गुरुवार, २४ मे, २०१२

INDIA's OWN Wax Museum ... Simply OUTSTANDING!


YOU MAY HAVE SEEN BEFORE. Do u think only London and Paris have Wax Museums........Look at this Amazing statues capturing village life in India ... Beat this!! Location -Siddhagiri Museum , Kolhapur… it's on the outskirts of Kolhapur (Maharashtra), on the way to “Belgaum “ ..worth a watch…. all statues are made out of wax.

दाढ़ी आणि शिवाजी


सोमवार, २१ मे, २०१२

देशाची पीछेहाट.


तीन वर्षांत आपण देशाची भरपूर पीछेहाट केली याची जाणीव होऊन उरलेल्या दोन वर्षांत त्याची भरपाई करण्याच्या पश्चात्तापाच्या भावनेने सोनिया गांधींनी ठोस निर्णयांच्या मालिकेद्वारे पावले उचलली तरच रुपयाप्रमाणे देशाचे सर्व आघाडय़ांवर झालेले अवमूल्यन काही प्रमाणात थोपविले जाऊ शकते. २२ मे २००९ रोजी मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेव्हा अमेरिकी डॉलरचा भाव ४७.३० रुपये होता. आज तो ५४.४२ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांकी स्तरावर पोहोचलेल्या रुपयाची तुलना केवळ मनमोहन सिंग सरकारशीच होऊ शकते. या कालखंडात डॉलरच्या तुलनेत रुपया तर पंधरा टक्क्यांनीच गडगडला, पण मनमोहन सिंग सरकारच्या विश्वासार्हतेला शतपटींनी तडे गेले. यूपीए-१च्या तुलनेत देशवासीयांनी भरीव संख्याबळासह काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएच्या हाती केंद्रातील सत्ता सोपविली. पण यूपीएच्या दुसऱ्या अवतारात देशाची वेगवान घोडदौड अपेक्षित असताना तीन वर्षांमध्ये सर्व आघाडय़ांवर अधोगतीचीच नोंद झाली. मनमोहन सिंग सरकारचे हे अवमूल्यन अकस्मात झाले नाही. पुढय़ात काय वाढून ठेवले आहे याची सरकारला पूर्वकल्पना होती. पण २००९ च्या लोकसभा निवडणुकीतील यशाच्या नशेने सरकार तसेच काँग्रेस पक्ष अहंकारी आणि बेधुंद झाले होते. आपले कुणी काहीही बिघडवू शकत नाही, अशा मस्तीत सरकारचे बहुतांश मंत्री वावरत होते. ही अधोगतीची नांदी आहे, याची जाणीव होऊनही मनमोहन सिंग आपल्या सहकाऱ्यांना काबूत ठेवण्यात असमर्थ ठरले होते. २२ मे २०१० रोजी यूपीए-२च्या पहिल्या वर्षपूर्तीची पहाटच मंगलोर विमानतळावर क्रॅशलँडिंगमध्ये १५८ प्रवाशांचा जीव घेणाऱ्या दुबई-मंगलोर एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला झालेल्या भीषण अपघाताच्या वृत्ताने उगविली. हा दुर्दैवी अपघात यूपीए-२ साठी प्रतीकात्मक अशुभ संकेत देणारा ठरला. दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतरच्या पहिल्या वर्षांतच सरकार जवळपास सर्वच गोष्टींवरील नियंत्रण गमावून बसले होते आणि परिस्थिती बेकाबू होत असल्याची कुणाला पर्वाही नव्हती. आर्थिक महाशक्ती बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि १२१ कोटी जनतेला आपल्या बेदरकारपणाचे चटके बसतील, याची चिंता करणे शासनकर्त्यांनी सोडूनच दिले होते. यूपीए-१च्या काळात देशाने जे काही मिळविले ते सारे गमावण्याची स्थिती यूपीए-२ मध्ये ओढवली. ९ टक्क्यांवर पोहोचलेला आर्थिक विकासाचा दर माघारी फिरून सहा टक्क्यांच्या आसपास घुटमळत असतानाही सरकार जागे झाले नाही. यूपीए-१ मध्ये केलेले घोटाळे आणि भ्रष्टाचाराचे भांडे फुटून अनेक मंत्री आणि खासदार तुरुंगात जाण्याची घडी आली तरी सरकारची गुर्मी कायमच राहिली. भ्रष्टाचार झाला नाही, असे दिल्लीतले एकही मंत्रालय उरले नाही. काँग्रेस आणि मित्रपक्षांनी भ्रष्टाचार करण्यात लाज-शरम गुंडाळून ठेवल्याचे पाहून भाजपसह इतर प्रादेशिक पक्षांनीही भ्रष्टाचाराचे विजेतेपदजिंकण्याच्या ईर्षेने इंडियन पॉलिटिकल लीगमध्ये पूर्ण ताकदीनिशी झोकून दिले. तीन वर्षांच्या वाटचालीत मनमोहन सिंग सरकारने देशाला काय दिले, असा प्रश्न कुणी विचारला तर त्याचे उत्तर यातच दडलेले आहे. तीन वर्षांत मनमोहन सिंग सरकारचे आणि देशाचे तीनतेरा वाजले याचे कारण सरकारच्या वाटचालीत निर्णायक भूमिका बजावणाऱ्या मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी आणि पी. चिदंबरम या तीन चेहऱ्यांमध्ये कोणताही समन्वय नव्हता आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या सोनिया गांधींचेही नैतिक बळ संपुष्टात आले होते. काँग्रेसचे उर्वरित केंद्रीय मंत्री सोनियानिष्ठ आणि मनमोहन सिंगनिष्ठ यामध्ये (व्यस्त प्रमाणात का असेना) विभागले गेल्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळातही किमान सामंजस्य किंवा समन्वयाचा प्रश्नच उद्भवत नव्हता. जगाच्या दृष्टीने मनमोहन सिंग प्रख्यात अर्थतज्ज्ञ आणि देशवासीयांच्या दृष्टीने पंतप्रधान असूनही त्यांना स्वत:पेक्षा अनुभवाने ज्येष्ठ असलेले अर्थमंत्री प्रणव मुखर्जीच्या कामकाजात उचित कारणांसाठीही हस्तक्षेप करणे मुश्कील झाले. अर्थ खात्यातच मन अडकून राहिल्यामुळे चिदंबरम यांचे प्रणव मुखर्जीशी सुरू असलेले शीतयुद्ध अनेकदा उफाळून आले आणि ते अजूनही धुमसतच आहे. भगव्या दहशतवादाचा वाक्यप्रयोग प्रचारात आणल्याने चिदंबरम विरुद्ध राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असा संघर्ष पेटला. चिदंबरम यांना आतून विरोध करणारे प्रणव मुखर्जी अचानक भाजपचे लाडके बनले. टू जी स्पेक्ट्रम वितरण घोटाळ्याची आच पंतप्रधानांच्या कार्यालयापर्यंत पोहोचू नये म्हणून हा मामला चिदंबरम आणि अंदिमुथु राजा यांच्यातला होता, असे सांगून मनमोहन सिंग यांनी हात झटकल्याने चिदंबरम यांच्याविरुद्ध झोड उठविण्यासाठी भाजपला २४ तासांचे कॉल सेंटरच उघडण्याची संधी मिळाली. त्यातच बहुतांश ज्येष्ठ मंत्री एकमेकांवर कुरघोडी करण्यात व्यस्त राहिल्यामुळे वर्षभरातच सरकार दिशाहीन झाले आणि अण्णा हजारे-बाबा रामदेव यांच्या आंदोलनामुळे आणखीच भरकटले. सरकार आणि सरकारविरोधक यांच्यात समेट घडवून आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेले ‘ट्रबलशूटर’ प्रणव मुखर्जी यांनी या काळात कोणताही वाद शमविला नाही. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी वस्तू आणि सेवाकर, प्रत्यक्ष कर संहिता, कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील सुधारणा, किरकोळ क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणूक यांसारख्या महत्त्वपूर्ण मुद्दय़ांवर विरोधी पक्षांच्या नेत्यांशी वाटाघाटी करून सहमती घडवून आणण्याऐवजी चर्चेचा घोळ घालत कालापव्यय केला. घोटाळे, भ्रष्टाचार, शासनाच्या आर्थिक गैरव्यवस्थापनामुळे भरडून निघालेल्या देशवासीयांच्या वैफल्याच्या आगीत महागाई रोखण्याच्या नावाखाली १४ वेळा व्याजदरात वाढ करून तेल घालण्याचे काम प्रणव मुखर्जीच्या मार्गदर्शनाखाली रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी चोख बजावले. तरीही महागाई कमी झालीच नाही, उलट सामान्य माणूस कर्जाच्या ओझ्याखाली दबला. सोनिया आणि मनमोहन सिंग यांनी टाकलेल्या जबाबदारीचा फायदा उठवून प्रणव मुखर्जीनी ममता बॅनर्जीचा तृणमूल काँग्रेस वगळता सर्व राजकीय पक्षांमध्ये आपली लोकप्रियता शिगेला पोहोचविली. या तीन वर्षांच्या काळात काँग्रेसचे भाजप आणि अन्य प्रादेशिक पक्षांशी किमान सौहार्दाचेही संबंध उरले नाहीत. कारण कुठल्याही विषयावर राजकीय सहमती घडवून आणण्याचे काम प्रामुख्याने प्रणव मुखर्जी यांचे होते. मनमोहन सिंग यांना स्वत:हून पुढाकार घेण्याची आवश्यकता भासत नव्हती किंवा त्यांना सोनिया गांधींनी मनाई केली असावी. राहुल आणि सोनिया गांधींचे ‘वलय’ इतके गडद आहे की त्यांचा विरोधी पक्षनेत्यांशी सहजासहजी संवाद साधण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. चिदंबरम यांनी अमेरिकेच्या धर्तीवर राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्र स्थापन करण्याची कल्पना मांडताच तमाम प्रादेशिक पक्षांनी उग्र विरोध करून सरकार आणि विरोधकांमधील विकोपाला गेलेल्या संबंधांची जाणीव करून दिली. खरे तर देशहितासाठी आवश्यक धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती स्वत: सोनिया गांधींनाच दाखवता आली नाही आणि त्याचे स्वच्छ प्रतििबब मनमोहन सिंग सरकारला झालेल्या धोरण लकव्यात उमटत राहिले. या कालखंडात काँग्रेसला उत्तर प्रदेश, बिहारसारख्या मोठय़ा राज्यांतील विधानसभा निवडणुकांसह छोटय़ा-मोठय़ा निवडणुकांमध्ये पराभवाचे जबरदस्त तडाखे बसले. धूर्त आणि कावेबाज नेत्यांच्या कोंडाळ्यात वावरणाऱ्या आणि जमिनीशी ‘संपर्क’ असूनही वास्तवाचे भान नसलेल्या राहुल गांधींचे नेतृत्व सर्वसामान्यांच्या मनात आशा आणि विश्वास निर्माण करू शकले नाही. काँग्रेसच्या कारभाराविषयी सर्वसामान्यांना तिटकारा वाटू लागला. केंद्रातील दोन वर्षांची सत्ता उरली असतानाही मनमोहन सिंग सरकार सारे काही हातून निसटले असल्याच्या संवेदनशून्य वृत्तीने येणारा दिवस ढकलण्याचा प्रयत्न करीत आहे. तीन वर्षांच्या या ऱ्हासपर्वाच्या पाश्र्वभूमीवर जुलै महिन्यात देशाच्या तेराव्या राष्ट्रपतींची निवड होऊ घातली आहे. दोन वर्षांची सत्ता हा काही छोटा कालावधी नाही. लालबहादूर शास्त्री, चौधरी चरण सिंह, व्ही. पी. सिंह, चंद्रशेखर, एच. डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल या माजी पंतप्रधानांच्या वाटय़ाला उणीपुरी दोन वर्षेही आली नाहीत. पण विकेट आणि ओव्हर्स शिल्लक असूनही पराभूताच्या मानसिकतेने खेळणाऱ्या क्रिकेट संघासारखी मनमोहन सिंग सरकारची अवस्था झाली आहे. प्रशासनातील स्वारस्य गमावून बसलेल्या सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांसाठी हीच योग्य संधी असली तरी तेही तयार नाहीत. काँग्रेसची सत्ता येणार नाही, हे स्पष्ट जाणवत असले तरी भाजपच्या नेतृत्वाखाली रालोआची सत्ता येण्याचीही चिन्हे नाहीत. शिवाय पक्षात पेटलेला नेतृत्वाचा कलह शमत नाही तोपर्यंत लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकांना सामोरे जाणे भाजपसाठी सोयीचेही नाही. सध्या सर्वत्र प्रादेशिक पक्षांचे स्तोम माजले असले तरी केंद्रात सत्तेसाठी एकत्र आल्यानंतर पाच वर्षे टिकून राहण्याची चिकाटी त्यांच्याही डीएनएमध्ये नाही. अशा स्थितीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजय मिळवू शकला नाही तर केंद्रातील या निष्क्रिय सरकारला सत्तेतून घालविण्यासाठी देशवासीयांना पुढची दोन वर्षे प्रतीक्षा करण्याची गरजच पडणार नाही. पण काँग्रेसच्या उमेदवाराने राष्ट्रपतीपदाची निवडणूक कशीबशीजिंकल्यास निष्क्रियतेचे पर्व आणखी लांबेल. मंगळवारी तिसरी वर्षपूर्ती करीत असताना मनमोहन सिंग यांच्या यूपीए-२ सरकारवर या अनिश्चिततेचे सावट असेल. तीन वर्षांत आपण देशाची भरपूर पीछेहाट केली याची जाणीव होऊन उरलेल्या दोन वर्षांत त्याची भरपाई करण्याच्या पश्चात्तापाच्या भावनेने सोनिया गांधींनी ठोस निर्णयांच्या मालिकेद्वारे पावले उचलली तरच रुपयाप्रमाणे देशाचे सर्व आघाडय़ांवर झालेले अवमूल्यन काही प्रमाणात थोपविले जाऊ शकते. पण ‘जैसे थे’च्या तत्त्वावर अढळ श्रद्धा असलेल्या सोनिया गांधी असे काही करतील, ही अपेक्षा बाळगणेही फोल ठरेल.

शुक्रवार, १८ मे, २०१२

आयुष्य फार सुंदर आहे! ..


एकदा लग्न झालं की, आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं... असं वाटण्याची जागा, मूल झालं की... मोठं घर झालं की... अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते . दरम्यानच्या काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत . ती जरा मोठी झाली की सारं ठीक होईल , अशी आपण मनाची समजूत घालू लागतो . मुलांच्या वाढत्या वयात, त्यांच्या भवितव्याच्या सुंदर स्वप्नांनी आपण आपले दिवस सजवत असतो. मुलं जरा करती सवरती झाली की सारं कसं आनंदानं भरून जाईल, असं आपल्याला वाटत असतं. आपला नवरा / बायको जरा नीट वागायला लागला लागली की... आपल्या दाराशी एक गाडी आली की ... आपल्याला मनाजोगी सुटी मिळाली की ... निवृत्त झालो की ... आपलं आयुष्य कसं सुखानं भरून जाईल, असं आपण सतत स्वतःशीच घोकत असतो. खरं असं, की आनंदात असण्यासाठी, सुखात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही. आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतच. ती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी राहायचा निश्‍चय करायचा हेच बरं नाही का? जगायला - खरोखरीच्या जगण्याला - अद्याप सुरुवात व्हायचीये , असंच बराच काळ वाटत राहतं . पण, मध्ये बरेच अडथळे असतात. काही आश्‍वासनं पाळायची असतात, कोणाला वेळ द्यायचा असतो, काही ऋण फेडायचं असतं.... आणि अगदी शेवटी कळतं, की ते अडथळे म्हणजेच जीवन होतं. या दृष्टिकोनातून पाहिलं की कळतं, आनंदाकडे जाणारा कोणताही मार्ग नाही. आनंद हाच एक महामार्ग आहे. म्हणून प्रत्येक क्षण साजरा करा . शाळा सुटण्यासाठी... शाळेत पुन्हा जाण्यासाठी ... वजन चार किलोने कमी होण्यासाठी... वजन थोडं वाढण्यासाठी ... कामाला सुरुवात होण्यासाठी ... एकदाचं लग्न होऊन जाऊदे म्हणून ... शुक्रवार संध्याकाळसाठी ... रविवार सकाळसाठी... नव्याकोऱ्या गाडीची वाट बघण्यासाठी... पावसासाठी... थंडीसाठी... सुखद उन्हासाठी ... महिन्याच्या पहिल्या तारखेसाठी... आपण थांबून राहिलेले असतो. एकदाचा तो टप्पा पार पडला की, सारं काही मनासारखं होईल, अशी आपणच आपली समजूत घातलेली असते. पण, असं काही ठरवण्यापूर्वी आनंदी होण्याचं ठरवा . आता जरा या पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या पाहू - १ - जगातल्या पहिल्या दहा सर्वांत श्रीमंत माणसांची नावं सांगा पाहू. २ - गेल्या पाच वर्षांत विश्‍वसुंदरी किताब मिळवणऱ्यांची नावं आठवतायत? ३ - या वर्षीच्या पाच नोबेल विजेत्यांची नावं सांगता येतील? ४ - गेल्या दोन वर्षांतल्या ऑस्कर विजेत्यांची नावं लक्षात आहेत का? हं! काहितरीच काय विचारताय? असं तर वाटलं नाही ना तुम्हाला? पण , असं वाटलं नसलं तरी, या प्रश्‍नांची उत्तरं देमं तसं सोपं नाहीच, नाही का ? टाळ्यांचा कडकडाट हवेत विरून जातो . पदकं आणि चषक धूळ खात पडतात. जेत्यांचाही लवकरच विसर पडतो. आता या चार प्रश्‍नांची उत्तरं द्या पाहू - १ - तुमच्यावर ज्यांचा प्रभाव आहे अशा तीन शिक्षकांची नावं सांगा बरं. २ - तुम्हाला अगदी तातडीची गरज असताना मदत करणाऱ्या तीन मित्रांची नावं सांगता येतील? ३ - आपण म्हणजे अगदी महत्त्वाची व्यक्ती आहोत, असं तुम्हाला वाटायला लावणाऱ्या एखाद-दोघांची नावं सांगता येतील तुम्हाला? ४ - तुम्हाला ज्यांच्याबरोबर वेळ घालवायला आवडतो अशा पाच जणांची नावं सांगा बरं. क्षणभर विचार करा . आयुष्य अगदी छोटं आहे. तुम्ही कोणत्या यादीत असाल ? काही अंदाज लागतोय ? मी सांगतो. जगप्रसिद्ध व्यक्तींच्या यादीत तुमचं नाव नक्कीच नाहिये. पण , हा मेल ज्यांना आवर्जून पाठवावा असं मला वाटलं , त्यांच्या यादीत तुमचं नाव नक्कीच आहे.... आता एक गोष्ट. काही वर्षांपूर्वीची . सिएटलच्या ऑलिम्पिकमध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेले नऊ स्पर्धक स्पर्धा सुरू होण्याच्या संकेताची वाट पाहात जय्यत तयार उभे होते. ही सारी मुलं शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग होती. पिस्तुलाचा आवाज झाला आणि शर्यत सुरू झाली. साऱ्यांनाच पळता येत होतं असं नाही. पण, प्रत्येकाला स्पर्धेत भाग घ्यायचा होता आणि महत्त्वाचं म्हणजे जिंकायचं होतं. धावता धावता एकाचा तोल गेला. काही गोलांट्याखाऊन तो पडला आणि रडू लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्य आठही जण पळायचे थांबले. सारे मागे फिरले... सारे जण... " डाउन्स सिन्ड्रोम'ची व्याधी असलेली एक मुलगी त्याच्या जवळ बसली. तिने त्याला मिठी मारली आणि मग विचारलं, ""आता बरं वाटतंय?'' मग साऱ्यांनी त्याला उभं केलं आणि अंतिम रेषेपर्यंत सारे खांद्याला खांदा लावून चालत गेले. ते दृष्य पाहून मैदानावर उपस्थित असलेले सारेजण हेलावून गेले . उभे राहून मानवंदना देत साऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला . बराच काळ त्या टाळ्यांचा आवाज आसमंतात गुंजत होता... त्यावेळी तिथे उपस्थित असलेली मंडळी अजूनही त्या घटनेची आठवण काढतात. का? कुठेतरी आत खोलवर आपल्याला प्रत्येकाला ठाऊक असतं की आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती स्वतःसाठी जिंकण्यापेक्षा कितीतरी मोठी असते. आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे इतरांना जिंकायला मदत करणं. त्यासाठी वेळप्रसंगी आपला वेग कमी करावा लागतो किंवा अगदी शर्यतच बदलावी लागते. शक्‍य तितक्‍या लोकांना हे सांगा. त्यानं आपलं हृदयपरिवर्तन घडून येईल. कदाचित इतरांचंही... मेणबत्ती लावण्यासाठी वापरल्याने पहिल्या मेणबत्तीचं काहीच कमी होत नाही. नाही का ? जर आपणास हे विचार आवडले असतील तर इतरांना पाठवून विचार करावयास प्रवृत्त करा.

बुधवार, ११ जानेवारी, २०१२

‘जनलोकपाल’.

लोकपालाला अधिकार दिले, म्हणजेच ‘जनलोकपाल’चे स्वप्न पुरे झाले की भ्रष्टाचार नष्टच होणार, अशा कल्पना लोकांपुढे मांडणारे आंदोलन आता महिनाभराच्या रजेवर गेले आहे. भ्रष्टाचारविरोधाची बाजू मांडताना किमान यापुढे तरी ज्ञान महत्त्वाचे माना, अमर्याद अधिकारांचे काही तोटेही असू शकतात, हे नोकरशाहीच्या आजवरच्या अनुभवातून समजून घ्या, असे मानणाऱ्या एका माजी पोलीस अधिकाऱ्याचे हे मनोगत.. नोकरशाहीला प्रचंड अधिकार असतात तेव्हा ती पार सुस्त बनते, असा जगभरचा अनुभव आहे. ‘लोकपाल’ची मागणी होऊ लागली तेव्हा मात्र, अधिकार दिल्यास ही यंत्रणा काम करून दाखवेल, असे वारंवार सांगण्यात आले आहे. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी अ‍ॅण्टिकरप्शन ब्यूरो, केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), केंद्रीय दक्षता अधिकारी (सीव्हीसी) आदी विभाग सध्या आहेत. लोकपालपुढे हे सारे जणू निष्प्रभच ठरतात, असा सार्वत्रिक समज लोकपाल प्रत्यक्षात कार्यरत होईपर्यंत कायम राहू शकतो. परंतु कितीही बळकट ‘लोकपाल’ आला आणि त्याने कितीही प्रामाणिक प्रयत्न करून तक्रारींचे निवारण करावयाचे ठरवले, तरीही इंडियन पीनल कोड, क्रिमिनल प्रोसीजर कोड, इंडियन एव्हिडन्स अ‍ॅक्ट हे कायदे तेच असल्याने आणि ते तसेच ठेवावे लागणार असल्याने लोकपालही सामान्य माणसांच्या तक्रारींना झटपट न्याय देऊ शकतील, अशी अपेक्षा बाळगण्यात अर्थ नाही.
लोकपाल येऊनही जनतेला वेळेत न्याय मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर लोकपालांवरही जाहीर टीका होऊ लागेल. अन्य कोणत्याही वरिष्ठ नोकरशहाप्रमाणे लोकपालही सबबी सांगत आहेत, असे चित्र त्या वेळी दिसल्यास नवल नाही. अकार्यक्षमतेचा आरोप झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यापुढे तीन पर्याय असतात : तुलनेने सक्षम असलेल्या अधिकाऱ्याकडे कार्यभार देऊन स्वेच्छानिवृत्ती स्वीकारणे किंवा आपले काही अधिकारी कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे प्रदान (डेलिगेट) करणे किंवा कामाचा व्याप वाढला म्हणून एकदोघा मदतनीस अधिकाऱ्यांची भरती करणे. असा अधिकारी तिसरा पर्यायच निवडतो, हा जगभरचा अनुभव आहे. त्यानुसार लोकपाल कार्यालयात आणखी सहायक लोकपालाची निवडणूक झाल्यास मात्र, प्रत्येक प्रकरणाबाबत प्रत्येक अधिकाऱ्याचे मत वेगवेगळे आणि त्यामुळे प्रकरणांचा निपटारा होण्यातील वेळही जास्त, असे घडू शकेल.
प्रगतिशील देशांतील शक्तिशाली वरिष्ठ नोकरशहा श्रीमंतधार्जिणा असतो. प्रत्येक सुधारणेला विरोध करीत ‘जैसे थे वादी’ (स्टेटस को-इस्ट) प्रवृत्तीचा असतो. ज्यांच्यासाठी त्याची नेमणूक केली त्या जनतेऐवजी नोकरशहा फक्त आपल्या करिअरचा विचार करतो, हे अनेकदा सिद्ध झालेले आहे. देशातील विरोधी पक्ष कितीही प्रबळ असला, तरी त्याला सरकारचा हेतू आणि दूरदृष्टी यांच्याशी देणेघेणे असण्यापेक्षा, आजच्या सत्ताधाऱ्यांऐवजी आपण सत्ता कशी मिळवावी यांवरच विरोधी पक्ष लक्ष केंद्रित करत असतात, असाही इतिहास ताजा आहे. विरोधी पक्षांना सरकारचे निर्णय दिसतात किंवा घडलेल्या घटना आणि वर्तणूक दिसते. त्यामागची कारणे समजून घेण्याच्या फंदात न पडता विरोध केला जातो. अशा असमंजस सत्तास्पर्धेसाठी ‘लोकपाल’चा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विकासाचे निर्णय घेणाऱ्या सरकारवर विरोधी पक्ष खरे अगर खोटे आरोप करून, भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल करून सरकारवर कारवाई करण्यासाठी लोकपालावर दबावही आणू शकेल. लोकपालाने आखून दिलेल्या ‘रूलबुक’ प्रमाणेच वागायचे ठरवले, तर विकासाचा वा सुरक्षिततेचा कोणताही निर्णय सरकारला घेता येणार नाही.
विरोधी पक्षांचा वा अन्य कुणाही राजकीय पक्ष वा त्यांच्या मागण्यांचा दबाव लोकपालवर येऊ नये, यासाठी लोकपालवरील राजकारण्यांचा अंकुश कमी केला तर, आणखी एक शक्यता संभवते. असा लोकपाल स्वत:च राजकारण्यांसारखे वागू लागतील. राजकारणाी नेतेमंडळी आपल्या स्वार्थासाठी प्रशासनात हस्तक्षेप करतात तसाच हस्तक्षेप वरिष्ठ अधिकारीदेखील आपापल्या स्वार्थासाठी करतात. पोलिस वा अन्य सरकारी खात्यातील माजी अधिकाऱ्यांना हे चांगलेच माहीत असेल व तसा अनुभवही आलेला असेल. उच्चपदस्थ वा राजकारण्यांचा स्वार्थ निव्वळ आर्थिकच असतो असे नव्हे, तर जात, धर्म भाषा स्वप्रांतीय व परप्रांतीय या बाबींवरही तो आधारलेला असतो.
लोकपाल ही नोकरशाही धाटणीची यंत्रणाच असणार, हे उघड आहे. त्या यंत्रणेसाठी ‘लोकपाल सेवा भरती मंडळ’ नेमले जाईल आणि ‘आयएएस’, ‘आयपीएस’ वा ‘आयएफएस’ या जागांसाठी प्रयत्न करणारे उमेदवार लोकपाल कार्यालयातील नोकरीला प्रथम प्राधान्य देऊ लागतील! रास्त मागण्यांसाठी सामान्य माणूस राजकीय नेत्यांच्या घरात धडकू शकतो, पण तोच माणूस वरिष्ठ नोकरशहाच्या बंगल्याच्या गेटमध्ये शिरू लागला तरी त्याच्यावर ‘ट्रेसपासर’ म्हणून गुन्हा दाखल होतो. आपाल्या मागणीसाठी आवाज मोठा करून बोलणे वा कार्यालयात घुसणे हे प्रकार ‘सरकारी कामांत अडथळा’ ठरू शकतात, अनेकदा अशा प्रकारे गुन्हे दाखल होत असतात. सक्षम लोकपालाच्या कार्यालयातील अधिकारी वा कर्मचारी यापेक्षा वेगळे असणार का, याची शाश्वती नाही. अशा वेळी लोकपाल कार्यालयातील साधा पट्टेवालाही किती भयावह ठरू शकेल, याचा अंदाज महात्मा गांधी यांच्या एका अनुभवावरून येऊ शकतो. एका महत्त्वाच्या बैठकीसाठी महात्माजींना लाहोरहून कलकत्त्याला जायचे होते. आगगाडीला फार गर्दी होती. आपल्याला गाडीत बसवून देण्यासाठीे गांधीजींनी तेथील एका हमालाला विनंती केली. ‘तुम्ही मला बारा आणे दिले तर मी तुम्हाला गाडीत बसवून देईन’ असे खडे बोल त्या हमालाने सुनावले! जगाला आदर्शवत् वाटणाऱ्या गांधीजींनी त्यांच्या ‘सत्याचे प्रयोग’ या पुस्तकात स्पष्टपणे नमूद केले आहे की, मला जागा मिळाली पण त्या हमालाने माझ्याकडून बारा आणे वसूल केले. ही ताकद साध्या हमालाची असेल तर बडय़ाबडय़ांना भ्रष्ट ठरवू शकणाऱ्या ‘लोकपाल’ यंत्रणेची काय कथा?
पंतप्रधानांना देशाच्या विकास व सुरक्षिततेबद्दल निर्णय घ्यायचे असतील, तर लोकपालांचे ‘रूलबुक’ बाजूला ठेवावे लागेल. मात्र असे केल्यास थेट सत्तेला मुकण्याचीच भीती असेल, तर सत्ताधारी सहसा ‘रूलबुक पालना’ला महत्त्व देतील. एकंदरीत, देशाच्या विकास वा प्रगतीसाठी धडाडी दाखवणाऱ्यांऐवजी ‘रूलबुक’नुसार सत्ता उपभोगण्यासाठी राजकारणात येणाऱ्यांचेही प्रमाण यामुळे काही काळाने वाढेल.
लोकपालास पाठिंबा देणाऱ्या असंख्य तरुणांना भेटून लोकपाल कशाप्रकारे भ्रष्टाचार नष्ट करणार, याबद्दल चौकशी केली असता मला एकाही तरुणाने स्पष्टीकरण दिले नाही. भारतीय समाजाच्या जडणघडणीवर अवतार, सत्यनारायण पूजा, अभिषेक या तात्काळ फळ देणाऱ्या विचारांचा व कर्मकांडांचा प्रचंड प्रभाव आहे. अण्णा व त्यांना पाठिंबा देणाऱ्यांची जगाकडे पाहण्याची ‘मेंटल मॉडेल्स’ अशाच जडणघडणीच्या प्रभावांतून बनलेली आहेत. आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांचा भर श्रद्धा आणि विश्वास यांऐवजी ज्ञानावर असता, तर ‘लोकपालाला अधिकार दिले म्हणून प्रश्न सुटतील का?’ याची चर्चाही सुरू झाली असती. तसे झालेले नाही.
भ्रष्टाचाराशी लढण्यासाठी सर्व पातळय़ांवर बदल करणे आजही आवश्यकच आहे. मात्र, एक लोकपाल साऱ्यांना भारी पडेल, ही भोळसट कल्पना सोडून देण्याची गरज तातडीची बनली आहे.

सुरेश खोपडे ,बुधवार, ११ जानेवारी, २०१२
(लेखक निवृत्त आयपीएस अधिकारी आहेत)

गुरुवार, २२ डिसेंबर, २०११

अडचणीच्या काळात उपयोगात येणारे ...

Important Links.......& e-mail id .

अडचणीच्या काळात उपयोगात येणारे ...

* महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सुविधा
* जे.जे. हॉस्पिटल, मुंबई
* ससून रुग्णालय, पुणे
* राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था
* आरोग्याची काळजी कशी घ्यावी



* केईएम हॉस्पिटल-मुंबई<
http://maharashtratimes.indiatimes.com/helpline/www.kem.edu>
* शासकीय रुग्णालय, नागपूर
* टाटा स्मृती कँसर हॉस्पिटल,मुंबई
* वैद्यकीय शिक्षण
* राम मनोहर लोहिया शासकीय रुग्णालय, दिल्ली<
http://rmlh.nic.in/index.asp?langid=1>



टॅक्स

· इन्कमटॅक्स रिटर्न ऑनलाइन कसे भरावे<
http://india.gov.in/outerwin.php?id=http://incometaxindiaefiling.gov.in/po
rtal/index.jsp>
· संपत्ती कर कुठे भरावा



• एक्साइज आणि सर्विस टॅक्स रिटर्न<
http://india.gov.in/howdo/onlineservice_detail.php?id=98&cs=c>
• नोंदणी आणि मुद्रांक शुल्क कुठे भरावे



उद्योग-व्यवसाय सुरु करण्याविषयी


* नवीन उद्योग कसा सुरु करावा <
http://business.gov.in/starting_business/index.php>
* व्यवसाय व्यवस्थापन कसे करावे <
http://business.gov.in/manage_business/index.php>
* व्यवसाय बंद कसा करावा <
http://business.gov.in/closing_business/index.php>




* व्यवसायासाठी निधी कसा उभारावा <
http://business.gov.in/business_financing/index.php>
* मुंबई शेअर बाजार
* परराष्ट्रात व्यवसाय कसा सुरु करावा <
http://business.gov.in/doing_business/index.php>



कुठे आणि कसा अर्ज करावा

· मतदार यादीत नाव कसे दाखल करावे <
http://india.gov.in/howdo/howdoi.php?service=10>
· म्हाडाच्या घरासाठी अर्ज कसा करावा
· रोजगार मिळविण्यासाठी नोंदणी<
http://india.gov.in/howdo/howdoi.php?service=12>
· RTI अंतर्गत माहिती कशी मिळवावी
· कॉपीराइट साठी अर्ज
· शस्त्र परवाना कुठून मिळवावा
· पेटंटसाठी कुठे अर्ज करावा



• रेशन कार्डसाठी अर्ज
• PAN कार्ड कसे मिळवावे <
http://india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=15>
• नोकरी कशी शोधावी
• पासपोर्टसाठी अर्ज कुठे करावा
• वाहन नोंदणी कशी करावी
• डिजिटल सही कशी मिळवावी <
http://www.mca.gov.in/MCA21/dca/dsc/certifying-new.html>



तक्रारः कुठे आणि कशी दाखल करावी


* सरकारविरोधात तक्रार कुठे करावी
* केंद्रीय दक्षता आयोगात तक्रार कशी करावी <
http://india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=14>
* राष्ट्रपतींकडे तक्रार कशी करावी
* कामगार आयुक्तांकडे तक्रार कशी करावी <
http://india.gov.in/howdo/onlineservice_detail.php?id=335>
* .IN डोमेन कसे नोंदवावे <
http://india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=18>




* CBI कडे तक्रार कशी करावी <
http://www.cbi.gov.in/contactus/contactfrm.php?to=sp1acmum%40cbi.gov.in&Su
bject=Complaint-Information>
* मोबाइल/लॅंडलाइन फोनविषयी तक्रार कुठे करावी <
http://www.trai.gov.in/serviceproviderslist.asp>
* मानवाधिकार उल्लंघनाबाबत तक्रार
* महिला आयोगात कुठे तक्रार द्यावी



शोध घ्या/पत्ता मिळवा

· रेल्वे तिकीटची PNR स्थिती
· पासपोर्ट अर्जाची स्थिती <
http://bharat.gov.in/outerwin.php?id=https://passport.gov.in>
· महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे
· संसदेचे अधिनियम <
http://india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=13>
· महाराष्ट्रातील ऑनलाइन जिल्हे<
http://www.maharashtra.gov.in/english/Districts%20List.php>
· कृषी हवामान>
· बाळासाठी पोषक आहार
· भारत सरकारच्या टेंडर्सविषयी
· इंडियन एअरलाइन्स विमानांचे वेळापत्रक <
http://bharat.gov.in/outerwin.php?id=http://indian-airlines.nic.in/scripts
/flightstatus.aspx>
· प्रौढांसाठी पोषक आहार
· आयुर्वेद/योग/निसर्गोपचाराविषयी माहिती
· न्यायालयात दाखल प्रकरणांची सद्दस्थिती <
http://india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=21>
· शरीरातील मेद <
http://bharat.gov.in/outerwin.php?id=http://health.delhigovt.nic.in/dynami
c/bodymassindex.html>
· चोरी गेलेल्या गाड्यांची स्थिती <
http://india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=1>
· ISD Codes कसे शोधाल



• PIN Code कसे शोधाल <
http://bharat.gov.in/outerwin.php?id=http://www.indiapost.gov.in/Netscape/
Pincode.html>
• कृषी मंडईतले भाव <
http://india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=6>
• स्पीडपोस्टची स्थिती <
http://india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=10>
• कोर्टाचे आदेश <
http://india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=24>
• परिक्षांचे निकाल<
http://india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=16>
• जमिनीचे रेकॉर्ड
• शेतक-यांसाठीच्या योजना<
http://india.gov.in/citizen/agriculture/agri_cont_schemes.php>
• NGO साठी सरकारी योजना
• लोकसभा/राज्यसभा सदस्यांची माहिती
• गृहिणींसाठी किचन टीप्स<
http://www.foodsafetyindia.nic.in/consumeradvice.htm>
• न्यायालयांची कॉजलिस्ट <
http://india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=7>
• महिलांची प्रजनक्षमता <
http://bharat.gov.in/outerwin.php?id=http://health.delhigovt.nic.in/dynami
c/fertilitycalculator.html>
• केंद्र शासनाच्या कर्मचा-यांसाठी आरोग्य सुविधा<
http://mohfw.nic.in/cghsnew/index.asp>
• विक्रीकर कुठे भरावा
• STD Codes कसे शोधाल



ऑनलाइन खरेदी/भरणा


* रेल्वे तिकीट <
http://india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=5>
* एस.टी. तिकीट
* MTNL बिल




* मुंबई लोकलचा मासिक पास
* विमान तिकीट <
http://india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=4>
* मुंबईत ट्रॅफिक चलान <
http://www.trafficpolicemumbai.org/marathi/indexmarathi.htm>



प्रमाणपत्र कुठून मिळवावे

· जन्म प्रमाणपत्र
· ड्राइव्हिंग लायसन्स
· जात प्रमाणपत्र
· डोमिसाइल प्रमाणपत्र



• मृत्यू प्रमाणपत्र
• अपंगांसाठी ओळखपत्र <
http://india.gov.in/howdo/onlineservice_detail.php?id=1170>
• विवाह प्रमाणपत्र



पोलिस वेबसाइट


* महाराष्ट्र पोलिस
* मुंबई ट्रॅफिक पोलिस <
http://www.trafficpolicemumbai.org/marathi/indexmarathi.htm>
* ठाणे शहर पोलिस
* नागपूर शहर पोलिस
* अॅन्टी करप्शन विभाग <
http://www.maharashtra.gov.in/english/homedept/acbShow.php>
* ग्राहक तक्रार मंच
* गुजरात पोलिस
* मध्यप्रदेश पोलिस
* CBI (नवी दिल्ली)
* दिल्ली ट्रॅफिक पोलिस





* मुंबई पोलिस
* पुणे शहर पोलिस
* नाशिक शहर पोलिस
* Cyber Crime विभाग
* CID, महाराष्ट्र
* कर्नाटक पोलिस
* गोवा पोलिस
* आंध्र प्रदेश पोलिस <
http://apstatepolice.org/APPW/jsp/homePage.do%3bjsessionid%3d6BC754A072E63
1D812EA545860AADA44?method=getHomePageElements
>
* दिल्ली पोलिस

गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०११

फ्री हिट - अण्णा, जहाज बुडते आहे!

राज्यकर्त्यांना सळो की पळो करून सोडणारे अण्ण्णा हजारे स्वत:च अडचणीत येत चालले आहेत. किरण बेदी, केजरीवाल, सिसोदिया, भूषण पितापूत्र अशा टीम अण्णा सदस्यांनी अवघ्या दोन महिन्यांत अण्णांनी अक्षरश: प्राण पणाला लावून उभारलेली भ्रष्टाचारविरोधी मोहिम पिछाडीवर गेली आहे. अणांच्या विरोधकांच्या हाती कोलीत देण्यात ही मंडळी आणि अण्णांचे पीए सुरेश पठारे यांचा वाटा मोठा आहे. त्यांची वक्तव्ये अथवा कृत्ये बघता ही मंडळी अण्णांना मदत करण्यास आली आहेत कीं त्यांना बुडवण्यास असा प्रश्न पडतो.

सार्वजनिक आयुष्यात व्यक्तिगत प्रतिमा फार महत्त्वाची असते. लोकांना शिकवण्याआधी स्वत: स्वच्छ असावे लागते आणि सर्वसामान्यांनाही तसे वाटण आवश्यक असते. येथे, बेदी आणि केजरीवाल यांच्या निधी उभारण्याबाबतच संशयाचे धुके निर्माण झाले आहे. दोघांनी एकमेकाच्या वर्तनाबाबत भाष्य केले आहे. प्रशांत भूषण यांनी थेट, काश्मीरींना स्वयंनियंत्रणाचा हक्क द्यावा असे सांगून टाकले.

काश्मीरचा मामला इतका सोपा असता तर गेली ६५ वर्ष भारत आणि पाकिस्तान या भूप्रदेशावरून सतत संघर्ष का करीत बसले असते? उद्या, काश्मीरींनी, आम्हाला स्वतंत्र व्हायचे आहे किंवा पाकिस्तानमध्ये सामील व्हायचे आहे असा कौल दिला तर संरक्षणदृष्टया भारत अडचणीत येईल त्याचे काय? काश्मीर नसेल तर भारताची सीमा थेट पंजाबपासून सूरू होईल. आज काश्मीर हा हिमालयाच्या कुशीतील भाग भारतासाठी महत्त्वचा आहे.

आज काश्मीर खदखदतो आहे. तेथील लोकांच्या मनात नेमके काय आहे हे सांगणे अशक्य बनले आहे. तेथील किती लोकांच्या मनात धर्मवेड आहे हेही कळत नाही. अशा वेळी देशाच्या एका भागाला स्वयंनियंत्रणाचा हक्क द्यावा असे मतप्रदर्शन सार्वजनिक जीवनातील कोणीही अधिक विचारपूर्वक करायला हवे. हाच न्याय आसाम, नागालँड किंवा इतर सीमा प्रांतांनी मागितला तर भारताने काय करावे?

आता या वादात अण्णांचे काही महिने ब्लॉग रायटर म्हणून काम केलेले राजू परूळेकर उतरले आहेत. त्यांनी दिलेली माहिती ही, अण्णांच्या कार्यपद्धतीविषयी आणि पारदर्शी व्यवहाराविषयीच संशय निर्माण करणारी आहे. टीम अण्णामध्ये व्यक्तीगत हेवेदावे इतके असतील तर चळवळीचे काय होणार असा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य माणसाला पडतो आहे.

मुळात ही चळवळ नेमकी कशासाठी आहे हे मला तेव्हाही कळले नव्हते आणि आजही मी तितकाच अनभिज्ञ आहे. अण्णांचा लढा हा देशातील भ्रष्टाचार कमी करावा म्हणून आह की जनलोकपाल कायदा संमत व्हावा म्हणून आहे? जनलोकपाल विधेयक सरकार जसे आहे तसे मंजुर करणार नाही हे उघड आहे. कारण त्यात अनेक त्रुटी आहेत. रोगापेक्षा इलाज भारी असा हा प्रकार आहे. मुळात एका कायद्याने भ्रष्टाचार कमी होईल असा भाबडेपणाा बाळगावा का?

अण्णांची तुलना अनेकदा महात्मा गांधींशी केली जाते. मुळात हीच एक चूक आहे. गांधींनी चळवळ उभारताना सामान्य माणसाला एक कार्यक्रम दिला. स्वत:बरोबर त्यांना नेण्याइतकी ताकद दाखवली. सोबत देशभर पसरलेला काँग्रेस पक्ष होता. सर्व राज्यांत त्यांचे निष्ठावाक अनुयायी होते. यापैकी अनेक व्यक्तीगत जीवनात स्वच्छ होते.

अण्णांनी सामान्य माणसाला कोणताही कार्यक्रम दिलेला नाही. गावागावात, भ्रष्टाचाराचे रोज फटके खाणारा शेतकरी आणि बारा बलुतेदार किंवा शहरांतील पिचलेला माणूस सहारा शोधतो आहे. त्यांना जनलोकपाल म्हणजे काय हे कळत नाही. जनलोकपालमुळे कोणता भ्रष्टाचार कमी होईल हे त्याच्या लक्षात येत नाही. कारण त्याला इतकेच कळते आहे की, गेल्या सहा दशकांत अनेक कायदे होऊनही, भ्रष्टाचार वाढतोच आहे आणि त्यात बळीही आपलाच जातो आहे.

रोज सतावणारा भ्रष्टाचार कसा कमी होईल ह्याचे उत्तर अण्णा देणार नसतील तर त्यांची चळवळ वेग घेणे कठीण आहे.

यात भर पडली आहे ती, वाचाळ टीम अण्णाची. सरकारशी लढणे कधीच सोप्पे नसते. आणि भारतातील राजकारणी हे बेरके आणि चलाख आहेत. त्यांनी अण्णांसारखी अनेक संकटे झेलली आहेत आणि संपवली आहेत. शरद जोशी आणि टिकैत यांनी तर देेशातील संपूर्ण शेतकरी सरकारविरुद्ध उभा करण्याचे प्रयत्न केले. पंजाबमध्ये शीख फुटीरतावाद्यांनी केलेल्या देशविरोधी चळवळीने देश हादरला, पंतप्रधानांसकट अनेकांना यापायी प्राण गमवावे लागले.

अशी आणखीही उदाहरणे देता येतील. मुद्दा आहे तो, अण्णा सतत उपोषणाला बसतो अशी धमकी देत राहिले तर उपोषणाचे शस्त्र बोथट होईल हे त्यांच्या लक्षात येत नसेल का? मुख्य म्हणजे सतत सरकारला वेठीस धरून यशस्वी होऊ असे त्यांना का वाटते आहे?

देशभर चळवळ नेण्याचे, त्यासाठी भक्कम पायाभरणी करण्याचे आव्हान अण्णा स्वीकारणार आहेत का? त्यासाठी काही काळ मिडियाच्या प्रकाशझोताबाहेरही जावे लागेल. मुळात अण्णांचा हा पिंड आहे का? सेलेब्जना घेऊन चळवळ यशस्वी होते का?

अण्णांची मोहिम अपयशी ठरली तर, लोकांचे फार मोठे नुकसान होईल. त्यांना गेली सहा दशके वेढलेल्या सर्वांत मोठ्या संकटातून सोडवण्याचे सार्मथ्य कोणामध्येच नाही अशी त्यांची भावना होईल. मग तर, माजलेला भ्रष्टाचारी वर्ग ह्या वर्गाची अगदीच दयनीय अवस्था करेल.

अण्णा, जहाज बंदरावर नेऊन डागडुजी करून घ्या. नाहीतरी बुडत्या जहाजावरचे उंदीर कधी पळ काढतील हे कळणार नाही आणि कप्तान म्हणून खापर तुमच्यावर फुटेल.

शनिवार, १३ ऑगस्ट, २०११

Come and Celebrate India's 64th Independence Day.



Independence Day in India celebrated on August 15th signifies the day India gained freedom from the 200 year old British rule. On the midnight of 15th August 1947 the British Rulers handed the country back to the Indian leaders; it was on this historic day the tricolour was hoisted by India's first Prime Minister Pandit Jawaharlal Nehru at Delhi's monumental Red Fort and read to the nation his famous speech called "Tryst with Destiny". This day is very important in Indian history as it signifies the re-birth of India moving towards a brand new future.
In 1946, the Labour Party, the exchequer of Britain considered ending their rule over India as they had exhausted most of their capital after World War 2. Early in 1947 the British Government announced that they intended to transfer power to India by June 1948, but this upcoming independence did not decrease the intense Hindu-Muslim riots taking place in Punjab and Bengal. It were these violent riots that prompted Lord Mountbatten, the then Viceroy of India, to prepone the handing over of power; owing to the fact that the unprepared British army could not deal with the growing violence in the country.
In June 1947 prominent Indian leaders like Pandit Jawaharlal Nehru, Mohammed Ali Jinnah, Abul Kalam Azad, Master Tara Singh and B.R Ambedkar decided on a partition of India along religious lines. India was to be the area marked for Hindus and Sikhs and the newly formed country of Pakistan was to be the area of Muslims. 1947 saw millions of people trudge across this newly formed border and the loss of around 500,000 lives.

"A moment comes, which comes but rarely in history, when we step out from the old to the new…India discovers herself again." - J.L.Nehru

On the eve of India’s independence, Pandit Jawaharlal Nehru famous speech “Tryst with Destiny” marked the beginning of a free India with words symbolizing hope and triumph.

India got its independence from the clutches of British rule on 15th August 1947. It was this day when India’s tricolor flag was unfolded by Pandit Nehru on the barricades of the Red Fort at Delhi. Each and every patriotic soul watched with excitement and paid tribute to thousands of martyrs who sacrificed their lives for India’s freedom.

The Independence Day of India is a moment of delight and grandeur but to achieve it the nation had to put up a long battle for over two centuries against the British Empire. At last on 3rd June 1947, the last British Viceroy of India, Lord Mountbatten of Burma, declared the separation of the British Empire in India into India and Pakistan. The announcement was made under the terms of the Indian Independence Act 1947.

Significance of Independence Day

The significance of the Independence Day in the existence of a nation is of greater value. The day is much more than merely celebrating the anniversary of India’s free statehood. On this day India attained a major part of Asian subcontinent’s 562 extensively spread territories besides British owned states.

15th August 1947 symbolizes the victory of Indian patriotism which the nation got after uncertain yet brutal struggle from the repression of the British colonialism. The British, who oppressed India for centuries had primarily arrived to initiate business but steadily captured the entire government of the nation. They educated the Indians and in the process generated enthusiasts who weren’t hesitant in helping them expanding their regime.

Men and women from all over India joined hands and fought for India’s freedom. Many were acclaimed while others contribution went unnoticed. However, praise wasn’t what they desired for. It was the dream of free and autonomous India which motivated them to walk the path of struggle unselfishly. Neither did they battle for their region nor for their natives, but for India and Indians.

At the time of growing communal and caste conflicts, it becomes significant to remind us that the people who laid the foundation of free India has always dreamt of an integrated nation. Hence, it is our duty to live and sustain their dreams, the sole reason for which Independence Day in India is observed.

It is a day to pay a mark of respect to our saviors because of whom we are breathing an air of freedom which does not have the elements of exploitation and repression.

Independence Day celebrations in India

Independence Day is considered as a national holiday in India. The arrangement begins a month before the D-day and the roads are embellished with ribbons and Indian flags.

Flag-hoisting ceremonies are executed all over India by state governments. However, the chief event is conducted in the capital city of India, New Delhi where the Prime Minister of India unfurls the tricolor at the barricades of Red Fort which receives a salutation of 21 guns, and addresses the nation with his speech.

The Prime Minister’s speech holds major importance as it pays tribute to the great souls who sacrificed their lives for nation’s independence and reveals the achievements of the nation during the past year beside discussing significant issues and proposing steps for further growth.

A vibrant parade exhibiting India’s cultural multiplicity, emblematic portrayals of the nation’s developments in science and technology, a collaborative parade of India’s armed competencies by the three forces and patriotic skits and dramas by school children are an integral part of the Independence Day festivities.

During his famous speech at the Red Fort Pandit Nehru said.


गुरुवार, ४ ऑगस्ट, २०११

LETTER TO THE PRIME MINISTER OF INDIA.

LETTER OF THE EDITOR OF "THE TIMES OF INDIA " TO THE PRIME MINISTER OF INDIA.


I am born and brought up in Mumbai for last fifty eight years. Believe me, corruption in Maharashtra is worse than that in Bihar . Look at all the politicians, Sharad Pawar, Chagan Bhujbal, Narayan Rane, Bal Thackray , Gopinath Munde, Raj Thackray, Vilasrao Deshmukh all are rolling in money. Vilasrao Deshmukh is one of the worst Chief ministers I have seen. His only business is to increase the FSI every other day, make money and send it to Delhi , so Congress can fight next election. Now the clown has found new way and will increase FSI for fishermen, so they can build concrete houses right on sea shore. Next time terrorists can comfortably live in those houses, enjoy the beauty of the sea and then attack our Mumbai at their will.

Recently, I had to purchase a house in Mumbai. I met about two dozen builders. Everybody wanted about 30% in black. A common person like me knows this and with all your intelligence agency & CBI, you and your finance ministers are not aware of it. Where all the black money goes? To the underworld, isn't it? Our politicians take help of these goondas to vacate people by force. I myself was victim of it. If you have time please come to me, I will tell you everything.

If this has been a land of fools, idiots, then I would not have ever cared to write to you this letter. Just see the tragedy. On one side we are reaching moon, people are so intelligent; and on the other side, you politicians have converted nectar into deadly poison.I am everything - Hindu, Muslim, Christian, Scheduled Caste, OBC, Muslim OBC, Christian Scheduled Caste, and Creamy Scheduled Caste; only what I am not is INDIAN. You politicians have raped every part of Mother India by your policy of divide and rule.

Take example of our Former President Abdul Kalam. Such an intelligent person; such a fine human being. But you politician didn't even spare him and instead choose a worthless lady who had corruption charges and insignificant local polititian of Jalgaon WHO'S NAME ENTIRE COUNTRY HAD NOT HEARD BEFORE. Its simple logic your party just wanted a rubber stamp in the name of president. Imagine SHE IS SUPREME COMMANDER OF INDIA 'S THREE DEFENCE FORCES. What morale you will expect from our defence forces? Your party along with opposition joined hands, because politicians feel they are supreme and there is no place for a good person.

Dear Mr Prime minister, you are one of the most intelligent person, a most learned person. Just wake up, be a real SARDAR. First and foremost, expose all selfish politicians. Ask Swiss banks to give names of all Indian account holders. Give reins of CBI to independent agency. Let them find wolves among us. There will be political upheaval, but that will be better than dance of death which we are witnessing every day. Just give us ambience where we can work honestly and without fear. Let there be rule of law. Everything else will be taken care of.

Choice is yours Mr. Prime Minister. Do you want to be lead by one person, or you want to lead the nation of 100 Crore people?


Prakash B. Bajaj
Editor Mumbai-Times of India

सोमवार, २५ जुलै, २०११

कविता बापाला सलाम करणाऱ्या...

स्वामी तिन्ही जगाचा... आईविना भिकारी, असं म्हटलं जात असलं तरी बापाचं महत्त्वही तितकंच आहे. परंतु चिडणाऱ्या, रागावणाऱ्या बापाची प्रतिमा मुलांच्या मनात आईइतका हळवेपणा निर्माण करीत नाही. पण बाप काय कष्ट करतो, त्याची घुसमट, त्याला कुटुंब चालवताना सहन करावे लागणारे मान-अपमान यांसारखे कितीतरी प्रसंग तो मनात साठवत असतो. अशा बापाला सलाम करणाऱ्या प्रा. लक्ष्मण महाडिक यांच्या कविता आता लोकप्रिय होऊ लागल्या आहेत.

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे राहणाऱ्या या कवीने लिहिलेल्या बापाच्या कविता नव्या नाहीत, पण त्यांनी या कविता मृत्यूप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात जेव्हा एकत्रितरित्या सादर केल्या, तेव्हा त्याचा परिणामही जास्त खोलवर जाणवू लागला. आपल्या बापाची व्यथा त्यांनी त्यांच्या कवितेतून मांडली असली, तरी दुसऱ्याच्या बापाच्या व्यथाही यापेक्षा वेगळ्या नसतात. त्यामुळे त्या सहज भिडतात व बापाचे महत्त्व कळते. अशा या बापाच्या सर्व कविता एकत्र करून त्यावर पुस्तक काढायचे महाडीक यांनी ठरवले आहे.

मराठी साहित्यात वडिलांवर काही मोजक्या कवींनी कविता लिहिल्या आहेत. परंतु शेतीकाम करणाऱ्या बापाच्या व्यथा मांडणाऱ्या प्रा. लक्ष्मण महाडिक यांच्या कविता वेगळ्याच ठरतात.

मृत्यूनंतर सरकार दफ्तरी नोंद करताना,

तलाठ्याला द्यावी लागते दक्षिणा,

अन् घालाव्या लागतात प्रदक्षिणा सरकारी कचेऱ्यात

कदाचित असे केलेही नाही तर बाप मरूनही जिवंत राहील कायमचाच सरकारी कचेऱ्यांच्या रेकॉर्डवर

मग, आपण मोठ्या श्रद्धेनं घातलेल्या श्राद्धाला,

मुळीच अर्थ उरत नाही आणि बापाला असं

उगाचच ताटकळत ठेवणं तलाठ्यालाही परवडत नाही.

अशा कवितेतून बापाच्या मृत्यूनंतर केलेले भाष्य बोलके असून सरकारी दप्तरी होणारा प्रकार तितकाच क्लेषदायक वाटणारा पण रुटीन आहे. कवितेबरोबच महाडीक एका कवितेतून शेतकरी बापाची व्यथा संागतात.

शेतीवर इमान राखणाऱ्या बापाला,

प्रत्येक हंगामागणिक घ्यावं लागतं कर्ज

बँका, सोसायट्या, अन् सावकाराकडून

अन् त्यासाठी कराव्या लागतात विनंत्या,

अर्ज अर्जवपणे, हात जोडून याचक होऊन

सोबतीला लागते स्थावर मालमत्ता, गहाणवट अथवा तारण देण्यासाठी टेबलाखालूनची चिरीमिरी वेगळीच

कर्ज हातात पडण्याआधीच कापल्या जातात, ना परतीच्या ठेवी, इमारत निधी, शेअर्स, डिपॉजिट.

खरंतर बापाच्या या कवितेतून शेतकऱ्यांच्या व्यथाही मांडल्या असल्याने या कविता मनाला अधिक भिडतात. शेतकऱ्यांचे दु:ख मांडताना लक्ष्मण महाडिक यांनी आपल्या कवितेला माध्यम केले असले, तरी ते वास्तव जगासमोर आणण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. प्रा. महाडीक यांचा कुणब्याच्या कविता हा कवितासंग्रही तितकाच प्रसिद्ध आहे. या काव्यसंग्रहाने आतापर्यंत तब्बल पाचहून अधिक राज्यस्तरीय पारितोषिक पटकावले. राज्य शासनाचा उत्कृष्ट वाड्.मय निमिर्तीबद्दल असणारा बहिणाबाई पुरस्कार, पद्मश्री विखे पाटील पुरस्कार, कविवर्य वसंत सावंत पुरस्कार, रा.र.बोरडे पुरस्कृत साहित्य शिवार पुरस्कार, कविवर्य कुसुमाग्रज अमरावती यांचा पुरस्कार असे कितीतरी पुरस्कार महाडिक यांच्या काव्यसंग्रहाला मिळाले आहेत.

एकूणच कवीने कवितेतून शेतकरी, बापाच्या व्यथा मांडण्याचा ध्यासच घेतला आहे. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर...

कित्येक कोरडवाहू हंगामात

मातीचे आसु पिताना स्वत:ला मातीत गाडत आलो

आणि हिरव्या पातीचा रांगडा पोळ, तरी कधी उनाळ कांदा झालो

पुढे पुढे तर कुणब्याचा वसा चालवताना

मातीबरोबरच अक्षरांचा दास झालो

आणि तळहातावरच्या जखमा कागदावर

पुसता पुसता मीच कवितेचा बाप झालो.

सोमवार, १८ जुलै, २०११

मी काय केल तर काय होईल ?

मी काय करू शकेन ?

मी काय करायला हवय ?