बुधवार, २१ ऑगस्ट, २०१३

गणपती बाप्पा मोरया.


| आवर्जून वाचाच | खास तरुणांसाठी | सदर मचकूर कुणाच्या भावना दुखाव्या या हेतूने लिहिला नसून आपण आपल्या भावनांना आवर घालून बुद्धीच्या जोरावर जग जिंकावे आणि वैचारिक गुलामीतून बाहेर पडावे यासाठी लिहीत आहे.

आपल्या कडू, गोड, आंबट, तिखट, तुरट सर्व प्रतिक्रियांचा स्वीकार केल्या जाईल, आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. आपण गणपतीच्या कालाय एक घोषणा नेहमी ऐकतो - 'गणपती बाप्पा मोरया' आज सहज कॉलेज मध्ये असताना ही घोषणा ऐकली आणि लिहावे वाटले. मला एक गोष्ट कळत नाही, एखाद्या व्यक्तीला जर त्याच्या वेगवेगळ्या नावाने हाक मारली तर ती घोषणा होऊ शकते काय ?

प्रत्येकाला अनेक नावे असतातच.. घरचे नाव, शाळेतले, मित्रांमधले..... पण आपण कधी त्याला हाक मारताना असं म्हणतो का ? - काय रे सोन्या, मोन्या, चिंटू, बंडू, बबलू, दादा, भैया...... काय चालले आहे ? नाही ना ? कोणत्या तरी एकाच नावाने हाक मारतो.. बरोबर ना ?

मग गणपती, विघ्नेश्वर, मंगलमूर्ती, बाप्पा, मोरया.... हो सर्व गणपती ला दिलेली नावेच आहेत ना ? मग 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया' ही घोषणा कसकाय होऊ शकते ? ती तर गणपतीची विविध नावे आहेत ? मग घोषणा म्हणून का वापरायचे ? कुणी म्हणेल कि देवाचे आहे, काही बोलायचे नाही, पाप लागते... नाही विषय देवाचा नाही.. विषय तुमच्या मनावर आणि बुद्धीवर असणाऱ्या गुलामीचा आहे. वैचारिक गुलामीचा... परीक्षेच्या वेळेस कुत्र्यागत अभ्यासाच्या मागे लागणारे गुलाम एव्हड्या छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा कधी विचार करत नाही. कारण एकाच आम्हाला कुणी सांगितलेच नाही, कधी विचार करायचा असतो, कशावर चिंतन करायचे असते आणि चिकित्सा तर कशासोबत खातात हेच आजकालच्या तरुणांना माहिती नाहीये.

खरतर 'गणपती' या शब्दाचा अर्थ असा आहे- गण म्हणजे फौज, किंवा ग्रुप.. आणि त्याचा नायक.. त्याचा अधिपती म्हणजे गणपती.. इतिहासात कधी काळी माणूस म्हणून लढाया झाल्या असतील. त्याला तुम्ही आम्ही देव म्हणून पुजायला लागलो. आणि एकदाका माणूस देव झाला कि त्याच सगळ कर्तुत्व संपत असतं. म्हणून मनुवादी लोक तुमच्या सगळ्या महापुरुषांना देव करण्याचा अट्टहास करतात. मग अगदी शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा देव करण्याचे प्रयत्न झाले. त्यांना कुणाचे ना कुणाचे अवतार ठरविण्याचा प्रयत्न झाला. अजूनही होत आहे. देव आणि अवतार न मानणाऱ्या गौतम बुद्धांनाही देवाचा ९ वा अवतार ठरविण्यात आले.

असे का व्हावे ? कोण करत हे सगळ ? कशासाठी करतात ? याचा आपण विचार केला पाहिजे. भारतातील मनुवादी लोक, विषेत: बामन मंडळी हा प्रकार करताना दिसतात. त्यांनी असे का करावे ? याचे मुख्य कारण म्हणजे देव आणि मंदिर आणि त्यातून मिळणारा पैसा हा त्यांचा मुख्य धंदा आहे. त्यांची रोजगार हमी (business without income tax) आहे. आणि मुख्य म्हणजे मनुवाद्यांना वैचारिक गुलामगिरी तुमच्यात लादायची आहे. आणि जवळपास भारतात त्यांनी ते साध्य केलेले आहेच. कारण आजच्या पिढीतील तरुण कोणत्याही बाबतीत विचार करायला तयार होतच नाहीये. कोठेही तर्क लावायला तयारच नाहीये. आणि त्यांना आता मी जो मुद्दा घेतला त्या बद्दल बोललं तर म्हणतात कि तुम्ही देवा-धर्माला शिव्या देतात.. आता यात काय आला देव आणि धर्म ? तुम्ही वैचारिक गुलाम आहात हे मान्य करण्या ऐवजी आम्हालाच गालबोट लावता.

यांना कोण बोलणार ? आपल्याला काय सांगितले ? गणपतीचा जन्म कसा झाला ? तर पार्वतीमाता ह्या स्नानासाठी गेल्या होत्या आणि दरवाजा बाहेर security म्हणून त्यांनी त्यांच्या शरीराला असणाऱ्या मळापासून एका मुलाला जन्म दिला. जरा विचार करा असं कधी होते का हो ? आणि मुख्य म्हणजे पार्वतीमातेच्या शरीराला काय एव्हडा मळ होता का ? किती बदनामी आहे पार्वतीमातेची ? एका स्त्रीची किती बदनामी आहे ? असे असून सुद्धा आम्ही कधी आम्हाला ज्यांनी ह्या भाकड कथा सांगितल्या त्यांना कधी प्रश्न विचारले नाही. का नाही विचारले ? कारण तुमच्या डोक्यात भूत घालून दिलेले होते कि देवाचे आहे, असं बोलायचं नसत. देवाची चिकित्सा करायची नसते. पाप लागत. किती दिवस अजून ह्या वैचारिक गुलामीत जगणार आहात ? आणि पार्वतीमातेच्या bathroom ला काय दरवाजा नव्हता का ? काय चालले आहे ? किती बदनामी करतात एका स्त्रीची ? ते सर्व तुम्हाला चालत... पण खर बोलायला गेल कि मग म्हणतात कि आमच्या भावना दुखावतात.. आणि नंतर काय तर म्हणजे महादेव त्या ठिकाणी आले आणि गणपतीने त्यांना अडविले म्हणून मुंडके कापले. का ? शंकराला एव्हडा काय आतताईपणा ? कि पुन्हा कधी भेटच होणार नव्हती ? कि पार्वतीमातेचे स्नान होई पर्यंत वाट बघवत नव्हती ? काही पण काय बाजार मांडला आहे ? किती बदनामी चालू आहे.. आणि तुम्ही-आम्ही ही बदनामी देव-देव-देव ह्या नावाखाली वर्षानुवार्षे सहन करत आहोत. आणि शंकर यांना मग जे मुंडके उडविले तेच का नाही बसविता आले ? हत्तीचेच का बसविले ? आणखी विद्रूप करायला का ? आणखी बदनामी करायला का ? काय चालेल आहे ? आणि तुम्ही सुद्धा हे मुकाट सहन करता कारण तुमच्या-आमच्या डोकात भरलेले आहे. देवाचे आहे काही बोलायचे नाही.. देवाचे आहे, पाप लागत.. देवाचं आहे... अहो तुम्ही वैचारिक गुलाम आहात आधी ती गुलामी दूर करा मग बघू कसकाय भावना दुखावतात ते. आम्ही माणूस नाही का ? आम्हाला भावना नाही का ? आहे ना ? मग तुम्ही आम्ही काय वेगळे आहोत काय ? मग कशाला असली फालतू करणे देता ? जरा विचार करा.. का म्हणून आपण ही गुलामी स्वीकारायची ? उगाच एखाद्या देवाच्या नावाने हाता-पायामध्ये धागे-दोरे बांधायचे.. का म्हणून ? एक दोरी तुमचे रक्षण करणार आहे काय ? दोरी साठी कच्चा माल पुरवितो शेतकरी, त्याला विकतो व्यापारी, विकत घेणारी कंपनी, आवश्यक बदल करणारी कंपनी, त्याला काळा, भगवा रंग देणारे पेंटर आणि परत त्याला बाजारात विकणारा दुकानदार आणि त्याच्यावर जंतर-मंतर-छू करत मंत्र फुकणारा बामन.. हे तो धागा बनवत असताना फक्त आणि फक्त त्यांच्या धंद्याचा विचार करत असतात. कोणत्याही देवाचा किंवा तुमच्या श्रेद्धेचा किंवा ज्या भावनेच्या नावाखाली तुम्ही वैचारिक गुलामी बाळगली आहे ना ? त्याचाही ते विचार करत नसतात ? मग का म्हणून बांधायचे गुलामीचे धागे-दोरे ? कोणत्याही देवाने तुम्हाला स्वतःहून प्रकट होऊन सांगितले का कि माझा अमुक कंपनी ने एक खूप सुंदर धागा बनविला आहे, तेव्हडा बांध.. मी तुझे रक्षण करतो.. असे म्हणाला का कोणता देव ? नाही ना ? मग तुम्हाला हे सर्व कोणी सांगितले ? तर वर दिलेल्या व्यापारी, दुकानदार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बामन लोकांनी... आणि तुम्ही सुद्धा त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, कारण आमच्या डोकात पक्के फिट्ट आहे. देवाच्या बाबतीत काही बोलायचे नाही. यार देवाला असं म्हणू नये ? अरे देवाचं आहे ते त्यात काही शंका घेऊ नये, देव तुला माफ नाही करणार तू असं बोलला तर ? हेच ऐकता ना तुम्ही ? आणि बोलता सुद्धा.. कशासाठी ? दुसरे कोणतेही कारण नाही तुम्ही फक्त आणि फक्त तुम्ही वैचारिक गुलामगिरी enjoy करत आहात.

तुम्हाला फक्त काय चांगल वाटत ? तर एखादा सलमान, शाहरुख समोर असतो.. त्याच्या विरुद्ध ५०-१०० गुंडे असतात.. त्याला मारत असतात आणि मग अचानक कोठून तरी आभाळातून त्याच्या हातात एक locket पडते आणि त्याच्यात ताकद येते आणि तो लगेच सर्वांना मारतो. पण तसले locket बनविणारी कंपनी त्या शाहरुख, सलमान ला किती पैसे देते याचा कधी विचार केला का तुम्ही ? त्यांनी कधी तुमच्या देवांचा आणि तुमच्या भावनांचा विचार केला का ? आणि आम्ही सांगयला गेलो कि आम्हाला बोलतात. सोडून द्या आता हे सगळे प्रकार, गुलामीत किती दिवस जगणार ? जरा स्वतंत्र व्हा.. तुम्ही ज्या जगात राहत आहात ते फक्त आणि फक्त गुलामीचे आणि गुलामांचे जग आहे. आणि ही गुलामी कोठून आली ? तर लहानपानापासून तुम्हाला जे काही भाकड कथा असणारे ग्रंथ आणि पुराने भटजीने घरी येऊन पारायण करून ऐकविले त्यातून... तुम्ही अक्कलशून्यासारखे जे मनुवादी सिनेमा बघतात त्यातून... देवाच्या नावाने जे धंदा करतात त्या मंदिरातून.. आणि तुमच्या अवती भोवती असणाऱ्या गुलाम परिसरातून.. तुम्हाला गुलाम बनविण्यासाठी..

आणि मग सगळ्यात powerful हत्यार कोणते तर ? तुमचे महामानव नाहीतर देव.. आणि त्यांचा धंदा मात्र जोरात चालू... खरतर आपण विचार केला पाहिजे भारतात जे काही सिनेमा बनतात त्यातील बहुतेक देवावर बनतात, त्या वेळेस ते बनविणारे आणि त्यात काम करणारे हे फक्त त्यांच्या धंद्याचे बघत असतात. पण कधी आपल्या महापुरुशांवर जागतिक पातळीवरील सिनेमे बनविले का हो यांनी कधी ? निदान ज्यांच्या मुळे भारताला शिक्षणाची गंगा मिळाली त्या महात्मा फुले यांच्यावर आजवर किती चित्रपट निघायला हवे होते ? किती मालिका असायला हव्या होत्या ? पण नाही. तसे होत नाही.. शिवाजी महाराज ज्यांना संपूर्ण जगणे वंदन केले आहे त्यांच्यावर तरी आजवर एखादा राष्ट्रीय पातळीवर चालेल असा एकतरी खरा चित्रपट निघाला आहे का ? नाही.. कारण त्यामुळे समाज सुधारतो, विचार करतो आणि गुलामीतून मुक्त होतो. पण तसे होण्या ऐवजी उलटेच कारण मनुवाद्यांना तुम्हाला गुलाम करायचे आहे. अहो कितीतरी मंदिरांमध्ये स्त्रियांना प्रवेशच नाही, का ? त्यांना आजही धर्माचे अधिकार नाही, का ? याचे उत्तर सोपे आहे.. स्त्री गुलाम झाली कि कुटुंब गुलाम होते. कुटुंब गुलाम झाले कि समाज आणि मग राष्ट्र गुलाम होते. शेवटचे सांगतो, वैचारिक गुलामांनो, आपली गुलामी enjoy करणे बंद करा. आणि जरा स्वातंत्र्याच्या मार्गावर चालायला लागा. वैचारिक गुलामगिरी झुगारून द्या.

आतापर्यंत झाले ते खूप झाले.. पण या नंतर मात्र आपन गुलाम राहू नका. स्वतंत्र व्हा.. स्वातंत्र व्हा.. हाता-पायात आणि मुख्य म्हणजे तुमच्या मेंदूत असणारे गुलामीचे धागे दोरे काढून टाका..

टीप : हा लेख कुणाला उद्देशून लिहिला नसून वाचकाच्या मनावर आणि बुद्धीवर योग्य प्रकारे बिंबावा अश्याप्रकारे लिहिला आहे. हा लेख वाचल्या नंतर आपण जर खरोखरच आपल्या हात-पाय आणि मेंदू मधील वैचारिक गुलामीचे धागे-दोरे फेकून दिलेले असतील तर मला एक फोन अवश्य करा आणि आपली प्रतिक्रिया द्या.

1 टिप्पणी:

Goynkar म्हणाले...

ते सगळं ठीक आहे हो,पण मुद्दयाचा विषयच विसरलात...मोरया गोसावींच काय?