सोमवार, २१ जून, २०१०

दर पार्टीच्या शेवटी एक क्वार्टर कमी पडते.

दारु काय गोष्ट आहे
मला अजुन कळली नाही
कारण प्रत्येक पिणारा म्हणतो
मला काहीच चढली नाही


सर्व सुरळीत सुरु असताना
लास्ट पेग पाशी गाडी अडते

आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते...


पिण्याचा प्रोग्राम म्हणजे जणु
विचारवंतांची गोलमेज परीषदच भरते
रात्री दिलेला शब्द प्रत्येक व्यक्ती
सकाळच्या आत विसरते


मी इतकीच घेणार असा
प्रत्येकाचा ठरलेला कोटा असतो
पेग बनवणारा त्यदिवशी
जग बनवणार्‍यापेक्षा मोठा असतो


स्वताच्या स्वार्थासाठी
प्यायच्या आग्रहाची फेरी घडते

आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते...


पिण्याचा कार्यक्रम म्हणजे पिणार्‍याला
दरवेळेस नवीन पर्व असते
लोकांना अकँडेमीक्सपेक्षा
पिण्याच्या क्षमतेवर श्रद्धा असते


आपण हीच घेतो म्हणत
ऐकमेकाचे ब्रँडप्रेम जागवतात
वेळ आली आणि पैसा नसला की
देशीवरही तहान् भागवतात


शेवटी काय
दारु दारु असते
कोणतीही चढते...

पण दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते

पिणार्‍यामध्ये प्रेम हा
चर्चेचा पहिला विषय आहे
देवदासचे खरे प्रेम 'पारो की दारु '
याचा मला अजून संशय आहे


प्रत्येक पेग मागे तीची
आठवण दडली असते
हा बाटलीत बुडला असतो
ती चांगल्या घरी पडली असते


तीच्या आठवणीत थर्टीची लेवल
लगेच सिक्स्टीला भिडते...

आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते !


चुकून कधीतरी गंभीर विषयावरही
चर्चा चालतात
सगळे जण मग त्यावर
P.HD. केल्यासारखे बोलतात


प्रत्येकाला वाटते की त्यालाच
यामधले जास्त कळते
ग्लोबल वार्मिंगची चर्चा
गावच्या पोटनिवडणूकीकडे वळते


जसा मुद्दा बदलतो
तशी आवाजाची पातळी वाढते

आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते !

फेकणे, मोठेपणा दाखवणे याबाबतीत्
यांच्यासारखा हात नाही
ऐरवी सिंगल समोसा खाणारा
गोष्टीत पीझ्झाशीवाय् खात नाही


पैशे पैशे काय आहे ते फक्त
खर्च करण्यासाठीच असतात
पेगजवळ झालेली अशी गणिते
सकाळी चहाच्या कटींगपाशी फसतात


रात्री थोडी जास्त झाली
की मग त्याला कळते

पण दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते !

यांच्यामते मद्यपान हा
आयुष्याचा महत्वाचा पार्ट आहे
बीयर पिण्यामागे सायन्स
तर देशी पिण्यामागे आर्ट आहे


यामुळे धीर येतो, ताकद येते
यात वेगळीच मजा असते
आयुष्यभराची मवाळ व्यक्ती
त्या क्षणी राजा असते

दारुमुळे आपल्याला घराच्या
चिवड्याचे महत्व कळते...


परंतु दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते !!!

मंगळवार, ८ जून, २०१०

रोज नवं आव्हान

करिअर निवडीसाठी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शनपर अशा 'महाराष्ट्र टाइम्स एचएससीनंतर काय?' या उपक्रमांतर्गत वाशी इथल्या आयसीएलई या कॉलेजमध्ये
पत्रकारिता क्षेत्रातील करिअर संधींची माहिती देणारं सेमिनार नुकतंच झालं. यावेळी 'महाराष्ट्र टाइम्स'चे वरिष्ठ सहाय्यक संपादक दिवाकर देशपांडे आणि 'स्टार माझा'चे न्यूज अँकर मिलिंद भागवत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.

......

प्रिण्ट मीडिया :

पूर्वी पत्रकारितेला समाजसेवेचं स्वरुप होतं. पण, आता पत्रकारिता एक व्यवसाय झाला आहे. वृत्तपत्र तसंच नियतकालिकांच्या वाढत्या संख्येमुळे या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत.

आवश्यक कौशल्य :

विद्यार्थ्यांनी अंगी असलेल्या गुणांचा वापर करिअर घडवण्यासाठी केला पाहिजे. भाषेची, लिखाणाची तसंच वाचनाची आवड असेल, तर तुम्ही पत्रकारिता क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करू शकता. प्रिण्ट जर्नलिझममध्ये (वृत्तपत्र, मासिकं, नियतकालिकं) संपादकीय आणि तांत्रिक असे दोन विभाग असतात. संपादक, उपसंपादक, वार्ताहर, छायाचित्रकार अशी कामाची वर्गवारी यात असते.

या क्षेत्रात काम करताना उत्तम निरीक्षणशक्ती, अचूकता, भाषेची जाण यासारखे गुण अंगी असावे लागतात. यासाठी वाचन सगळ्यात महत्त्वाचं असतं. भाषा आणि विचार करण्याची क्षमता वाढवण्यासाठी वेगवेगळ्या विषयांवरील वाचन करावं लागतं. संपादकीय विभागाबरोबरच तांत्रिक विभागाचं कामही जबाबदारीचं असतं. पेपरचा खप, डिझायनिंग, फोटो प्रोसेसिंगसारखी तितकीच महत्त्वाची कामं इथे करावी लागतात. त्याचबरोबर आपल्या इण्डस्ट्रीची माहिती असावी लागते.

संधी :

पत्रकारिता फक्त वृत्तपत्रांमध्ये नसून वेगवेगळ्या मासिकांसाठीही करता येऊ शकते. मराठी भाषेमध्ये अनेक साप्ताहिकं तसंच नियतकालिकं निघतात. स्पर्धा वाढल्यामुळे मासिकांसाठी काम करताना चांगला पगारही मिळतो. फ्री लान्सिंग पद्धतीने एकाच वेळी वेगवेगळ्या वृत्तपत्रांसाठी तसंच मासिकांसाठी लिखाणाचं काम करता येतं. केवळ ग्लॅमर म्हणून या क्षेत्रात येण्याची इच्छा ठेवू नका. मेहनत करण्याची तयारी असेल तरच पत्रकारितेचा विचार करा.

इलेक्ट्रॉनिक मिडिया :

गेल्या काही वर्षांमध्ये न्यूज चॅनेल्सच्या वाढत्या संख्येमुळे इलेक्ट्रॉनिक जर्नलिझममध्ये करिअरच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. या ग्लॅमरस क्षेत्राकडे अनेक मुलं-मुली आकषिर्त होत आहेत. पण, इथे प्रचंड संघर्ष आणि मेहनत आहे हेही तितकंच खरं आहे.

इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे घड्याळाशी स्पर्धा असते. सतत एकसारख्याच उत्साहाने बोलता आलं पाहिजे. यासाठी अनेक विषयांचा अभ्यास आणि प्रभावीपणे बोलण्याचा सराव गरजेचा असतो. न्यूज अँकरिंगसाठी विविध क्षेत्रांतील मूलभूत माहिती असावी लागते. शुद्ध भाषा आणि स्पष्ट शब्दोच्चार हे न्यूज अँकरिंगसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. समोर स्क्रीनवर बातमी दिसत असली, तरी ती वाचायची नसते तर सांगायची असते. त्यामुळे गोष्टीसारखी (स्टोरी टेलिंग) बातमी सांगता आली पाहिजे. रिपोटिर्ंगसाठी एखाद्या घटनेचा मागोवा घेणं, सहनशीलता तसंच चौकसपणा अंगी असावा लागतो. बातमीचा गाभा आणि घडलेली घटना कथन करता आली पाहिजे. वृत्तवाहिन्यांमध्ये काम करण्यापूवीर् वृत्तपत्रांमध्ये काम केल्यास हे गुण विकसित होतात.

न्यूज रिपोर्टर तसंच अँकर याव्यतिरिक्त अनेक जागांवर काम करता येतं. कॅमेरामन, व्हिडीओ एडिटर, अॅनिमेटर, व्हिडीओ लायब्ररियन अशा पदांवरही जबाबदारीने काम करावं लागतं. अनेक न्यूज चॅनेल्सची स्वत:ची व्हिज्युअल लायब्ररी असते. ती सांभाळण्यासाठी नीटनेटक्या अशा माणसाची गरज असते. तुमच्याकडे जर व्यवस्थितपणा असेल, तर या पदावर तुम्ही काम करू शकता. अनेक वेळा एखाद्या घटनेचे व्हिज्युअल्स उपलब्ध नसतात. अशा वेळी ग्राफिक्स तयार करण्याचं काम अॅनिमेटरचं असतं. त्यामुळे अॅनिमेशनचं प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठीही न्यूज चॅनेल्समध्ये संधी आहेत. व्हिडीओ शुटिंगनंतर तो एडिट करणं महत्त्वाचं असतं. एडिटिंगची आवड असणाऱ्यांसाठी वृत्तवाहिन्यांमध्ये एडिटरची जागा आहे. शूट केलेला व्हिडीओ कमीत कमी वेळात अचूकपणे एडिट करणं जबाबदारीचं आणि महत्त्वाचं असतं.

जर्नालिझमचं प्रशिक्षण देणाऱ्या संस्था :

बारावीनंतर बीएमएम अभ्यासक्रमाचं शिक्षण विद्याथीर् घेऊ शकतात. त्याचप्रमाणे पदवीनंतर मास्टर्स तसंच डिप्लोमाचे कोसेर्स असणाऱ्या अनेक संस्था आहेत.

पत्रकारिता आणि संज्ञापन विभाग, मुंबई विद्यापीठ

रानडे इन्स्टिट्यूट, पुणे

डिप्लोमा कोर्सेस :

गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अॅण्ड डेव्हलपमेण्ट
झेविअर्स इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्स, झेविअर्स कॉलेज

आई, असं का ग केलंस?

( मनाला स्पर्शून गेलेले आईला लिहिलेले एक पत्र.. )
उरिया भाषेतील लेखक...श्रीकांत पारिजा यांनी एकदा एक हत्या झालेला स्त्री गर्भ पाहिला. त्या क्षणी त्यांचा पोटात ढवळून आलं. काय करावं ते सुचेना. त्यानंतरचे कित्येक दिवस त्यांच्या मनातून ते दृश्य आणि त्या अकाली फेकून दिलेल्या चिमुकलीविषयीचे विचार पुसले जात नव्हते. मग त्यांनी लेखणी उचलली आणि त्या आईलाच एक पत्र लिहिलं......उरिया भाषेत प्रसिद्ध झालेल्या त्या पत्राचा अनुवाद केला आहे कटक येथे राहणाऱ्या "राधा जोगळेकर" यांनी. ( सकाळ च्या सप्तरंग पुरवणीतून आज हे पत्र इथे पोस्ट करतांना फक्त हीच विनंती आहे कि हे पत्र कॉपी करून शक्य तितक्या लोकांपर्यंत email करून पोचवा....
हे वाचून एक जोडप्याचे जरी विचार बदलले तरी "सार्थक" झाले असे मी समजेन.....हे पत्र पोस्ट करायची हि जागा आहे का नाही मला माहित नाही...चुकल्यास क्षमा असावी. आणि पुन्हा एकदा हे पत्र शक्य तितक्या लोकांपर्यंत पोचवा हि विनंती. )


आई, असं का ग केलंस?
का ग, तुला माझी थोडीशीही आठवण येत नाही का? तू असं का केलंस?
मी तुला पाहण्यासाठी किती आशा लावून बसले होते; पण तू मला मारूनच टाकलस.
तुला माहित आहे का आई, मी फक्त तुलाच ओळखत होते. आणखी कोणाचा स्पर्शही नव्हता झाला मला.
माझ्या आयुष्यातल्या त्या चार महिन्यात मी जे काही अनुभवलं, ते फक्त तुझ्याचमुळे ग.
आई तुला आठवत का? माझा भाऊ राजा जेव्हा रडायचा, तेव्हा तू त्याला समजवायचीस, कि रडू नकोस.
आता तुला थोड्याच दिवसात तुझ्याशी खेळायला आणखी एक भाऊ येईल.

तेव्हा मी तुझ्या पोटात खळखळून हसायचे आणि म्हणायचे, 'आई भाऊ नाही.
राजाभाईची छोटी बहिण येणार आहे.

तू राजाभाईला कुशीत घेऊन झोपी जायचीस; पण मला मात्र रात्रभर झोप यायची नाही.
भाईबरोबर दंगामस्ती करण्याची, खेळण्याची मला खूप इच्छा व्हायची. मग पोटात असूनही मी त्याला हळूच पायाने ढकलून द्यायचे. तोही झोपेतून जागा झाल्यावर तुझ्या पोटाला हाताने ढकलत असे. मला लागायचं.
तरीही खूप आनंद व्हायचा. का माहिती आहे? कारण बहिण-भावातल्या खेळाची मजा वेगळीच असते!

कधीतरी भाईला बर नसायचं, तेव्हा तू म्हणायचीस, 'हे माँ, माझ्या मुलांना सुखी ठेव.
ते ऐकून माझ्या लहान लहान डोळ्यात पाणी दाटून येई. वाटे, माझी आई किती चांगली आहे.
मुलांवर तिची किती माया आहे. तुझ्यामुळे मला समजल, कि आणखी एक मोठी आई, "माँ" आहे,
जी माझ्या आईला शक्ती देते. सामर्थ्य देते.

माझे हे चार महिने फक्त तुझा विचार करण्यात गेले. मनात सतत एकाच विचार असायचा, तुला बघण्याचा!
एकदा तू राजाभाईला म्हणत होतीस. माझ्या बाळा तुझ्यासाठी दहा महिने मी त्रास सोसल्यावर तुझा जन्म झाला.
मोठा झालास, की आईचं नाव उज्वल कर, वगैरे वगैरे.....

त्या दिवशी मला रडूच आलं. तू राजाभाईचे लाड करत होतीस म्हणून नाही, तर माझ्या आईला बघण्यासाठी मला अजून
सहा महिने वाट पहावी लागेल म्हणून.....

मग एक दिवशी तू आणि ते पप्पा नावाचे कोणीतरी डॉक्टरांकडे जाण्यासाठी बाहेर पडलात.
रस्त्यांमध्ये असताना मला खूप जोरात धक्का बसला. आतल्या आत बराच मार बसला. मग तू पप्पांना
गाडी हळू हळू चालवायला सांगितलस. बाळाला त्रास होईल म्हणालीस. तुला माझी किती काळजी वाटते,
हे पाहून मला किती बर वाटल होत.

दवाखान्यात तू झोपलीस, तेव्हा मी तुझ्या पोटात खेळत होते. तुझ्या पोटावर काहीतरी लावून डॉक्टर जेव्हा तपासात होते,
तेव्हा मला खोडसाळपण करण्याची खूप इच्छा झाली होती. मी पोटातल्या पोटात पटापट फिरत राहिले. म्हणून डॉक्टर म्हणाले,
"मुल खूप हालचाल करत आहे, त्यामुळे काही समजत नाही."

थोड्या वेळाने ते म्हणाले, की मुलगी आहे. त्यानंतर एकदम शांतता पसरली. मग तो पप्पा नावाचा माणूस म्हणाला,........
"सर, अबोर्शन करा..."
डॉक्टर म्हणाले "उद्या सकाळी या."
मी पोटामध्ये खिदळत होते.

दुसर्या दिवशी सकाळी देवाची पूजा करताना आई तू म्हणालीस, हे माँ, मला नीटपणे जाऊन सुखरूप घरी येऊ दे."

मला वाटल, की तुझी तब्येत बिघडली असावी, मी पण पाणावलेल्या डोळ्यांनी त्या मोठ्या आईला म्हणाले,
की माझ्या आईला लवकर बर कर....

नंतर.....नंतरच तुला माहीतच आहे....

आई, का ग मारलस मला? आई, तुला बघायचं होत ग डोळेभरून.
मी तुला पाहिल्यानंतर मला मारून टाकलं असतस तरी चालल असत मला.
आई मला पुन्हा एकदा तुझ्या गर्भात जागा दे. मला हे जग बघायचं आहे. मलाही शाळेत जायचं आहे.
राजाभाईसारखा " हेप्पी बर्थ डे" करायचा आहे. हसत खिदळत तुझ्यामागे धावायचं आहे.
आई, फक्त एकदाच मला कुशीत घेऊन माझे लाड कर ना ग....आणि फक्त एकदाच माझ्या कानाशी म्हण....
'झोप ग माझ्या लाडक्या बाळा, तुझी आई आहे ना जवळ...मग कशाला घाबरतेस....'
............ ....आई एकदाच...........फक्त एकदाच.........
------

"मी तुझ्याबरोबर खेळतो
तेच मुळी हरण्यासाठी
तुझ्या गालावरल्या खळीत
हसु भरण्यासाठी...!!!! "