-
सोमवार, २८ मे, २०१२
परवाच एका स्फोटात मेलो.
मैत्रीला technology पासून जपून ठेवुया ...... :-)
10 reasons why the Indian economy has gone off track.....
गुरुवार, २४ मे, २०१२
गब्बर सिंह का चरित्र चित्रण.
Just for FUN
Wo bhi kya Din the
INDIA's OWN Wax Museum ... Simply OUTSTANDING!
सोमवार, २१ मे, २०१२
देशाची पीछेहाट.
शुक्रवार, १८ मे, २०१२
आयुष्य फार सुंदर आहे! ..
बुधवार, ११ जानेवारी, २०१२
‘जनलोकपाल’.
लोकपालाला अधिकार दिले, म्हणजेच ‘जनलोकपाल’चे स्वप्न पुरे झाले की भ्रष्टाचार नष्टच होणार, अशा कल्पना लोकांपुढे मांडणारे आंदोलन आता महिनाभराच्या रजेवर गेले आहे. भ्रष्टाचारविरोधाची बाजू मांडताना किमान यापुढे तरी ज्ञान महत्त्वाचे माना, अमर्याद अधिकारांचे काही तोटेही असू शकतात, हे नोकरशाहीच्या आजवरच्या अनुभवातून समजून घ्या, असे मानणाऱ्या एका माजी पोलीस अधिकाऱ्याचे हे मनोगत.. नोकरशाहीला प्रचंड अधिकार असतात तेव्हा ती पार सुस्त बनते, असा जगभरचा अनुभव आहे. ‘लोकपाल’ची मागणी होऊ लागली तेव्हा मात्र, अधिकार दिल्यास ही यंत्रणा काम करून दाखवेल, असे वारंवार सांगण्यात आले आहे. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी अॅण्टिकरप्शन ब्यूरो, केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), केंद्रीय दक्षता अधिकारी (सीव्हीसी) आदी विभाग सध्या आहेत. लोकपालपुढे हे सारे जणू निष्प्रभच ठरतात, असा सार्वत्रिक समज लोकपाल प्रत्यक्षात कार्यरत होईपर्यंत कायम राहू शकतो. परंतु कितीही बळकट ‘लोकपाल’ आला आणि त्याने कितीही प्रामाणिक प्रयत्न करून तक्रारींचे निवारण करावयाचे ठरवले, तरीही इंडियन पीनल कोड, क्रिमिनल प्रोसीजर कोड, इंडियन एव्हिडन्स अॅक्ट हे कायदे तेच असल्याने आणि ते तसेच ठेवावे लागणार असल्याने लोकपालही सामान्य माणसांच्या तक्रारींना झटपट न्याय देऊ शकतील, अशी अपेक्षा बाळगण्यात अर्थ नाही.
लोकपाल येऊनही जनतेला वेळेत न्याय मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर लोकपालांवरही जाहीर टीका होऊ लागेल. अन्य कोणत्याही वरिष्ठ नोकरशहाप्रमाणे लोकपालही सबबी सांगत आहेत, असे चित्र त्या वेळी दिसल्यास नवल नाही. अकार्यक्षमतेचा आरोप झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यापुढे तीन पर्याय असतात : तुलनेने सक्षम असलेल्या अधिकाऱ्याकडे कार्यभार देऊन स्वेच्छानिवृत्ती स्वीकारणे किंवा आपले काही अधिकारी कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे प्रदान (डेलिगेट) करणे किंवा कामाचा व्याप वाढला म्हणून एकदोघा मदतनीस अधिकाऱ्यांची भरती करणे. असा अधिकारी तिसरा पर्यायच निवडतो, हा जगभरचा अनुभव आहे. त्यानुसार लोकपाल कार्यालयात आणखी सहायक लोकपालाची निवडणूक झाल्यास मात्र, प्रत्येक प्रकरणाबाबत प्रत्येक अधिकाऱ्याचे मत वेगवेगळे आणि त्यामुळे प्रकरणांचा निपटारा होण्यातील वेळही जास्त, असे घडू शकेल.
प्रगतिशील देशांतील शक्तिशाली वरिष्ठ नोकरशहा श्रीमंतधार्जिणा असतो. प्रत्येक सुधारणेला विरोध करीत ‘जैसे थे वादी’ (स्टेटस को-इस्ट) प्रवृत्तीचा असतो. ज्यांच्यासाठी त्याची नेमणूक केली त्या जनतेऐवजी नोकरशहा फक्त आपल्या करिअरचा विचार करतो, हे अनेकदा सिद्ध झालेले आहे. देशातील विरोधी पक्ष कितीही प्रबळ असला, तरी त्याला सरकारचा हेतू आणि दूरदृष्टी यांच्याशी देणेघेणे असण्यापेक्षा, आजच्या सत्ताधाऱ्यांऐवजी आपण सत्ता कशी मिळवावी यांवरच विरोधी पक्ष लक्ष केंद्रित करत असतात, असाही इतिहास ताजा आहे. विरोधी पक्षांना सरकारचे निर्णय दिसतात किंवा घडलेल्या घटना आणि वर्तणूक दिसते. त्यामागची कारणे समजून घेण्याच्या फंदात न पडता विरोध केला जातो. अशा असमंजस सत्तास्पर्धेसाठी ‘लोकपाल’चा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विकासाचे निर्णय घेणाऱ्या सरकारवर विरोधी पक्ष खरे अगर खोटे आरोप करून, भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल करून सरकारवर कारवाई करण्यासाठी लोकपालावर दबावही आणू शकेल. लोकपालाने आखून दिलेल्या ‘रूलबुक’ प्रमाणेच वागायचे ठरवले, तर विकासाचा वा सुरक्षिततेचा कोणताही निर्णय सरकारला घेता येणार नाही.
विरोधी पक्षांचा वा अन्य कुणाही राजकीय पक्ष वा त्यांच्या मागण्यांचा दबाव लोकपालवर येऊ नये, यासाठी लोकपालवरील राजकारण्यांचा अंकुश कमी केला तर, आणखी एक शक्यता संभवते. असा लोकपाल स्वत:च राजकारण्यांसारखे वागू लागतील. राजकारणाी नेतेमंडळी आपल्या स्वार्थासाठी प्रशासनात हस्तक्षेप करतात तसाच हस्तक्षेप वरिष्ठ अधिकारीदेखील आपापल्या स्वार्थासाठी करतात. पोलिस वा अन्य सरकारी खात्यातील माजी अधिकाऱ्यांना हे चांगलेच माहीत असेल व तसा अनुभवही आलेला असेल. उच्चपदस्थ वा राजकारण्यांचा स्वार्थ निव्वळ आर्थिकच असतो असे नव्हे, तर जात, धर्म भाषा स्वप्रांतीय व परप्रांतीय या बाबींवरही तो आधारलेला असतो.
लोकपाल ही नोकरशाही धाटणीची यंत्रणाच असणार, हे उघड आहे. त्या यंत्रणेसाठी ‘लोकपाल सेवा भरती मंडळ’ नेमले जाईल आणि ‘आयएएस’, ‘आयपीएस’ वा ‘आयएफएस’ या जागांसाठी प्रयत्न करणारे उमेदवार लोकपाल कार्यालयातील नोकरीला प्रथम प्राधान्य देऊ लागतील! रास्त मागण्यांसाठी सामान्य माणूस राजकीय नेत्यांच्या घरात धडकू शकतो, पण तोच माणूस वरिष्ठ नोकरशहाच्या बंगल्याच्या गेटमध्ये शिरू लागला तरी त्याच्यावर ‘ट्रेसपासर’ म्हणून गुन्हा दाखल होतो. आपाल्या मागणीसाठी आवाज मोठा करून बोलणे वा कार्यालयात घुसणे हे प्रकार ‘सरकारी कामांत अडथळा’ ठरू शकतात, अनेकदा अशा प्रकारे गुन्हे दाखल होत असतात. सक्षम लोकपालाच्या कार्यालयातील अधिकारी वा कर्मचारी यापेक्षा वेगळे असणार का, याची शाश्वती नाही. अशा वेळी लोकपाल कार्यालयातील साधा पट्टेवालाही किती भयावह ठरू शकेल, याचा अंदाज महात्मा गांधी यांच्या एका अनुभवावरून येऊ शकतो. एका महत्त्वाच्या बैठकीसाठी महात्माजींना लाहोरहून कलकत्त्याला जायचे होते. आगगाडीला फार गर्दी होती. आपल्याला गाडीत बसवून देण्यासाठीे गांधीजींनी तेथील एका हमालाला विनंती केली. ‘तुम्ही मला बारा आणे दिले तर मी तुम्हाला गाडीत बसवून देईन’ असे खडे बोल त्या हमालाने सुनावले! जगाला आदर्शवत् वाटणाऱ्या गांधीजींनी त्यांच्या ‘सत्याचे प्रयोग’ या पुस्तकात स्पष्टपणे नमूद केले आहे की, मला जागा मिळाली पण त्या हमालाने माझ्याकडून बारा आणे वसूल केले. ही ताकद साध्या हमालाची असेल तर बडय़ाबडय़ांना भ्रष्ट ठरवू शकणाऱ्या ‘लोकपाल’ यंत्रणेची काय कथा?
पंतप्रधानांना देशाच्या विकास व सुरक्षिततेबद्दल निर्णय घ्यायचे असतील, तर लोकपालांचे ‘रूलबुक’ बाजूला ठेवावे लागेल. मात्र असे केल्यास थेट सत्तेला मुकण्याचीच भीती असेल, तर सत्ताधारी सहसा ‘रूलबुक पालना’ला महत्त्व देतील. एकंदरीत, देशाच्या विकास वा प्रगतीसाठी धडाडी दाखवणाऱ्यांऐवजी ‘रूलबुक’नुसार सत्ता उपभोगण्यासाठी राजकारणात येणाऱ्यांचेही प्रमाण यामुळे काही काळाने वाढेल.
लोकपालास पाठिंबा देणाऱ्या असंख्य तरुणांना भेटून लोकपाल कशाप्रकारे भ्रष्टाचार नष्ट करणार, याबद्दल चौकशी केली असता मला एकाही तरुणाने स्पष्टीकरण दिले नाही. भारतीय समाजाच्या जडणघडणीवर अवतार, सत्यनारायण पूजा, अभिषेक या तात्काळ फळ देणाऱ्या विचारांचा व कर्मकांडांचा प्रचंड प्रभाव आहे. अण्णा व त्यांना पाठिंबा देणाऱ्यांची जगाकडे पाहण्याची ‘मेंटल मॉडेल्स’ अशाच जडणघडणीच्या प्रभावांतून बनलेली आहेत. आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांचा भर श्रद्धा आणि विश्वास यांऐवजी ज्ञानावर असता, तर ‘लोकपालाला अधिकार दिले म्हणून प्रश्न सुटतील का?’ याची चर्चाही सुरू झाली असती. तसे झालेले नाही.
भ्रष्टाचाराशी लढण्यासाठी सर्व पातळय़ांवर बदल करणे आजही आवश्यकच आहे. मात्र, एक लोकपाल साऱ्यांना भारी पडेल, ही भोळसट कल्पना सोडून देण्याची गरज तातडीची बनली आहे.
सुरेश खोपडे ,बुधवार, ११ जानेवारी, २०१२
(लेखक निवृत्त आयपीएस अधिकारी आहेत)

गुरुवार, २२ डिसेंबर, २०११
अडचणीच्या काळात उपयोगात येणारे ...
Important Links.......& e-mail id .
अडचणीच्या काळात उपयोगात येणारे ...
* महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सुविधा
* जे.जे. हॉस्पिटल, मुंबई
* ससून रुग्णालय, पुणे
* राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था
* आरोग्याची काळजी कशी घ्यावी
* केईएम हॉस्पिटल-मुंबई<
http://maharashtratimes.indiatimes.com/helpline/www.kem.edu>
* शासकीय रुग्णालय, नागपूर
* टाटा स्मृती कँसर हॉस्पिटल,मुंबई
* वैद्यकीय शिक्षण
* राम मनोहर लोहिया शासकीय रुग्णालय, दिल्ली<
http://rmlh.nic.in/index.asp?langid=1>
टॅक्स
· इन्कमटॅक्स रिटर्न ऑनलाइन कसे भरावे<
http://india.gov.in/outerwin.php?id=http://incometaxindiaefiling.gov.in/po
rtal/index.jsp>
· संपत्ती कर कुठे भरावा
• एक्साइज आणि सर्विस टॅक्स रिटर्न<
http://india.gov.in/howdo/onlineservice_detail.php?id=98&cs=c>
• नोंदणी आणि मुद्रांक शुल्क कुठे भरावे
उद्योग-व्यवसाय सुरु करण्याविषयी
* नवीन उद्योग कसा सुरु करावा <
http://business.gov.in/starting_business/index.php>
* व्यवसाय व्यवस्थापन कसे करावे <
http://business.gov.in/manage_business/index.php>
* व्यवसाय बंद कसा करावा <
http://business.gov.in/closing_business/index.php>
* व्यवसायासाठी निधी कसा उभारावा <
http://business.gov.in/business_financing/index.php>
* मुंबई शेअर बाजार
* परराष्ट्रात व्यवसाय कसा सुरु करावा <
http://business.gov.in/doing_business/index.php>
कुठे आणि कसा अर्ज करावा
· मतदार यादीत नाव कसे दाखल करावे <
http://india.gov.in/howdo/howdoi.php?service=10>
· म्हाडाच्या घरासाठी अर्ज कसा करावा
· रोजगार मिळविण्यासाठी नोंदणी<
http://india.gov.in/howdo/howdoi.php?service=12>
· RTI अंतर्गत माहिती कशी मिळवावी
· कॉपीराइट साठी अर्ज
· शस्त्र परवाना कुठून मिळवावा
· पेटंटसाठी कुठे अर्ज करावा
• रेशन कार्डसाठी अर्ज
• PAN कार्ड कसे मिळवावे <
http://india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=15>
• नोकरी कशी शोधावी
• पासपोर्टसाठी अर्ज कुठे करावा
• वाहन नोंदणी कशी करावी
• डिजिटल सही कशी मिळवावी <
http://www.mca.gov.in/MCA21/dca/dsc/certifying-new.html>
तक्रारः कुठे आणि कशी दाखल करावी
* सरकारविरोधात तक्रार कुठे करावी
* केंद्रीय दक्षता आयोगात तक्रार कशी करावी <
http://india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=14>
* राष्ट्रपतींकडे तक्रार कशी करावी
* कामगार आयुक्तांकडे तक्रार कशी करावी <
http://india.gov.in/howdo/onlineservice_detail.php?id=335>
* .IN डोमेन कसे नोंदवावे <
http://india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=18>
* CBI कडे तक्रार कशी करावी <
http://www.cbi.gov.in/contactus/contactfrm.php?to=sp1acmum%40cbi.gov.in&Su
bject=Complaint-Information>
* मोबाइल/लॅंडलाइन फोनविषयी तक्रार कुठे करावी <
http://www.trai.gov.in/serviceproviderslist.asp>
* मानवाधिकार उल्लंघनाबाबत तक्रार
* महिला आयोगात कुठे तक्रार द्यावी
शोध घ्या/पत्ता मिळवा
· रेल्वे तिकीटची PNR स्थिती
· पासपोर्ट अर्जाची स्थिती <
http://bharat.gov.in/outerwin.php?id=https://passport.gov.in>
· महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे
· संसदेचे अधिनियम <
http://india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=13>
· महाराष्ट्रातील ऑनलाइन जिल्हे<
http://www.maharashtra.gov.in/english/Districts%20List.php>
· कृषी हवामान >
· बाळासाठी पोषक आहार
· भारत सरकारच्या टेंडर्सविषयी
· इंडियन एअरलाइन्स विमानांचे वेळापत्रक <
http://bharat.gov.in/outerwin.php?id=http://indian-airlines.nic.in/scripts
/flightstatus.aspx>
· प्रौढांसाठी पोषक आहार
· आयुर्वेद/योग/निसर्गोपचाराविषयी माहिती
· न्यायालयात दाखल प्रकरणांची सद्दस्थिती <
http://india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=21>
· शरीरातील मेद <
http://bharat.gov.in/outerwin.php?id=http://health.delhigovt.nic.in/dynami
c/bodymassindex.html>
· चोरी गेलेल्या गाड्यांची स्थिती <
http://india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=1>
· ISD Codes कसे शोधाल
• PIN Code कसे शोधाल <
http://bharat.gov.in/outerwin.php?id=http://www.indiapost.gov.in/Netscape/
Pincode.html>
• कृषी मंडईतले भाव <
http://india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=6>
• स्पीडपोस्टची स्थिती <
http://india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=10>
• कोर्टाचे आदेश <
http://india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=24>
• परिक्षांचे निकाल<
http://india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=16>
• जमिनीचे रेकॉर्ड
• शेतक-यांसाठीच्या योजना<
http://india.gov.in/citizen/agriculture/agri_cont_schemes.php>
• NGO साठी सरकारी योजना
• लोकसभा/राज्यसभा सदस्यांची माहिती
• गृहिणींसाठी किचन टीप्स<
http://www.foodsafetyindia.nic.in/consumeradvice.htm>
• न्यायालयांची कॉजलिस्ट <
http://india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=7>
• महिलांची प्रजनक्षमता <

c/fertilitycalculator.html>
• केंद्र शासनाच्या कर्मचा-यांसाठी आरोग्य सुविधा<
http://mohfw.nic.in/cghsnew/index.asp>
• विक्रीकर कुठे भरावा
• STD Codes कसे शोधाल
ऑनलाइन खरेदी/भरणा
* रेल्वे तिकीट <
http://india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=5>
* एस.टी. तिकीट
* MTNL बिल
* मुंबई लोकलचा मासिक पास
* विमान तिकीट <
http://india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=4>
* मुंबईत ट्रॅफिक चलान <
http://www.trafficpolicemumbai.org/marathi/indexmarathi.htm>
प्रमाणपत्र कुठून मिळवावे
· जन्म प्रमाणपत्र
· ड्राइव्हिंग लायसन्स
· जात प्रमाणपत्र
· डोमिसाइल प्रमाणपत्र
• मृत्यू प्रमाणपत्र
• अपंगांसाठी ओळखपत्र <
http://india.gov.in/howdo/onlineservice_detail.php?id=1170>
• विवाह प्रमाणपत्र
पोलिस वेबसाइट
* महाराष्ट्र पोलिस
* मुंबई ट्रॅफिक पोलिस <

* ठाणे शहर पोलिस
* नागपूर शहर पोलिस
* अॅन्टी करप्शन विभाग <
http://www.maharashtra.gov.in/english/homedept/acbShow.php>
* ग्राहक तक्रार मंच
* गुजरात पोलिस
* मध्यप्रदेश पोलिस
* CBI (नवी दिल्ली)
* दिल्ली ट्रॅफिक पोलिस
* मुंबई पोलिस
* पुणे शहर पोलिस
* नाशिक शहर पोलिस
* Cyber Crime विभाग
* CID, महाराष्ट्र
* कर्नाटक पोलिस
* गोवा पोलिस
* आंध्र प्रदेश पोलिस <
http://apstatepolice.org/APPW/jsp/homePage.do%3bjsessionid%3d6BC754A072E63
1D812EA545860AADA44?method=getHomePageElements
>
* दिल्ली पोलिस

· कृषी हवामान

गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०११
फ्री हिट - अण्णा, जहाज बुडते आहे!
राज्यकर्त्यांना सळो की पळो करून सोडणारे अण्ण्णा हजारे स्वत:च अडचणीत येत चालले आहेत. किरण बेदी, केजरीवाल, सिसोदिया, भूषण पितापूत्र अशा टीम अण्णा सदस्यांनी अवघ्या दोन महिन्यांत अण्णांनी अक्षरश: प्राण पणाला लावून उभारलेली भ्रष्टाचारविरोधी मोहिम पिछाडीवर गेली आहे. अणांच्या विरोधकांच्या हाती कोलीत देण्यात ही मंडळी आणि अण्णांचे पीए सुरेश पठारे यांचा वाटा मोठा आहे. त्यांची वक्तव्ये अथवा कृत्ये बघता ही मंडळी अण्णांना मदत करण्यास आली आहेत कीं त्यांना बुडवण्यास असा प्रश्न पडतो.
सार्वजनिक आयुष्यात व्यक्तिगत प्रतिमा फार महत्त्वाची असते. लोकांना शिकवण्याआधी स्वत: स्वच्छ असावे लागते आणि सर्वसामान्यांनाही तसे वाटण आवश्यक असते. येथे, बेदी आणि केजरीवाल यांच्या निधी उभारण्याबाबतच संशयाचे धुके निर्माण झाले आहे. दोघांनी एकमेकाच्या वर्तनाबाबत भाष्य केले आहे. प्रशांत भूषण यांनी थेट, काश्मीरींना स्वयंनियंत्रणाचा हक्क द्यावा असे सांगून टाकले.
काश्मीरचा मामला इतका सोपा असता तर गेली ६५ वर्ष भारत आणि पाकिस्तान या भूप्रदेशावरून सतत संघर्ष का करीत बसले असते? उद्या, काश्मीरींनी, आम्हाला स्वतंत्र व्हायचे आहे किंवा पाकिस्तानमध्ये सामील व्हायचे आहे असा कौल दिला तर संरक्षणदृष्टया भारत अडचणीत येईल त्याचे काय? काश्मीर नसेल तर भारताची सीमा थेट पंजाबपासून सूरू होईल. आज काश्मीर हा हिमालयाच्या कुशीतील भाग भारतासाठी महत्त्वचा आहे.
आज काश्मीर खदखदतो आहे. तेथील लोकांच्या मनात नेमके काय आहे हे सांगणे अशक्य बनले आहे. तेथील किती लोकांच्या मनात धर्मवेड आहे हेही कळत नाही. अशा वेळी देशाच्या एका भागाला स्वयंनियंत्रणाचा हक्क द्यावा असे मतप्रदर्शन सार्वजनिक जीवनातील कोणीही अधिक विचारपूर्वक करायला हवे. हाच न्याय आसाम, नागालँड किंवा इतर सीमा प्रांतांनी मागितला तर भारताने काय करावे?
आता या वादात अण्णांचे काही महिने ब्लॉग रायटर म्हणून काम केलेले राजू परूळेकर उतरले आहेत. त्यांनी दिलेली माहिती ही, अण्णांच्या कार्यपद्धतीविषयी आणि पारदर्शी व्यवहाराविषयीच संशय निर्माण करणारी आहे. टीम अण्णामध्ये व्यक्तीगत हेवेदावे इतके असतील तर चळवळीचे काय होणार असा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य माणसाला पडतो आहे.
मुळात ही चळवळ नेमकी कशासाठी आहे हे मला तेव्हाही कळले नव्हते आणि आजही मी तितकाच अनभिज्ञ आहे. अण्णांचा लढा हा देशातील भ्रष्टाचार कमी करावा म्हणून आह की जनलोकपाल कायदा संमत व्हावा म्हणून आहे? जनलोकपाल विधेयक सरकार जसे आहे तसे मंजुर करणार नाही हे उघड आहे. कारण त्यात अनेक त्रुटी आहेत. रोगापेक्षा इलाज भारी असा हा प्रकार आहे. मुळात एका कायद्याने भ्रष्टाचार कमी होईल असा भाबडेपणाा बाळगावा का?
अण्णांची तुलना अनेकदा महात्मा गांधींशी केली जाते. मुळात हीच एक चूक आहे. गांधींनी चळवळ उभारताना सामान्य माणसाला एक कार्यक्रम दिला. स्वत:बरोबर त्यांना नेण्याइतकी ताकद दाखवली. सोबत देशभर पसरलेला काँग्रेस पक्ष होता. सर्व राज्यांत त्यांचे निष्ठावाक अनुयायी होते. यापैकी अनेक व्यक्तीगत जीवनात स्वच्छ होते.
अण्णांनी सामान्य माणसाला कोणताही कार्यक्रम दिलेला नाही. गावागावात, भ्रष्टाचाराचे रोज फटके खाणारा शेतकरी आणि बारा बलुतेदार किंवा शहरांतील पिचलेला माणूस सहारा शोधतो आहे. त्यांना जनलोकपाल म्हणजे काय हे कळत नाही. जनलोकपालमुळे कोणता भ्रष्टाचार कमी होईल हे त्याच्या लक्षात येत नाही. कारण त्याला इतकेच कळते आहे की, गेल्या सहा दशकांत अनेक कायदे होऊनही, भ्रष्टाचार वाढतोच आहे आणि त्यात बळीही आपलाच जातो आहे.
रोज सतावणारा भ्रष्टाचार कसा कमी होईल ह्याचे उत्तर अण्णा देणार नसतील तर त्यांची चळवळ वेग घेणे कठीण आहे.
यात भर पडली आहे ती, वाचाळ टीम अण्णाची. सरकारशी लढणे कधीच सोप्पे नसते. आणि भारतातील राजकारणी हे बेरके आणि चलाख आहेत. त्यांनी अण्णांसारखी अनेक संकटे झेलली आहेत आणि संपवली आहेत. शरद जोशी आणि टिकैत यांनी तर देेशातील संपूर्ण शेतकरी सरकारविरुद्ध उभा करण्याचे प्रयत्न केले. पंजाबमध्ये शीख फुटीरतावाद्यांनी केलेल्या देशविरोधी चळवळीने देश हादरला, पंतप्रधानांसकट अनेकांना यापायी प्राण गमवावे लागले.
अशी आणखीही उदाहरणे देता येतील. मुद्दा आहे तो, अण्णा सतत उपोषणाला बसतो अशी धमकी देत राहिले तर उपोषणाचे शस्त्र बोथट होईल हे त्यांच्या लक्षात येत नसेल का? मुख्य म्हणजे सतत सरकारला वेठीस धरून यशस्वी होऊ असे त्यांना का वाटते आहे?
देशभर चळवळ नेण्याचे, त्यासाठी भक्कम पायाभरणी करण्याचे आव्हान अण्णा स्वीकारणार आहेत का? त्यासाठी काही काळ मिडियाच्या प्रकाशझोताबाहेरही जावे लागेल. मुळात अण्णांचा हा पिंड आहे का? सेलेब्जना घेऊन चळवळ यशस्वी होते का?
अण्णांची मोहिम अपयशी ठरली तर, लोकांचे फार मोठे नुकसान होईल. त्यांना गेली सहा दशके वेढलेल्या सर्वांत मोठ्या संकटातून सोडवण्याचे सार्मथ्य कोणामध्येच नाही अशी त्यांची भावना होईल. मग तर, माजलेला भ्रष्टाचारी वर्ग ह्या वर्गाची अगदीच दयनीय अवस्था करेल.
अण्णा, जहाज बंदरावर नेऊन डागडुजी करून घ्या. नाहीतरी बुडत्या जहाजावरचे उंदीर कधी पळ काढतील हे कळणार नाही आणि कप्तान म्हणून खापर तुमच्यावर फुटेल.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)