्रार मुंबईतील काही मंडळांनी केली आहे . हीतीन्ही कारणे खरी धरून चाललो तरी , या कारणांमध्येच त्याची उत्तरेही दडलेली आहेत . दर्जेदारकार्यक्रम स्थानिक कलाकार बसवू शकतात , कार्यक्रमात वैविध्य आणून प्रेक्षकांना आकर्षित करतायेऊ शकते . कलाकार जर स्थानिक असतील तर आपल्या मुला - बाळांनी , मित्र - मैत्रिणींनी बसवलेलेकार्यक्रम पाहायला प्रेक्षक नक्कीच जातील . वरील दोन गोष्टींचा विचार केला तर तिसरा पैशाचा प्रश्नहीआपोआपच सुटेल . त्यामुळे वरील तीन कारणे ही मंडळांची समस्या असेल तर त्या समस्येतूनचनवी संधी , नव्या वाटा गवसू शकतात . तो ही सांस्कृतिक कार्यक्रमांचाच एक भाग असेल . सेलिब्रेटीकाय फक्त रुपेरी पडद्यावरच असतात का ? आपल्या आजूबाजूला अशी अनेक माणसे असतात ज्यांनासेलिब्रेटी स्टेटस नसतो पण तरीही त्यांनी केलेले काम हे वंदनीय असते . मग अशा माणसांना यादिवसात बोलावले तर ? आत्ताच्या टेक्नोसॅव्ही होत चाललेल्या पिढीला गणेशोत्सवातील स्टेजवरलाइव्ह परफॉर्मन्स सादर करण्याची संधी दिली तर ? शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्याची प्रथा आजही कायम आहे , ही एक चांगली बाबम्हणायला हवी . वर्षभरात शाळांपासून ते टीव्ही वाहिन्यांपर्यंत कुठल्या ना कुठल्या स्पर्धा होतअसतातच . तरीही गणेशोत्सवातील स्पर्धांना प्रतिसाद मिळतोच आहे . तीच गत इतर सांस्कृतिक ,शैक्षणिक उपक्रमांची . हा सगळा खटाटोप करण्यामागे हेतू हा की बंद होत चाललेले गणेशोत्सवातीलव्यासपीठ स्थानिक कलाकारांनी , प्रेक्षकांनी दरवर्षी गजबजते राहिले पाहिजे . सामाजिक भान ठेवूया ... आज आर्थिक दृष्ट्या मंडळांचे बजेट कोट्यवधींच्या घरात गेलेले आहे . गणपती मंडळांकडे पैशाचाओघ वाहतो आहे . आपला खर्च निघून उरलेल्या रकमेचा काही भाग अनाथ - निराधार मुलांसाठी ,वृद्धांसाठी किंवा पैशाअभावी उपचार घेऊ न शकणाऱ्या आणि दुर्धर आजाराने ग्रासलेल्या रुग्णांकडेवळवता येईल . रक्तदान शिबिरांचा उपक्रम स्तुत्य आहे . पण , त्याही पेक्षा या अकरा दिवसातआपल्या परिसरातील हॉस्पिटलांमध्ये कोणत्या दिवशी रक्ताची गरज भासू शकते याचा अंदाज घेतलातर तेथे थेट रुग्णापर्यंत जाऊन मदत करता येईल . त्याच्याही पुढे जाऊन आपल्या नगरातील किंवासोसायट्यांमधील तुम्हाला माहिती असलेल्या गरजू लोकांना विशेषतः एकाकी पडलेल्या वृद्धांना मदतमिळवून देता येईल . विसर्जनाच्या दिवशी कृत्रिम तलावांची निर्मिती करून समुद्रातील प्रदूषण टाळतायेईल . गणेशोत्सवाच्या काळातील उपक्रम हितकारक ठरले तर आजच्या नव्या पिढीकडे उद्यासांगण्यासारखे काहीतरी असेल . नाही तर अकरा दिवस नुसता ‌ ध ‌ िंगाणा घालायचा , अकराव्यादिवशी मूर्तीला पाण्यात ढकलून इकडे स्वतःला मद्याच्या पेल्यात ढकलून द्यायचे याला आम्हीगणेशोत्सव साजरा केला म्हणणार असू तर उद्या आमच्या मुलांकडे गणेशोत्सवाबद्दल सांगण्यासारखेकाहीच असणार नाही .