बुधवार, १४ एप्रिल, २०१०

गोलंदाजांचा कर्दनकाळ


९०च्या दशकात सचिनचे करिअरला बहार आला होता. सचिन समोर असणार हा विचार सुद्धा गोलंदाजांना विचलीत करायचा. सचिनने चांगले झोडपल्यानंतर महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याने कबूल केले की सचिन तेंडुलकर स्वप्नातही येऊन आपल्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतात.

रचला धावांचा डोंगर


कसोटी क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी सुरू होती. पण वन डेमध्ये अजूनही शतक करता आले नव्हते. प्रशंसकांना आणि क्रिकेट प्रेमींना माहित होते की अनुभवच माणसाला परिपक्व बनतो. त्यानुसार ७९ सामन्यानंतर सचिनने वनडेत पहिलं शतक झळकावलं. त्यानंतर वन डे सामन्यात सर्वाधिक शतके झळकवण्याचा विक्रम त्याच्याच नावावर आहे.

अधिराज्याला सुरूवात


पाकिस्तानच्या पहिल्या दौ-यानंतर सचिनने मागे वळून पाहिलं नाही. १९९१-९२ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या पर्थसारख्या उसळत्या खेळपट्टीवर शानदार शतक झळकावत स्वतःला सिध्द केलं. सचिनची तडाखेबंद फलंदाजी ९२ च्या वर्ल्ड कपमध्येही प्रत्ययाला आली.

मैं खेलेगा!


सचिनने १९८९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरची सुरूवात केली. १६ वर्षीय सचिनच्या समोर इम्रान खान, वसीम अक्रम आणि अब्दुल कादीर सारखे खतरनाक गोलंदाज होते. याच दौ-यात सचिनला एका सामन्यात बॉल लागल्यानंतर रक्त वाहू लागलं. तर दुस-या बाजूला उभ्या असलेल्या नवज्योतसिंग सिध्दूने विचारलं पॅवेलियन जाणार का तर त्यावेळेस सचिन म्हणाला ‘ मैं खेलेगा ’

निरागसते मागचे तूफान


मुंबईतील शारदाश्रम विद्यामंदीरात प्रशिक्षक रमाकांत आचरेकरांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटची सुरूवात केली. त्याने विनोद कांबळीच्या साथीने १९८८-८९ मध्ये एका सामन्यात ६६४ धावांची भागीदारीचा विक्रम केला होता.

बाळाचे पाय पाळण्यातचं दिसतात


हा आपला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. आश्चर्य वाटलं असेल ना ? २४ एप्रिल १९७३ मध्ये जन्माला आलेल्या या चिंटुकल्याकडे पाहून कोणाला अंदाज तरी आला असेल का की हा मोठा होऊन क्रिकेटच्या दुनियेतील बेताज बादशहा बनणार.

'सरां'चं प्रतिबिंब


सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी माझी तुलना होऊच शकत नाही, असं सचिन प्रांजळपणे म्हणत असला तरी, ‘सचिनमध्ये मला माझं प्रतिबिंब दिसलं’, अशी दाद खुद्द सरांनी सचिनला दिली आहे. ऑस्ट्रेलिया दौ-यावर असताना सचिनला त्यांनी आपली बॅटही भेट दिली होती.

सच्चा सचिन


परदेश दौ-यावर उत्कृष्ट कामगिरीबद्दल सचिनला शॅम्पेनची बाटली पुरस्कार म्हणून देण्यात आली. आपल्या बॅगतली ती बाटली सचिननं प्रामाणिकपणे विमानतळावरच्या अधिका-यांना दाखवली आणि त्यांच्या परवानगीनंतरच तो ती घेऊन गेला.

मोठ्यांचा छोटा दोस्त


बहारदार खेळी करणारा सचिन सगळ्याच थोरा-मोठ्यांचा छोटा मित्र होता. रिचर्ड हॅडलींसारख्या गोलंदाजानंही सचिनचं भरभरून कौतुक केलंय. आज सचिन सगळ्या तरुण खेळाडूंचा मोठा मित्र आहे. गॉड, गाइड, फिलॉसॉफर असंच त्याचं वर्णन प्रत्येक संघसहकारी करतो.

मानाचा मुकूट!


सचिनला आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. पण आपल्या महाराष्ट्रानं दिलेला शिवछत्रपती पुरस्कार त्याला आजही मोलाचा वाटतो. त्याच्यातली प्रतिभा हेरून कारकिर्दीच्या सुरुवातीलाच त्याला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा विश्वास सचिननं सार्थ ठरवला आहे.

विक्रमवीर!


शतकी खेळी केल्यानंतर बॅट उंचावून अभिवादन करताना 'बालसचिन'.. इथून सुरू झालेली ही परंपरा आज १९ वर्षांनंतरही सुरूच आहे. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधली शतकं, द्विशतकं मोजली तरी सचिननं आत्तापर्यंत जवळपास १०० वेळा असं अभिवादन केलंय.

खणखणीत...


सचिनच्या प्रत्येक फटक्यात एक नजाकत असते. बॉलचा अचूक वेध, फूटवर्क, टायमिंग आणि ताकद याचा सुरेख मिलाफ होतो आणि त्याच्या बॅटमधून एक अफलातून फटका निघतो.. त्याची हीच अदा अनेकांना फिदा करते.

सचिन आणि संजय


दिवसभराचा खेळ संपवून, प्रतिस्पर्ध्यांना पिदवून सचिन आणि संजय मांजरेकर समाधानानं पेव्हेलियनकडे परतताना...

दोस्ताना


सचिन आणि कांबळीची शाळेपासून जमलेली दोस्ती आजही कायम आहे. आज ते मैदानात एकत्र नसले तरी वेळात वेळ काढून एकमेकांना भेटतात आणि धम्माल करतात.

अभेद्य


शाळेत असताना सचिन-विनोद जोडीनं रचलेली २०० धावांची भागीदारी चांगलीच प्रसिद्ध आहे. त्याची पुनरावृत्ती अनेकदा झाली.