बुधवार, २८ एप्रिल, २०१०

आयुष्यात प्रेम करायचय मला ...

दूर कुठेतरी समुद्रकिनारीहातात हात घालुन बसायचय मला,
आकाशातील तारकांकडे बघतानाभविष्याचे हितगुज करायचय मला,
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

माझ्या मांडीत डोक ठेऊनतिला झोपी गेलेल पहायचय मला,
तिच्या शांत चेहेऱ्याकडे पहातानास्वतःशी स्मित करायचय मला,
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

तिच्यासोबत थोड दुष्टपणे वागुनतिला रागाने लालबुंद करायचय मला,
तिची आसवें पुसता पुसता पटकन मिठीत घ्यायचय तिला,
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

आयुष्यातील तिचा हिमालयतिच्या बरोबरीने चढायचाय मला,
शिखरावर पोहोचताना माझ्या सोबतीच आनंदतिच्या डोळ्यातुन व्यक्त झालेला अनुभवायचाय मला,
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

ति माझ्यापासुन दुर जात असताना विरहाच्या कल्पनेने खिन्न व्हायचय मला,
ति नसल्यामुळे होणाऱ्या वेदनांनाडोळ्यावाटे मुक्त करायचय मला,
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

तिच्यसोबतचे माझे आयुष्यझऱ्याप्रमाणे अवखळ जगायचय मला,
पुन्हा जन्मेन तर जिच्यासाठीतिचा चेहेरा पहात जायचय मला,
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

This poem is very close to my heart... and hope it touches yours too

असा हा आजचा महाराष्ट्र.

असा हा आजचा महाराष्ट्र

* 35 दिवसांत सुमारे 70 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या
* सुमारे 21 हजार गावांचे घसे पडले कोरडे
* भारनियमनाचा हंगाम सुरूच राहणार
* महाराष्ट्राच्या डोक्‍यावर एक लाख 80 हजार कोटींचे कर्ज
* रोजगारनिर्मितीला नाही वेग, अनेक उद्योग जाताहेत महाराष्ट्राबाहेर.
* मुंबईसह ठिकठिकाणी मराठी शाळा बंद होताहेत.

राजकीय अजेंड्यावर...
* मराठी-अमराठी वाद
* चित्रपटाचे राजकारण
* परवान्याचे राजकारण
* जुन्या वादाची नव्याने धुणी-भांडी
* प्रतीकात्मक आंदोलने

कशी समजणार यांना महागाई
लोकप्रतिनिधींना महागाई लवकर का कळत नाही त्याचे हे एक कारण. प्रत्येक खासदाराला मिळणाऱ्या पुढील सवलती पाहा...
* मासिक वेतन 12,000 रुपये
* कामकाजासाठी मासिक खर्च 10,000 रुपये
* कार्यालयीन खर्च 14,000 रुपये
* प्रवासभत्ता (किलोमीटरला आठ रुपयांप्रमाणे) 48,000 रुपये
* अधिवेशन काळात रोज 500 रुपये
* रेल्वेत प्रथम वर्गातून देशभर कुठेही कितीही प्रवास
* विमानात बिझनेस क्‍लासमधून पत्नी किंवा पीए सोबत 40 वेळा मोफत प्रवास
* घरगुती वापरासाठी 50 हजार युनिटपर्यंत वीज मोफत
* स्थानिक संपर्कासाठी एक लाख 70 हजार कॉल मोफत
* कार्यालयासाठी काही अत्यावश्‍यक वस्तू / सुविधा
* प्रत्येक खासदारावर सरकारी तिजोरीतून दरमहा अंदाजे 2.66 लाख आणि वर्षाला 32 लाख रुपये खर्च
* सर्व म्हणजे 534 खासदारांवर वर्षाला सरकारी तिजोरीतले होतात 855 कोटी रुपये खर्च
* मंत्र्यांचा तोरा न्यारा

---सकाळ वृत्तसेवा

Orkut next generation (Marathi)

मंगळवार, २७ एप्रिल, २०१०

Confidence Trust and Hope

I got these definitions in one of the forword, good ones


CONFIDENCE:
Once all village people decided to pray for rain. On the day of
prayer all people gathered and only one boy came with an
umbrella.... ... that's Confidence..


TRUST:
Trust should be like the feeling of a one year old baby when you
throw him in the air, he laughs.....because he knows you will catch
him.... that's Trust..


HOPE:
Every night we go to bed, we have no assurance to get up alive in
the next morning but still we have plans for the coming
day....that's Hope..


KEEP CONFIDENCE !
TRUST OTHERS !!
NEVER LOSE HOPE !!

गुरुवार, १५ एप्रिल, २०१०

नसतेस घरी तू जेंव्हा…

नसतेस घरी तू जेंव्हा
एक पेग ओतला जातो
बर्फाचे पडती तुकडे
अन् सोडा ओतला जातो

पापड दाणे आणून
कबाबही मी करतो
चणाडाळीवरती कांदा
आणि लिंबू मारुनी ठेवतो

येतात टेग दाराशी
आणि घुसूनी जाती आत
खिडकशी टेकून कोणी
सिगरेट ओढण्या बसतो

त्या पार्टीत बडबडणारे
मज दिसती ते बालमित्र
त्यांच्याशीच मैत्री टिकावी
ह्यासाठीच पार्टी करतो

ना अजुनी संपली व्हिस्की
ना हवेत अजुनी गेलो
स्मीरनऑफची बाटली खुणावते
मी स्प्राइट आणायला जातो

तू सांग सखे मज आता
तू परत जशील केंव्हा?
मित्रांचे फोन येतात
आता परत पार्टी केंव्हा??

नसतेस घरी तू जेंव्हा
एक पेग ओतला जातो
बर्फाचे पडती तुकडे
अन् सोडा ओतला जातो………

आई

गॉडस् गिफ्ट!

- शरद पवार

देव आपल्याला दिसत नाही... पण, त्याची अदृष्य शक्ती जाणवते! सामान्यांच्या दुनियेत जन्म घेऊन त्यांच्या


दु:खावर हळुवार फुंकर घालावी, अशी प्रार्थना आभाळातल्या देवाकडे करत असतानाच दैवी सूर उमटले...

ते होते गानकोकिळा लता मंगेशकर यांचे... त्यानंतर देवाच्या काठीचा आवाज ऐकायला आला... तो होता

मास्टर सुनील गावस्कर यांच्या खणखणीत स्ट्रेट ड्राईव्हचा! आणि मग साक्षात देवच दिसला... सचिनच्या रूपात!!

एका साध्या मध्यमवगीर्य कुटुंबात जन्मलेल्या या देवाची पाऊले कृष्णाच्या लिलेसारखी होती... नटखट आणि अवखळ! सचिन जसजसा मोठा होत गेला तसतसा त्याच्यातील अद्भुत शक्तीचा साक्षात्कार होऊ लागला. त्याच्या खेळावर जीव ओवाळून टाकणारे करोडो चाहते आज जगभर पसरलेत. या साऱ्यांचा श्वासच सचिन आहे... गेल्या वीस वर्षांपासून!

..................


विश्वातल्या मान्यवर खेळाडूंचे सारे विक्रम मोडून सचिन जगातला सवोर्त्कृष्ठ फलंदाज ठरला. क्रिकेटच्या दुनियेत त्याने नुकतेच गाठलेले यशाचे शिखर खरोखरच अलौकिक आहे. तमाम भारतीयांची मान गर्वाने उंच व्हावी अशा या लक्षणीय यशाला सलाम करताना सचिनचे अभिनंदन कसे करावे, त्यासाठी नेमके शब्द चटकन सुचत नाहीत. खरंतर मी स्वत: परमेश्वर मानत नाही, तरीही या क्षणी असे म्हणावेसे वाटते की तमाम भारतीयांसाठी सचिन 'गॉडस् गिफ्ट' ठरला आहे!

अर्थात त्याने हे यश मिळवले, ते कोणाच्या मेहेरबानीने नव्हे. लहानपणापासून अत्यंत कष्टाने मैदानावर जी मेहेनत त्याने केली, केवळ क्रिकेटवर सातत्याने लक्ष केंदीत केले, त्यामुळेच हा महान विक्रम तो करू शकला. मुंबई क्रिकेट क्लबचा अध्यक्ष या नात्याने सचिनची अनेक वैशिष्ट्ये जवळून पाहिली. त्यातले सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचे पाय आजही जमिनीवर आहेत! अफाट लोकप्रियता, जागतिक प्रतिष्ठा आणि क्रिकेटचे अनेक सन्मान मिळवल्यानंतरही यशाचा अहंकार त्याला कधी शिवला नाही. वांदे-कुर्ला परिसरात क्रिकेटचे एक नवे स्टेडियम अलिकडेच तयार झाले. सचिन मुंबईत असला की सकाळी तो या स्टेडियमवर दिसणारच. खेळाप्रमाणेच त्याची वेळही इतकी अचूक की स्टेडियमवर सचिनला पाहून सकाळी ९ वाजता आपले घड्याळ चेक करून घ्यावे. दररोज तासभरच्या सरावानंतर मोठेपणाचे सारे मान बाजूला ठेवून सचिन सामान्य मुंबईकरांप्रमाणे लहान खेळाडूंमधे मिसळतो. त्यांना मार्गदर्शन करतो. क्रिकेटवर सचिनची मन:पूर्वक भक्ती असल्याचा हा बोलका पुरावा आहे. क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष असताना प्रकर्षाने जाणवलेल्या आणखी एका गोष्टीचा मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. भारताबाहेर परदेशात जे सामने खेळले जायचे त्यात सचिन, राहुल दविड आणि अनिल कुंबळे हे तीन असे खेळाडू मी पाहिले की जे मैदानातल्या खेळाविषयी गंभीर असायचेच, याखेरीज त्यांच्या वर्तनात कमालीची शालिनता आणि विनम्रता जाणवायची. कोणत्याही प्रसंगाला अत्यंत सभ्यपणे सामोरे जातांना, भारतीय सुसंस्कृतपणाचे दर्शन या तिघांनी जगाला घडवले. क्रिकेटच्या माध्यमातून भारताची प्रतिष्ठा वाढवणारे हे तिघेही माझ्या मते परदेशात देशाचे एका अर्थाने राजदूतच ठरले. विक्रमाचे जे शिखर सचिनने आज काबीज केले. त्यात खेळातले सातत्य, विनम्रता यांचा अर्थातच मोठा वाटा आहे. असे गुण जगात प्रत्येक खेळाडूत नसतात.

त्याचा जन्म क्रिकेटसाठी झाला...

- रमाकांत आचरेकर ,(सचिनचे गुरू व दोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक)

सचिनच्या आंतरराष्ट्रीय कारकीदीर्ला बघता बघता वीस वर्षे झाली, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही... अजूनही तो शाळकरी सचिन मला आठवतो! कुरळ्या केसाचा, कमी उंचीचा. लाजराबुजरा! त्याचा मोठा भाऊ अजित त्याला माझ्याकडे घेऊन आला, तेव्हा एक क्रिकेटप्रेमी पालक आपल्या पाल्याला घेऊन आलाय, असं मला वाटलं. पण, पठ्ठ्याने हातात बॅट घेतल्यानंतर मी चक्रावूनच गेलो... क्रिकेटची देवदत्त देणगी घेऊनच तो जन्माला आलाय, असे स्पष्टपणे दिसले. त्याचा स्टान्स, बॅट पकडण्याची शैली, फ्रंटफूट, बॅकफूटवरचा सफाईदार वापर आणि सर्वात विशेष म्हणजे गोलंदाजांवर हुकुमत गाजवण्याची ताकद.

मला दुसरा अर्जुन सापडला होता : सचिन रमेश तेंडुलकर! कारण माझ्याकडे त्यावेळी आणखी एक अर्जुन होता. विनोद गणपत कांबळी!! विनोदची बॅटिंग भन्नाट होती... त्यालाही देवाने दोन्ही हाताने भरभरून दिले होते. विनोद सचिनपेक्षा खूप मोठा होईल, असे मला त्यावेळी वाटत होते. या डावखुऱ्या फलंदाजाची नजाकत, त्याची आक्रमकता भारी. सचिनपेक्षा एक पाऊल तो पुढे असायचा. पण... नंतर सचिन खूप मोठा मोठा होत असताना विनोदला ती गती राखता आली नाही. एका एकाचा नशिब असतं.

सचिनला बाद करण्यासाठी मी स्टम्पवर नेहमी एक रूपयांचं नाणं ठेवायचो. त्याचा बोल्ड काढणाऱ्याला गोलंदाजाला ते नाणं बक्षीस! पण, सराव संपेपर्यंत बोल्ड काढण्याची करामत कुठल्याच गोलंदाजाला करता यायची नाही आणि नाणं सचिन घेऊन जायचा. अशी असंख्य नाणी त्याच्याकडे जमा झाली असतील... आणि मुख्य म्हणजे आजही त्याने ती जपून ठेवलीत. त्याची सरावाची भूक कधी संपायचीच नाही. एकदा बॅट घेतली की तो तासनतास सराव करत राहायचा. शेवटी आम्हीच कंटाळायचो. त्याच्यातील गुणवत्ता पाहून मी त्याला एका दिवशी दोन, चार सामन्यात खेळवायचो. स्कुटरवर पाठीमागे त्याला बसवला की स्वारी खुश! मग त्याला आधीच्या मैदानावरील कामगिरीपेक्षा सरस खेळ करण्याचा उत्साह यायचा...

वांद्याहून शिवाजी पार्कला सराव व पुन्हा शाळा अशी छोट्या सचिनची धावपळ पाहून अजितला त्याची शाळा बदलण्यास सांगितली. मी शारदाश्रममध्ये असल्याने तो या शाळेत आला असता तर शाळेलाही आणि मला त्याच्यावर आणखी लक्ष करण्यास पुरेसा वेळ मिळाला असता... त्यांच्या घरच्यांनी मला छान प्रतिसाद दिला. शिवाजी पार्कला काकांकडे राहायला आल्यानंतर तर तो क्रिकेटमय होऊन गेला... शाळेनंतर कीर्ती कॉलेजचाही मीच प्रशिक्षक असल्याने आमचं गुरू-शिष्याचं नातं आणखी गहिरं होत गेलं.

उण्यापुऱ्या पाच सहा वर्षात मला त्याचा लळा लागला. परदेश दौऱ्यावर जाताना तो माझा आशीर्वाद घ्यायला घरी येतो तेव्हा त्याचे जमिनीवर असलेले पाय पाहून मी थक्क होतो... एवढा मोठा माणूस होऊनही तो इतका नम्र कसा? असा प्रश्न मात्र मला पडत नाही. कारण ते तेंडुलकर घराण्याच्या संस्कारात आहे. म्हणूनच २० वर्षांनंतरही तो नवनवी शिखरे गाठत जातो तेव्हा मला फारसं आश्चर्य वाटत नाही. सचिन तू आणखी बरीच वर्षे खेळत राहा... माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे.

मोठा माणूस

- राज ठाकरे
शिवाजी पार्कमधील आम्ही सगळे 'अंडरआर्म'वाले... जोरजोरात बॉल टाकणारे. मीही त्यावेळी जोरात बॉल टाकायचो. एकदा आम्ही एमआयजी क्लबवर सचिनसोबत 'अंडरआर्म'ची मॅच घेतली. सचिन टूरवर जाण्याआधी आमची मॅच होती. आधीच रबरी बॉल, त्यात विकेट ओलसर असल्याने तो तुफान वेगात जायचा. अतुल रानडे, सुनील हषेर् अशी सगळी आमची टीम होती. सचिनने त्यावेळी तुफान बॅटिंग केली... दोन-तीन रबरी बॉल फोडूनही टाकले. माझ्या बोलिंगवरही त्याने फोर-सिक्स मारले. माझी बोलिंग त्याने चांगलीच झोडपली तरीही सचिनच्या फोर-सिक्सचेच मला अधिक कौतुक होते.

मॅच संपवून आम्ही नेटबाहेर बसलो होतो. रात्री मी आणि सचिन जेवायला जाणार होतो. आम्ही तसे बऱ्याचदा जेवायला भेटतो. मात्र त्यादिवशी सचिन म्हणाला, 'माझा हात खूप दुखतोय, आजचे रात्रीचे जेवण आपण कॅन्सल करूया. हाताचे दुखणे सहन होत नसल्याने रात्रीचे जेवण आपण एकत्र घेणे मला जमणार नाही.' तो दिवस सचिनच्या 'टेनिस एल्बो'चा होता. पुढे सचिनचा हात फारच दुखायला लागला आणि त्याला 'टेनिस एल्बो'ची शस्त्रक्रिया करावी लागली. यात जवळपास महिना गेला. ऑपरेशन झाले लंडनमध्ये. हॉस्पिटलमधून ज्या दिवशी सचिनला डिस्चार्ज मिळाला तेव्हा योगायोगाने त्यादिवशी मीही लंडनमध्ये होतो. त्यामुळे आमच्या जेवणाचा बेत त्यादिवशी लंडनमध्ये पार पडला. ज्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो होतो, तिथे ब्रम्हदेशाचे फूड फार छान मिळते. जेवताना त्याने मला त्याच्यावरील ऑपरेशनबाबत सगळी बारिकसारिक माहिती सांगितली.

पुरस्कारांपेक्षाही मोठा...

- राज ठाकरे
लतादिदी असो की सचिन तेंडुलकर, ही माणसे कोणताही पुरस्कार मिळण्याआधीच मोठी झाली आहेत. त्यांचे कर्तृत्व हे त्यांना मिळणाऱ्या पुरस्कारापेक्षा मोठे आहे. सचिनला अजून 'भारतरत्न' मिळाला नसला तरी त्याने क्रीडाक्षेत्रात भारतला जो बहुमान दिला आहे त्याच्या जोरावर सर्वसामान्यांच्या मनात तो 'भारतरत्ना'सारखाच आहे. त्याची इतर कोणत्या खेळाडूशी तुलना करायची म्हटले तरी मला ती करता येणार नाही. सर्वच बाबतीत तो सर्वांच्या पुढे आहे.

सचिनमध्ये बरेच गुण आहेत, मात्र कोणत्याही गोष्टीच्या खोलात जाणे हा त्याचा गुण मला सर्वाधिक मोठा वाटतो. घड्याळ असो की कार, ऑडिओ सिस्टिम असो की एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू. तो त्या वस्तूच्या खोलात जातो. त्या वस्तूमध्ये नेमके कोणते पार्टस् आहेत, त्यांचे नेमके कार्य काय याची तो सखोल माहिती करून घेतो आणि समोरच्याला ती देतोही.

सचिनच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा मी त्याला सर्वप्रथम भेटलो. त्यानंतर आजतागायत आम्ही भेटतच आलो आहोत आणि आमच्यात चांगलेच मैत्रीसंबंध आहेत. मुंबईतील त्याच्या मॅचेस मी प्रत्यक्ष पाहिल्या आहेत. एरवी त्या मी टीव्हीवरच बघतो. अत्यंत सरळ, मनमिळावू, विनम्र असा त्याचा स्वभाव आहे. त्यामुळे सहसा त्याच्या नावाला वादविवाद कधी चिकटत नाहीत. त्याच्यावर कधी तोंड उघडण्याची वेळ येत नाही. तो जे बोलतो ते त्याच्या बॅटनेच. तो जेव्हा बॅटिंगला उतरतो आणि तुफान फटकेबाजी करतो तेव्हा माझा काय किंवा प्रत्येकाचाच मूड पालटतो.

सच्चा मित्र!

-अजित आगरकर, कसोटीपटू
आंतराष्ट्रीय कारकिदीर्ची वीस वर्षे... खरंच या पठ्ठ्याचे कौतुक करावं तितकं थोडंच. गेली अनेक वर्ष मी सचिनबरोबर खेळतोय, त्याचा खेळ जवळून पाहण्याची संधी मिळाली. अनेक यादगार खेळी तो खेळलाय. खरंतर मला आवडणारी त्याची एखादी खेळी सांगणं कठीणच! तरीही माझ्या डोळ्यासमोर येते ती शारजामधील ऑस्ट्रेलियाविरुद्धची १४३ धावांची वादळी खेळी. खरं, सांगू त्यावेळी मी संघात असूनही त्याचा खेळ पाहिला नव्हता. पॅव्हेलियनमध्ये बसून सचिन असाच खेळत राहो, अशी प्रार्थना करत होतो. आमचा फायनलमधील प्रवेश त्या सामन्यातील नेट रनरेटवर ठरणार होता. त्यामुळे हृदयाचे ठोके वाढले होते. सचिनच्या अफलातून खेळीने संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. नंतर हायलाईट्समध्ये तो सामना पाहताना सचिनची फलंदाजी मनसोक्त पाहिली. पाच षटकार, नऊ चौकारांसह त्याने १३१ चेंडूत १४३ धावा चोपून काढल्या होत्या. शारजातील त्या खेळीतील प्रत्येक फटका आजही डोळ्यासमोर येतो.

कटू प्रसंगांना तोंड देताना मित्र व संघसहकारी म्हणून सचिन सदैव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. मुंबई संघात पदार्पण केलं तेव्हा संजय मांजरेकर व सचिननेच प्रोत्साहन दिले. त्यामुळे फारसं दडपण आलं नाही. भारतीय संघात माझी निवड झाल्याची बातमी ऐकल्यावर खूप आनंद झाला होता, पण दडपणही आले. खूप अस्वस्थ होतो, चांगली कामगिरी होईल का, हेच विचार सतत मनात येत होते. त्यावेळी सचिनने एक मार्गदर्शक व मित्र म्हणून खांद्यावर हात ठेवून समजावले, अन् मनातली भिती कुठे पळून गेली ते कळलंच नाही.

कठीण प्रसंगात मित्र म्हणून त्याचा जसा पाठिंबा लाभला, तसंच त्याच्या असण्याने ड्रेसिंगरुमचे वातावरण खुलते. समोरचा माणूस दुखावणार नाही, हे लक्षात ठेवून तो छान गंमती-जमती करतो. ज्या खेळाडूंसह त्याने मुंबईचे प्रतिनिधित्व केले, असे त्याच्या पिढीतील फारसे खेळाडू आताच्या संघात नाहीत. नवे चेहरे संघात सामील झालेत. त्यामुळे सचिन मुंबईच्या ड्रेसिंगरुमध्ये असतो, तेव्हा ही सारी नवी पोरं र्नव्हस होतात, पण मनमोकळा स्वभाव व खिलाडूवृत्तीने सचिन ज्युनियर-सीनियर हे अंतर कधी कमी करतो, तेच कळत नाही. हा माणूस म्हणजे जणू सद्गुणांची खाणच! प्रत्येक खेळाडूचा एक आवडता फटका असतो सचिन मात्र प्रत्येक फटका लीलया खेळतो. कार, वॉचेस, म्युझिक त्याला प्रचंड आवडतं, सध्या आयपॉड वैगरेअसल्याने सीडीज, कॅसेट्स घेऊन जाण्याची तारेवरची कसरत त्याला करावी लागत नाही.

गेल्या वीस वर्षांत सचिनच्या स्वभावात बदल झालेला नाही. माणुसकी तो जपतो. तो असाच अनेक वर्ष खेळत राहो, त्याच्या बॅटमधून धावांचा ओघ असाच सुरू राहो... सचिनला माझ्या मनापासून शुभेच्छा.

आजही नम्र, निरागस

- गौतम राजाध्यक्ष, फोटोग्राफर
सचिनचे फोटो पहिल्यांदा काढले ते षट्कार पाक्षिकासाठी. १९९३-९४ च्या सुमारास. सोबत संजय मांजरेकरही होता. तेव्हा कुरळ्या-कुरळ्या केसांचा अबोल, निरागस, गोड सचिन आणि धीट संजय या दोघांच्या व्यक्तिमत्त्वामधला फरक ठळकपणे जाणवला. सचिन आजही तस्साच आहे. दरम्यानच्या काळात एका सोसायटी मॅगझिनसाठी, नंतर अजित तेंडुलकरने लिहिलेल्या 'असा घडला सचिन' पुस्तकाच्या कव्हरसाठी आणि तीन वर्षांपूवीर् माझ्या लेखासाठी त्याचे फोटो काढले. त्या प्रत्येकवेळी त्याच्या चेहऱ्यावरचा कोवळा, निरागस भाव कायम होता. तो हसला की एक हजार वॉटचा बल्ब लावल्यासारखे वाटते. त्यामुळे एवढ्या वर्षांत उन्हात खेळून त्याच्या चेहऱ्यावर एखादी सुरकुती आलीही असेल, पण तो हसला की लहानगा सचिनच वाटतो. अजित त्याला फोटोसाठी घेऊन आला होता, तेव्हा त्याच्या सर्व सूचना सचिन निमूटपणे ऐकत होता. फोटोसाठी मी सांगेन तसे करण्याचा प्रयत्न करत होता. आजही तो तेवढाच आज्ञाधारक आहे. आजही कॅमेऱ्याला तो धीटपणे फेस करू शकत नाही, तो बावरतो. मी त्याला तसे सांगितल्यावर त्याने ते लगेच मान्य केले. जाहिराती, शुटींग ही माझी क्षेत्रे नाहीत, क्रिकेट हे माझे क्षेत्र आहे, असे त्याने नम्रपणे सांगितले. अर्जुनाला जसा केवळ माशाचा डोळा दिसत होता, तसे क्रिकेट हे त्याचे एकमेव लक्ष्य आहे. त्यामुळेच तो एवढी मोठी मजल मारू शकला.

एखाद्या समारंभात तो आला की आवर्जून भेटतो, नमस्कार करतो, नम्रपणे बोलतो. मला त्याने कशाला एवढे महत्त्व द्यायचे? त्याने ओळख दाखवली नाही तरी त्याची गुणवत्ता कमी होणार नाही. पण ग्रेट माणसांमध्ये इथेच फरक असतो. सचिनसारखी ग्रेट माणसे यशानंतर, अनुभवानंतर अधिक नम्र होत जातात.

बुधवार, १४ एप्रिल, २०१०

सोळा हजारात देखणा...


ऑस्ट्रेलिया सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारताच्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वन डे सामन्यातील १६ हजार धावांचा टप्पा गाठला. त्यावेळी वीरेंद्र सेहवाग त्याचे अभिनंदन करताना.

आशीर्वाद बाबांचे...


सचिनला १९९९च्या वर्ल्ड कप सुरू असताना फार मोठी वैयक्तीक हानी झाली. या दरम्यान त्याचे वडील रमेश तेंडुलकर यांचं निधन झालं. या सा-या दुःखातून तो सावरून परतला तर त्याने केनियाच्या विरुद्ध शतक झळकावले.

जीवाचा जीवलग


सचिनच्या हृदयाची चोरी केली ती गुजराती उद्योगपतीची डॉक्टर मुलगी अंजली मेहता हीने. १९९५ मध्ये त्यांचं शुभमंगल झालं. त्या सुखी दाम्पत्याला आता मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन अशी दोन मुलं आहेत.

' डॉन ' चा वारसदार


सर डॉन ब्रॅडमन यांनी आपल्या ड्रिम टीममध्ये सचिन तेंडुलकर याला स्थान दिलं. ब्रॅडमन यांच्या टीममध्ये स्थान प्राप्त करणारा सचिन हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. सचिनच्या खेळात मी स्वतःला पाहतो, असं ब्रॅडमन यांनी कबूल केलं होतं.

गोलंदाजांचा कर्दनकाळ


९०च्या दशकात सचिनचे करिअरला बहार आला होता. सचिन समोर असणार हा विचार सुद्धा गोलंदाजांना विचलीत करायचा. सचिनने चांगले झोडपल्यानंतर महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याने कबूल केले की सचिन तेंडुलकर स्वप्नातही येऊन आपल्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतात.

रचला धावांचा डोंगर


कसोटी क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी सुरू होती. पण वन डेमध्ये अजूनही शतक करता आले नव्हते. प्रशंसकांना आणि क्रिकेट प्रेमींना माहित होते की अनुभवच माणसाला परिपक्व बनतो. त्यानुसार ७९ सामन्यानंतर सचिनने वनडेत पहिलं शतक झळकावलं. त्यानंतर वन डे सामन्यात सर्वाधिक शतके झळकवण्याचा विक्रम त्याच्याच नावावर आहे.

अधिराज्याला सुरूवात


पाकिस्तानच्या पहिल्या दौ-यानंतर सचिनने मागे वळून पाहिलं नाही. १९९१-९२ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या पर्थसारख्या उसळत्या खेळपट्टीवर शानदार शतक झळकावत स्वतःला सिध्द केलं. सचिनची तडाखेबंद फलंदाजी ९२ च्या वर्ल्ड कपमध्येही प्रत्ययाला आली.

मैं खेलेगा!


सचिनने १९८९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरची सुरूवात केली. १६ वर्षीय सचिनच्या समोर इम्रान खान, वसीम अक्रम आणि अब्दुल कादीर सारखे खतरनाक गोलंदाज होते. याच दौ-यात सचिनला एका सामन्यात बॉल लागल्यानंतर रक्त वाहू लागलं. तर दुस-या बाजूला उभ्या असलेल्या नवज्योतसिंग सिध्दूने विचारलं पॅवेलियन जाणार का तर त्यावेळेस सचिन म्हणाला ‘ मैं खेलेगा ’

निरागसते मागचे तूफान


मुंबईतील शारदाश्रम विद्यामंदीरात प्रशिक्षक रमाकांत आचरेकरांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटची सुरूवात केली. त्याने विनोद कांबळीच्या साथीने १९८८-८९ मध्ये एका सामन्यात ६६४ धावांची भागीदारीचा विक्रम केला होता.

बाळाचे पाय पाळण्यातचं दिसतात


हा आपला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. आश्चर्य वाटलं असेल ना ? २४ एप्रिल १९७३ मध्ये जन्माला आलेल्या या चिंटुकल्याकडे पाहून कोणाला अंदाज तरी आला असेल का की हा मोठा होऊन क्रिकेटच्या दुनियेतील बेताज बादशहा बनणार.

'सरां'चं प्रतिबिंब


सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी माझी तुलना होऊच शकत नाही, असं सचिन प्रांजळपणे म्हणत असला तरी, ‘सचिनमध्ये मला माझं प्रतिबिंब दिसलं’, अशी दाद खुद्द सरांनी सचिनला दिली आहे. ऑस्ट्रेलिया दौ-यावर असताना सचिनला त्यांनी आपली बॅटही भेट दिली होती.

सच्चा सचिन


परदेश दौ-यावर उत्कृष्ट कामगिरीबद्दल सचिनला शॅम्पेनची बाटली पुरस्कार म्हणून देण्यात आली. आपल्या बॅगतली ती बाटली सचिननं प्रामाणिकपणे विमानतळावरच्या अधिका-यांना दाखवली आणि त्यांच्या परवानगीनंतरच तो ती घेऊन गेला.

मोठ्यांचा छोटा दोस्त


बहारदार खेळी करणारा सचिन सगळ्याच थोरा-मोठ्यांचा छोटा मित्र होता. रिचर्ड हॅडलींसारख्या गोलंदाजानंही सचिनचं भरभरून कौतुक केलंय. आज सचिन सगळ्या तरुण खेळाडूंचा मोठा मित्र आहे. गॉड, गाइड, फिलॉसॉफर असंच त्याचं वर्णन प्रत्येक संघसहकारी करतो.

मानाचा मुकूट!


सचिनला आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. पण आपल्या महाराष्ट्रानं दिलेला शिवछत्रपती पुरस्कार त्याला आजही मोलाचा वाटतो. त्याच्यातली प्रतिभा हेरून कारकिर्दीच्या सुरुवातीलाच त्याला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा विश्वास सचिननं सार्थ ठरवला आहे.

विक्रमवीर!


शतकी खेळी केल्यानंतर बॅट उंचावून अभिवादन करताना 'बालसचिन'.. इथून सुरू झालेली ही परंपरा आज १९ वर्षांनंतरही सुरूच आहे. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधली शतकं, द्विशतकं मोजली तरी सचिननं आत्तापर्यंत जवळपास १०० वेळा असं अभिवादन केलंय.

खणखणीत...


सचिनच्या प्रत्येक फटक्यात एक नजाकत असते. बॉलचा अचूक वेध, फूटवर्क, टायमिंग आणि ताकद याचा सुरेख मिलाफ होतो आणि त्याच्या बॅटमधून एक अफलातून फटका निघतो.. त्याची हीच अदा अनेकांना फिदा करते.

सचिन आणि संजय


दिवसभराचा खेळ संपवून, प्रतिस्पर्ध्यांना पिदवून सचिन आणि संजय मांजरेकर समाधानानं पेव्हेलियनकडे परतताना...

दोस्ताना


सचिन आणि कांबळीची शाळेपासून जमलेली दोस्ती आजही कायम आहे. आज ते मैदानात एकत्र नसले तरी वेळात वेळ काढून एकमेकांना भेटतात आणि धम्माल करतात.

अभेद्य


शाळेत असताना सचिन-विनोद जोडीनं रचलेली २०० धावांची भागीदारी चांगलीच प्रसिद्ध आहे. त्याची पुनरावृत्ती अनेकदा झाली.

त्रिकूट!


संजय मांजरेकर, विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर या तीन मित्रांनी अनेक सामने गाजवले. मुंबई संघात हे त्रिकूट असलं की भल्या-भल्यांना धडकी भरायची. त्यातही ‘तेंडल्या’ आणि कांबळीची जोडी जमली की विचारूच नका... बॉलिंग करून करून समोरचे कंटाळायचे आणि हे जीवश्च कंठश्च मित्र त्यांची दमछाक पाहून मजा लुटायचे.

चले चलो..


क्रिकेट खेळायला सचिन कधीही तयार असतो, त्यात जर त्याची बॅटिंग असेल तर मग काय विचारता?

खुन्नस खुन्नस!


शाळेत असताना कुठल्यातरी मॅचमध्ये बहुतेक सचिनला कुणीतरी आउट केलं असावं... त्याच्याकडेच तो निरखून पाहत असणार.. पण सचिनची ही नजर म्हणजे प्रतिस्पर्ध्यांसाठी धोक्याची घंटाच असते. एखाद्या नव्या बॉलरने सचिनला लवकर आउट केलं, तर पुढच्या मॅचमध्ये त्याच्या बॉलिंगची कशी पिसं निघतात, हे वेगळं सांगायची गरज नाही.

पट्टशिष्य


शिवाजी पार्कवर रमाकांत आचरेकर सरांच्या तालमीत सचिन तयार झाला. खरं तर सचिनची बॅट पकडण्याची पद्धत शास्त्रशुद्ध नव्हती, पण सरांनी त्याला त्याच्या स्टाइलमध्ये खेळू दिलं. आज तीच स्टाइल आदर्श मानली जाते. आचरेकर सरांना सचिनचा किती अभिमान वाटत असेल, ते शब्दांत सांगणं कठीणच!

स्ट्रेट ड्राइव...


आत्ताच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौ-यात ब्रेट ली च्या झंझावाती बॉलवर सचिनने खेचलेला स्ट्रेट ड्राइव आठवतोय? सचिनचा तो अविस्मरणीय शॉट आहे. त्याच्यासाठी तो एकच स्ट्रेट ड्राइव अविस्मरणीय असला तरी त्याचा प्रत्येक स्ट्रेट ड्राइव त्याच्या चाहत्यांसाठी अविस्मरणीय आहे. ही त्याचीच तर प्रॅक्टीस नाही ना?

स्मितहास्य


क्रिकेट हे सचिनचं सर्वस्व आहे... त्यामुळे बॅट घेऊन मैदानात उतरला की त्याचा चेहरा खुलतो. आजही इतकंच निखळ हास्य त्याच्या चेह-यावर पाहायला मिळतं.

जादूची 'कांडी'


जादूगाराच्या हातात जशी एक कांडी असते आणि त्यानं तो सगळे चमत्कार करत असतो, तसेच चमत्कार सचिननं त्याच्या या बॅटनं केलेत. ही बॅट त्याच्यासाठी जीव की प्राण आहे.

नजारा अंदर का


या किटमधल्या आतल्या वस्तू फारशा स्पष्ट दिसत नाहीएत. पण त्यातले ग्लोव्हज, कॅप आणि बॅटच्या पिशव्या लक्षात येतात.

ये सचिनका स्टाइल है!


सचिनला अत्यंत टापटीप राहायला आवडतं. टेस्ट मॅचचा पांढरा शर्ट सचिनइतका स्वच्छ कुणाचाच नसतो, हे आपण आत्तापर्यंत ब-याचदा पाहिलंय. पण या पाण्याच्या बाटल्या, हे चकाचक शूच पाहूनही सचिन किती स्वच्छताप्रिय आणि स्टायलिश आहे, हे सहज लक्षात येतं...

श्रद्धाळू सचिन


सचिनचं किट उघडलं की आधी दर्शन घडतं ते गणपतीबाप्पाचं. प्रभादेवीचा सिद्धिविनायक आणि आणखी एक गणपती त्यात विराजमान झालाय. त्याशिवाय साईबाबा आणि सत्य साईबाबांचा फोटोही या किटमध्ये आहे. या फोटोंच्या सगळ्यात वरती देशाचा तिरंगा आहे. ते चित्र आणि शेजारचं छोटंसं चित्र सचिनच्या चिरंजीवांनी काढलंय म्हणे...

मास्टरचं 'मास्टर किट'


हे आहे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं क्रिकेट किट...हा पेटारा म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी आणि सचिनच्या चाहत्यांसाठी अलिबाबाची गुहाच आहे जणू. म्हणूनच सचिन नेट प्रॅक्टिस करत असताना त्याच्या या किटमध्ये काय-काय आहे, ते बघायचा मोह टाळणं शक्यच नव्हतं. सचिन खरोखरच 'मास्टर' माणूस आहे, हे त्याच्या किटवरूनही सहज लक्षात येतं.

या सम हा

भारताची शान आणि महाराष्ट्राची जान असलेल्या विक्रमादित्य सचिन तेंडुलकरचा आगळावेगळा बहुमान लंडनच्या मादाम तुसाँ म्युझियमनं केलाय. अगदी हुबेहूब या मास्टर ब्लास्टरसारखा दिसणारा मेणाचा पुतळा त्यांनी साकारलाय आणि सचिनच्या वाढदिवशी, २४ एप्रिलला तो प्रतिष्ठेच्या मादाम तुसाँमध्ये विराजमान होईल. १३ एप्रिलला मुंबईत दिमाखदार सोहळ्यात या पुतळ्याचं अनावरण झालं. तेव्हा, एकाच वेळी दोन दोन सचिन पाहून सगळेच खुश झाले होते.
























सचिनचे आंतरराष्ट्रीय पदार्पण- १९८९, कराची....

सोळाव्या वर्षी पदार्पणाच्या सामन्यातच इराणी करंडक स्पर्धेत सचिनने शतक झळकावले.

सचिन, रिकी आणि विनोद... शाळेतले हे सवंगडी. रिकी नंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनचा अंपायर बनला.