सोमवार, २३ डिसेंबर, २०१३

जर्नालिझम ऑफ इम्पॅक्ट रोल ऑफ टीव्ही.


जर्नालिझम ऑफ इम्पॅक्ट रोल ऑफ टीव्ही

अर्णब गोस्वामी

(अर्णब गोस्वामी यांनी पत्रकार व्यंकटेश चपळगांवकर स्मृति व्याख्यानाचं पहिलं पुष्प गुंफताना पुण्यात 12 एप्रिल 2010 रोजी दिलेल्या व्याख्यानाचा अनुवाद)

मला सुरुवातीलाच हे सांगितलं पाहिजे मी हा माझा बहुमान समजतो की पहिलं ’व्यंकटेश चपळगांवकर स्मृति व्याख्यान’ देण्यासाठी तुम्ही मला आमंत्रित केलंत. मी कधी व्यंकटेशला प्रत्यक्ष भेटलेलो नाही, पण त्याची चिंकारा शिकार प्रकरणाची बातमी कोणी कशी विसरेल? तुम्ही तुमच्या पत्रकारितेच्या करियरमध्ये अनेक बातम्या कराल, पण कोणाही पत्रकाराला त्याच्या स्वत:च्या एका बातमीबद्दल ओळखणं जाणं जास्त आवडतं जी त्याने धसास लावली. मी व्यंकटेशला भेटलो नसेन, आम्ही एका संस्थेत एकत्र काम केलं नसेल, पण मला त्याची चिंकारा शिकारीची बातमी माहित आहे. एका मंत्र्याला त्यामुळे राजीनामा द्यावा लागला होता. अनेकांची पत्रकारितेची करियर्स ३०-४० वर्षांची असतात, पण आपल्या इतक्या लांबीनं छोट्या करियरमध्ये संधीचा वापर करणं, आव्हान स्वीकारणं आणि सत्तेत असलेल्या बलवान लोकांच्या दबावाला झुगारून देत, किंबहुना तुम्हीच त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडणं, याच एका मोठ्या पत्रकाराच्या स्मृती 1 venkatesh small onÉ.JPGअसतात. माझ्या स्वत:च्या अनुभवांवरून मी हे ठामपणे म्हणू शकतो की व्यंकटेशसारखे पत्रकार हे खरा भारत सर्वांसमोर आणतात. जे पत्रकार आपल्या ध्येयाशी प्रामाणिक असतात, राष्ट्रीय स्तरावर चमकण्याअगोदर प्रादेशिक माध्यमांत ज्यांनी काम केलेलं असतं, त्यांच्या पत्रकारितेचा दर्जा हा दिल्ली-मुंबईत न्यूजरूममध्ये बसून जगावर लक्ष ठेवणाऱ्यांपेक्षा अत्यंत वरचा असतो. व्यंकटेश त्याच शोधपत्रकारितेचं प्रतिनिधित्व करतो जी आत्तापर्यंत फ़क्त प्रादेशिक माध्यमांनी जपली आहे.

पुन्हा सांगतो, चिंकारा शिकार प्रकरण ही काही स्थानिक बातमी नव्हती, ती एक देश हलवून सोडणारी बातमी होती. बीड सारख्या ग्रामीण भागातून येऊन थोडक्या काळात अशा आत्मविश्वासानं ही बातमी करणं, ही सच्ची पत्रकारिता.

इथं या सभागृहात अनेक पत्रकार आहेत, काही पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत. मी इतकी वर्षं पत्रकारितेत आहे, पण एक प्रश्न मला नेहमी सतावतो, की माझ्या पेशाची माझ्याकडून नेमकी गरज काय आहे? अपेक्षा काय आहेत? अनेक पत्रकारांची समस्या ही आहे की ते पत्रकारिता ही अन्य कोणत्याही नोकरीसारखी करतात. मी जेव्हा हा पेशा पत्करला तेव्हा मला सांगण्यात आलं की, अर्णब, काहीही झालं तरी तुम्ही वस्तुनिष्ठ असायला हवं. तुम्ही रस्त्याच्या एका बाजूला नव्हे तर कायम मध्यभागी चालायला हवं. कधीही चुकूनसुद्धा तुमची मतं प्रदर्शित करायची नाहीत, तुम्हाला काय वाटते हे बिल्कूल सांगायचे नाही. मी म्हणालो, ठीक आहे. पण या नियमाशी मला कायमच युद्ध करावं लागलं. मनात यावरून कायमच, बऱ्याचदा भावनिक, वादळं उठली. जेव्हा मी एका ढळढळीत सत्याच्या आणि ढळढळीत असत्याच्या समोर आहे, जेव्हा मला दिसतंय की एक काळं आहे आणि एक पांढरं, एक योग्य आहे नी एक अयोग्य, एक नैतिक आहे आणि दुसरं अनैतिक, अशा वेळी सुद्धा मी माझी मतं मांडायला नको का?

आज लोक मला म्हणतात की तुम्ही तुमच्या चॅनलवर अति मतप्रदर्शन करता. तुम्ही जास्त बोलता पाकिस्तानबद्दल. 000_arnab_goswami_web.jpgतुम्ही खूप मतं मांडता दहशतवादाबद्दल. नुकतीच त्यांची टीका होती ती आम्ही माओवाद्यांबद्दल जास्त मतं व्यक्त केल्याबद्दल. ते हेही म्हणाले की तुम्ही जास्तच अभिप्राय दिलेत भारतीयांवर ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वांशिक हल्ल्यांवर.

या टीकेनंतर मी माझ्या स्वत:शीच वाद घातला. आम्ही योग्य मार्गावर आहोत की अयोग्य? पत्रकारितेची लक्ष्मणरेखा आहे का आणि कोणती? का तुम्ही मतं व्यक्त करता? कशावर तुम्ही मतं व्यक्तं करता? आणि ती कधी करता? हेच ते प्रश्न आहेत ज्यांना मी रोज सामोरा जातो आणि लढतो.

आज जेव्हा मी ’जर्नालिझम ऑफ़ इम्पॅक्ट’ बद्दल बोलतोय तेव्हा मला आठवतंय ’टाईम’च्या एका संपादकांचं एक वाक्य. ते म्हणाले होते, " पत्रकारिता कधीही मौन राहू शकत नाही. हेच पत्रकारितेचं बलस्थान आणि कमजोरी आहे. पत्रकारितेनं आवाज उठवलाच पाहिजे जेव्हा आश्चर्याचे प्रतिध्वनी अजूनही उठताहेत, विजयोन्माद अजूनही निनादतोय, भयाची दुष्टचिन्हं हवेतून अजूनही पुसली गेली नाहीत."

एखाद्या आपत्तीनंतर दहा वर्षांनी आम्ही त्याविषयी मत व्यक्त करावीत का? पुण्यात बॉम्बस्फोट झाला, त्याविषयी काय वर्षभरानंतर बोलावं? बॉम्बस्फोट का झाला याचं विश्लेषण करायचं काम काय विद्यापीठांतल्या शैक्षणिक अभ्यासक्रमांवर सोडून द्यायचं?

0000000.jpgपुण्याच्या पत्रकारांनी, जे पुणे बॉम्बस्फ़ोटाचं रिपोर्टिंग करताहेत किंवा ते जे सामूहिक बलात्कार प्रकरणाचं रिपोर्टिंग करताहेत, त्यांनी फ़क्त बातमीदारी करावी? म्हणजे किती मृत झाले, किती जखमी झाले यांचे आकडे छापावेत आणि तिथेच थांबावं? त्या बॉम्बस्फ़ोटाची जहरी भयानकता, एका अबलेवरच्या बलात्काराची बोचरी घृणा आणि त्यामागून जाळत येणारी चीड, २६/११ चा मुंबईच्या रस्त्यांवरचा रक्ताचा सडा, दांतेवाडात माओवाद्यांनी केलेली रक्तलांछित कत्तल ही या पत्रकारांना जाणवूच नये? किंबहुना ती त्यांनी जाणवून घेऊ नये? दहशतवादी हल्ल्यांचे पाकिस्तानशी असलेले थेट संबंध, ऑस्ट्रेलियांतील हल्ल्यांमागे असणारे वांशिक संदर्भ, हे सारं मला माहित आहे. पण मी बोलायचं नाही. कारण, मी रिपोर्टर आहे. मी फ़क्त रिपोर्टिंगच केलं पाहिजे. म्हणजे माहिती संकुचित रूपात दिली पाहिजे. मतं विचाराल तर ते माझं काम नाही.

मित्रांनो, मला असं ठामपणे वाटतं की भविष्यातील पत्रकारिता, जर तिचा काही परिणाम, इम्पॅक्ट, व्हायचा असेल, तर पहिल्यांदा हे पत्रकारितेचे सध्या अस्तित्वात असलेले नियम बदलले पाहिजेत. कारण १५-१६ वर्षांपूर्वी जे नियम मला शिकवले गेले हे पुढच्या पिढीच्या पत्रकारितेसाठी गैरलागू आहेत. माझे स्वत:चे असे पाच नियम आहेत जे मी ’जर्नालिझम ऑफ़ इम्पॅक्ट’ साठी वापरत. पहिला, प्रामाणिक रहा आणि सर्वात कठीण प्रश्न विचारा. सगळ्यात अवघड. दुसरा, जर तुम्ही कायद्याच्या दृष्टीने चूक असाल, पण नैतिकदृष्ट्या बरोबर असाल तर हे जास्त महत्वाचं आहे की कायद्याच्या बाऊ करत बसण्यापेक्षा नैतिकतेची बाजू उचलून धरणं. तिसरा, नियम, विसरू नका की तुम्ही भारतीय आहात. पत्रकारितेत इतकीही तटस्थता आणू नका की तिच्यामुळे स्वत:चा देश तुम्हाला दिसणार नाही.चौथा, या देशातल्या, समाजातल्या ख-या ’न्यूजमेकर्स’ना आदर द्या तुमच्या पत्रकारितेत ना की ’रेटिंग्स’ला.पाचवा आणि शेवटचा नियम, समाजाची स्मृति जरी कमकुवत असली तरी आपली नसावी. जेणेकरून आजही लागू असलेल्या जुन्या गोष्टींची आपण पुन्हा समाजाला आठवण करून देऊ. या पाचही नियमांवर आपण जरा विस्तारानं बोलू. सगळ्यात कठीण प्रश्न विचारा.

एक एप्रिलला पुण्यात एका विवाहित एम बी ए महिलेवर सामूहिक बलात्कार झाला. अत्यंत हीन, घृणास्पद घटना, ज्याने या शहरातल्या महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभं केलं. मी आज तुम्हाला विचारतो की, हा सुभाष भोसले, एक ’हिस्टरीशीटर’ ज्याच्याविरूद्ध अकरा गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि तडीपारी सुद्धा बजावली गेली आहे, हा मोकाट सुटतोच कसा? हाच भारत आहे. तुम्ही कोणत्याही राजकारण्याकडे जा, म्हणा की पुढच्या निवडणुकीत मी तुम्हाला ४०० मतं आणून देतो आणि माझी तडीपारी रद्द करा. तर तो राजकारणी काय करेल, हे आपल्याला माहितीच असेल... आपल्याला हे माहित नाही का की एका माजी मंत्र्याने भोसलेची तडीपारी रद्द करून आणली? आता तो मंत्री हे म्हणू शकतात की मी नाही रद्द केली त्याची तडीपारी, ती तर एक कायदेशीर प्रक्रिया आहे. हो, मान्य आहे. पण या अशा प्रक्रियांपलीकडे एक कायद्याचं राज्य आहे ज्याचा फ़ायदा सामान्य माणसाला कधी होतच नाही. काय त्या अत्याचारित अबलेला, तिच्या कुटुंबीयांना विश्वास आहे की त्यांना न्याय मिळेल? पत्रकार म्हणून आपण किती मागे लागलो आपण या प्रकरणाच्या की ज्या कोणी व्यक्ती या भोसलेच्या तडीपारी रद्द होण्याला कारणीभूत असतील त्यांची नावं प्रकाशात आणली? आर आर पाटलांनी विधानपरिषदेत जाहीर केलं की हे प्रकरण आम्ही जलदगती न्यायालयात नेतोय. बस्स, संपलं? मित्रांनो, सगळ्यात कठीण प्रश्न विचारा. उत्तर मिळत नाही तोपर्यंत सतत विचारत रहा. तोपर्यंत प्रश्न विचारत रहा की या ’जबाबदार’ लोकांना तो टाळणं अशक्य होईल. वरवरची उत्तर फ़ेकली, जलदगती न्यायालयाचे कागदी घोडे नाचवले, एक दिवस विधानसभेत राजकीय ड्रामेबाजी केली की संपलं, मग आपल्याला कोण विचारतो अशा थाटात फ़िरणाऱ्यांना सतत प्रश्न विचारत रहा. पुण्याच्याच नयना पुजारी प्रकरणाचं पुढे काय झालं? ती अशाचं वासनेला बळी पडली होती ना? नॅशनल मीडीयाचं जाऊ द्या, पण पुण्याच्या-मुंबईच्या पत्रकारांपैकी किती जणांनी भोसलेची तडीपारी रद्द झालीच कशी हा प्रश्न अजूनही लावून धरलाय?

मी हा प्रश्न फ़क्त तुम्हालाच नाही विचारत, पण मला स्वत:लासुद्धा विचारतोय की, अर्णब, की सर्व शक्तीनिशी तू हा अवघड प्रश्न विचारलास का? परत परत विचारलास का ज्यामुळे अजून कोण्या बेजबाबदार व्यकीने राजीनामा दिला? माझा आजचा दुसरा मुद्दा. पत्रकार म्हणून बऱ्याचदा तुम्ही कायद्याच्या नजरेत चूक असाल पण नैतिकदृष्ट्या बरोबर असाल. घाबरू नका, नैतिकदृष्ट्या तुम्ही बरोबर असल्याच्या अभिमान बाळगा. माझ्या शो मध्ये मी राम जेठमलानींना बोलावलं. प्रकरण सुरु होतं रुचिका गिरहोत्राचं. जेठमलानी मला म्हणाले, "अर्णब, तुम्ही बेजबाबदार पत्रकार आहात, तुम्ही फ़क्त ’रेटिंग्ज’साठी काम करता. तुम्हाला साधं आर्टिकल ३०४ आणि ३०६ मधला फ़रक माहित नसतो. काहीही कायदेशीर बाबी माहित नसतात की आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं कलम रूचिका प्रकरणात लावता येतं किंवा नाही. तुमचा कायद्याचा अभ्यास तरी आहे का?" आता मला हेही माहित आहे की राम जेठमलानी जेसिका लाल केस बद्दल हेच म्हणाले होते आणि प्रियदर्शनी मट्टू केस बद्द्ल सुद्धा. बहुतांश पत्रकारांबद्दल असंच होतं, की जेठमलानींसारखे कोणी असे म्हणाले की आपण थांबतो. आपण स्वत:ला मागे खेचत स्वत:लाच जाणीव करून देतो की मी फ़क्त एक पत्रकार आहे आणि ते कायद्याचे एक्स्पर्ट आहेत. त्यांना कायदा माहित आहे, मला नाही. त्यामुळे जे काही ठरवायचे आहे ते कोर्टाला ठरवू दे. मग आपला आत्मविश्वास पार खचतो. रूचिका गिरहोत्रा प्रकरणात अगदी हेच झालं. माध्यमांचं एवढ्या प्रचंड प्रमाणात अस्तित्व या देशात इतक्या वर्षांपासून असताना आपण दहा वर्षांत एकदा तरी एस पी एस राठोड बद्दल ऐकलं का? रूचिकाचं नाव कोणी ऐकलं का? १९९० पासून पुढची नऊ वर्षं लागली सी बी आय ला या प्रकरणात आरोपपत्र दाखल करायला. या काळात रूचिकाचं कुटुंब देशोधडीला लागलं आणि या काळात जे तीन वेगवेगळे राजकीय पक्ष हरियाणात सत्तेवर आले ते या शक्तीच्या धुंदीत कायदा वापरणाऱ्या राठोडला बहुमान देत राहीले. कोणाला काही माहीत नाही. आणि अशाच एका सोमवारच्या वीकली मीटिंग मध्ये ही बातमी माझ्यासमोर आली. या सगळ्या प्रकरणाबद्दल जाणून घेतलं आणि मी स्वत:लाच शिव्यांची लाखोली वाहिली. मी, एक पत्रकार, काय करत होतो गेली दहा वर्षं? पदाच्या, शक्तीच्या माजात एक पोलिस अधिकारी संपूर्ण कायदा आपल्याला हवा तसा वाकवतो इतकी वर्षं आणि आपल्याला काही समजतही नाही? यावर कोणी विश्वास ठेवेल का? मी हरियाणातल्या माझ्या माहितीच्या सगळ्या पत्रकारांना फोन केले आणि विचारलं की काय झालं, आपण काय करत होतो इतकी वर्षं? ठरलेलीच उत्तरं येत होती, की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे..., जशी प्रगती होईल तसं करू ना रिपोर्टिंग. पण त्यात ती भावना कुठेच नव्हती, ती तीव्र चीड जाणवतच नव्हती जी हे प्रकरण मीडियानं उचलून धरल्यावर संपूर्ण देशाला जाणवली. बुरसटलेला विचार करून आपली वृत्तीच अशी झाली आहे की आपण पत्रकार म्हणून प्रतिक्रियाच देत नाही. पत्रकारच अशी उत्तरं द्यायला लागतात की... यह तो चलताही हैं...

पण एकदा ही केस उचलल्यानंतर तिनं, माझ्या मते, एका झटक्यात आपल्या मूलभूत व्यवस्थांवरच घाव घातले. त्यांचं खरं रूप प्रकाशात आणलं. पोलिस यंत्रणा, सरकारी प्रशासन, राजकारणी आणि दुर्दैवाने न्यायव्यवस्थासुद्धा.

म्हणून पुन्हा सांगतो, की जेव्हा दोन पर्याय असतील, तेव्हा मी नैतिकदृष्ट्या बरोबर असणं निवडेन कायद्यात अडकून बसण्यापेक्षा. आणि कोणतीही केस तुम्ही घ्या जी भारतीय पत्रकारितेतली उत्तम उदाहरणं म्हणून दाखवली जातात त्या प्रत्येकात हाच पर्याय अंतिमत: श्रेष्ठ ठरलाय. प्रियदर्शनी मट्टू मर्डर केस, १९९६ ची संतोष सिंग केस, संजीव नंदाची बी एम ड्ब्ल्यू हिट अँड रन केस, जेसिका लाल मर्डर केस, शिवानी भटनागर मर्डर केस, नितीश कटारा, सत्येंद्र दुबे, षण्मुगम मंजुनाथ, रिझ्वान-उर-रेहमान मर्डर केस... सगळीकडेच तेच. आम्ही कायद्याच्या दृष्टीनं चुकीचेच होतो. आम्हाला काय अधिकार कोणाला प्रश्न करण्याचा न्यायव्यवस्था असतांना? असे प्रश्न अजूनही आम्हालाही पडतात आणि अशी कित्येक प्रकरणं उजेडात येत नाहीत, कारण आम्ही घाबरतो. मी स्वत:सुद्धा याला अपवाद नाही. आम्हालाही भीती असतेच. पत्रकाराचं काम डिटेक्टिव्ह असणं नाहीय, पण सत्य शोधणं आहे. कोणत्याही तडजोडीविना. त्यामुळे कोणाला फ़ायदा होईल का, किंवा स्वत:ला फ़ायदा होईल का असा विचार न करता.

तिसरा मुद्दा. स्वत:च्या देशाकडे दुर्लक्ष करून नका, आंधळेपणाने वागू नका, विसरू नका की तुम्ही भारतीय आहात. तुमचे विचार स्पष्ट असले पाहिजेत आणि मतंही ठाम असली पाहिजेत की तुमचा देश कोणता. आणि मग तुमचा पक्ष हा तुमच्या देशाचा. पत्रकार म्हणून मी जे काही करेन त्यावर मी भारतीय असल्याचा प्रभाव असेलच. मी काही थिअरी मांडत बसणार नाही किंवा ३७ पानी निबंधही लिहिणार नाही जेव्हा माझ्या देशाच्या ७६ जवानांचं दांतेवाडा मध्ये शिरकाण केलं जात असेल. कोणत्याही भारतीयाला या घटनेचा राग येईल. मलाही राग येतो जेव्हा अचानक कोणीतरी दांतेवाडातून बाहेर येतं, ३७ पानी निबंध लिहितं आणि दावा करतं की ते खऱ्या भारताचं प्रतिनिधित्व करतात. कसं आणि का? कोणी या माओवाद्यांचं समर्थन कसं करू शकतं जे शिरकाण करत सुटले आहेत आमच्या भारतीय लोकांचं?

हाच सवाल लागू होतो भारत आणि पाकिस्तानच्या बाबतीत. या दोन्ही देशांबद्दल काहीही मुद्दा असेल आणि मी भारतीय असेल तर कसं काय मी स्वतःला या दोघांपासून समान अंतरावर ठेवणार...? या दोन्ही देशांपासून समान अंतर राखणं ही जर वस्तुनिष्ठतेची कसोटी असेल तर मला अभिमान वाटतो की या कसोटीत मी नापास झालो. मला माहित आहे मी कोणत्या भूमीवर आहे. जेव्हा भारत आणि पाकिस्तान अशी स्थिती असते, तेव्हा मी वस्तुनिष्ठ असूच शकत नाही. तुम्ही असाल का? हे अमेरिकन, तेच ब्रिटिश, तेच बी बी सी आणि सी एन एन जे आम्हाला वस्तुनिष्ठता शिकवतात, त्यांची विवेकबुद्धी कुठे गेली होती जेव्हा आखाती युद्ध सुरु होते? कोणतं अमेरिकन न्यूज चॅनल इराक आणि अमेरिका यांना समसमान मापत होतं आणि काळजी घेत होतं की सद्दाम हुसेन आणि अमेरिका यांना सारखा एअर-टाईम मिळेल युद्धाच्या काळात? यांनी आम्हाला समतोल पत्रकारिता शिकवावी? बी बी सी ने, ज्यांनी भारताविषयी रिपोर्टिंग कराताना इतकी चुकीची निरीक्षणं केली यांनी आम्हाला पत्रकारितेचे नियम शिकवावेत? मी या असल्या समतोल पत्रकारितेच्या व्याख्या नामंजूर करतो.

पण त्यांचं जाऊ द्या, त्यांना काय करायचं ते करू द्या. मला काळजी आपल्याबद्दल आहे. उदाहरणार्थ, नक्षलवाद. मी काही आकडे पाहत होतो. २००३ मध्ये ४५१ लोकांची माओवाद्यांनी कत्तल केली. हा आकडा ७०० पर्यंत पोहोचला २००५ साली. गेल्या वर्षी ११३४ निष्पाप लोकांना या क्रूर माओवाद्यांनी जीवानिशी मारलं. स्वत:लाच विचारा या कत्तलीचं आपण किती रिपोर्टिंग केलं? या देशातल्या मीडियाने नक्षलवादाच्या रिपोर्टिंगवर जणू काही एक सेन्सॉरशीपच लादली होती, कारण जेव्हा आपण निवडणुका कव्हर करण्यात किंवा आयपीएल कव्हर करण्यात मश्गूल होतो, तेव्हा माओवादी देशाला आतून पोखरत होते. जेव्हा माओवादी दहशतवाद फ़ैलावत होता, त्यावेळेस त्याविषयीच्या साऱ्या चर्चांमध्ये असे लोक वरचढ ठरले जे या रक्तरंजीत कत्तलीचं मानवी अधिकारांच्या नावाखाली समर्थन करत होते आणि दावा करत होते की हे तुमचं, म्हणजे समाजाचं मत आहे. आता मला सांगा, गेल्या पाच वर्षांत ५००० निष्पाप लोक मृत्यूमुखी पडताना तुमचं मत विचारलं गेलं का? आणि काय आहे तुमचं मत? जे ७६ सी आर पी एफ़ जवान परवा दांतेवाडात शहीद झाले, त्यांच्यापैकी कित्येकांना दोन ते तीन आठवड्यांचं ट्रेनिंग देऊन जंगलात पाठवलं गेलं आणि सांगितलं गेलं, की जा, लढा त्यांच्याशी जे एक सशस्त्र सुसंघटीत सैन्य आहे. काय आहे हे? आज जेव्हा मी असं म्हणतोय की देशाकडे दुर्लक्ष करू नका हा पत्रकारितेचा एक नियम आहे, तेव्हा मी स्वत:लाच हा प्रश्न विचारतो की आपण मौन का होतो? जेव्हा माओवादाची समस्या येते तेव्हा आपण मौन असणाऱ्या बहुमतातील नाही आहोत का? याचं कारण माहिती आहे? कारण अजून माओवाद अजून आपल्या शहरांपर्यंत येऊन थडकला नाहीये. सुदैवाने असं होऊ नये, पण माझ्यावर विश्वास ठेवा, आपल्या कोणत्याही शहरात एखादा माओवादी हल्ला होऊ द्या, त्याला प्रतिसाद देण्याची आणि प्रतिकाराचीही पद्धत पूर्ण बदलेल. आज आपल्याला वाटतंय की हे आपलं नसून दुसऱ्या कोणाचं तरी युद्ध आहे, कुठेतरी दुर्गम भागात होतंय आणि ते लढताहेत.

शायनिंग इंडियात राहणाऱ्या आपल्याशी त्याचा काय संबंध, असं अजूनही इथल्या पत्रकारांना वाटतंय. म्हणून मी परत एकदा अभिमानाने सांगतो, की जेव्हा देशाचा संबंध येतो तिथे मी वस्तुनिष्ठता फ़ेकून देतो आणि मला वाटतं प्रत्येक भारतीय पत्रकारानं तसं असावं. माझा चौथा नियम स्पष्ट करण्यापूर्वी मला स्वत:ला आलेला एक अनुभव तुम्हाला इथं सांगायचाय. ३१ जुलै २००७ ला मला एक फ़ोन आला, जेव्हा आम्ही वेड्यासारखे, अक्षरश:वेड लागल्यासारखे संजय दत्त अटक प्रकरण कव्हर करत होतो. त्याला मुंबईहून पुण्याला आणताहेत... पाच रिपोर्टर्स... पाच कॅमेरे... गाडीच्या सगळ्या बाजूंनी... पहिले शॉट्स... ब्रेक द व्हिज्युअल्स... एक्सक्लुझिव... जेव्हा तुम्ही टेलिव्हिजनसाठी अशी स्टोरी करत असता तेव्हा या जगात तुमच्यासाठी दुसरे काही नसतेच. प्रामाणिकपणे सांगतो, ब्रेकफ़ास्ट-लंच-डीनर, फ़क्त संजय दत्त. मला सोडून दुसऱ्या कोणालाही संजय दत्तचा साऊंड बाईट मिळाला असता तर मी पश्चातापाने आत्महत्याच केली असती. असा वेडेपणा आम्ही साजरा करत होतो. आणि अशा गदारोळात मला त्या व्यक्तीचा फ़ोन आला.

v ते मला म्हणाले, " अर्णब, मी तुझा शो बघतो, तुझं करियरही मी पाहिलंय. मला त्याबद्दल अभिमान वाटतो. पण यापुढे तुमचं चॅनल मी पाहणार नाही. तुम्ही माझा अपेक्षाभंग केलाय. मान खाली घालायला लावली आहे." हे त्यांचे नेमके शब्द आहेत जे माझ्या अजूनही लक्षात आहेत. मी त्यांना विनंती केली की जरा विस्तारानं सांगा की तुम्ही का असं म्हणताय. मग ते बोलायला लागले. त्यांचे सगळ्यात जवळचे मित्र कर्नल वसंत वेणुगोपाल ३१ जुलै २००७ रोजी त्यांच्या पाच साथीदारांसहित उरी सेक्टरमध्ये शहीद झाले होते. कर्नल वेणुगोपाल यांनी घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांशी यशस्वी लढत दिली होती. त्यांनी सगळ्या घुसखोरांना यमसदनाला धाडलं होतं आणि मगच स्वत:चे प्राण सोडले होते. मित्रांनो, त्या दिवसापासून फ़क्त दोन आठवड्यांनी ४६ वर्षांचे कर्नल बसंत निवृत्त होणार होते. हा तोच दिवस होता ज्या दिवशी सगळा मीडिया संजय दत्तच्या मागे होता, कोणीही ती स्टोरी सोडायला तयार नव्हतं. त्यावेळी आम्हाला हे माहितीही नव्हतं की सीमेवर असं काही घडंतं आहे. मी क्षणभर बधीर झालो. त्यांना विचारलं की मी काय करू शकतो? ते फ़क्त म्हणाले, " या माणसाने देशासाठी बलिदान केलं असतांना तुम्ही त्याचा साधा उल्लेखही केला नाहीत." मी ठरवलं की आज माझ्या शो ची सुरुवात मी कर्नल बसंत यांच्या बलिदानाच्या बातमीने करणार. ज्यांनी मला फ़ोन केला त्या गृहस्थांनाही, जे पेशानं वकील होते, मी स्टुडिओत बोलावलं. रात्री शो सुरु होण्यास पाच मिनीटं होती. मी माझ्या प्रोड्युसरला विचारलं की ते गृहस्थ आले आहेत का. तो म्हणाला, हो, ’त्या’ आल्या आहेत. मी विचारलं, ‘त्या’?. प्रोड्युसर म्हणाला, हो, कर्नल बसंत यांच्या पत्नी आल्या आहेत. मला धक्काच बसला. काय बोलावं सुचेना. पाच तासांपूर्वी ज्यांनी आपल्या पतीचे अंत्यसंस्कार केलेत त्या स्वत: स्टुडिओत आल्या आहेत? खरं सांगतो, त्या दिवशी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी दुसरा प्रश्न विचारला नाही. त्या सलग आठ ते नऊ मिनीटं बोलत होत्या. वि़चार करा की काय वादळं उठत असतील त्यांच्या मनात. काय काय सांगायचं असेल त्यांना. पण आमच्याकडे यासाठी जागा नव्हती, वेळ नव्हता. तो होता फ़क्त संजय दत्त साठी. या विरोधाभासी अनुभवानं माझं आयुष्य बदललं. यात काही लपवण्यासारखं आता राहिलं नाही की माझा पेशा हा आता अधिकाधिक स्वार्थी होतोय. आम्ही त्यापायी पत्रकारितेचा अजेंडा गढूळ करून टाकलाय. तो आम्हाला पुनर्प्रस्थापित करावा लागणार आहे. याचाच अर्थ खऱ्या न्यूजमेकर्सचा आदर करा, रेटिंग्सचा नको , खरे न्यूजमेकर कर्नल बसंत आहेत, संजय दत्त नव्हे. सध्या आपण कायम पर्सनॅलिटीज, एन्टरटेन्मेंट, स्पोर्ट्स आणि स्कँडल्स या चौकोनात अडकलो आहोत, त्यातून बाहेर पडायला हवं. पाचवा आणि शेवटचा नियम. समाजासाठी एखादी घटना लगेच विस्मृतीत जात असेल, पण पत्रकाराची स्मरणशक्ती पक्की हवी. त्यासाठीच फ़ॉलो-अप्स, पाठपुरावा. अनेकदा तुम्हाला विचारलं जात असेल की क्या है फ़ॉलो-अप? लोगों को आज की स्टोरी आज चाहिये कल की स्टोरी कल. पण ते चुकीचं आहे. आपण पाठपुरावा का करत नाही? उदाहरणार्थ नुकतीच आम्ही केलेली हरियाणातली खाब पंचायतींची बातमी. करनाल जजमेंट आलं तेव्हा ही अघोरी प्रथा समोर आली, पण या अशा परंपरा काय कामाच्या? एका गोत्रात लग्न केलं म्हणून आपल्याच समाजातल्या मुला मुलींना कापून फ़ेकून द्यायचं? आम्ही जेव्हा यावर चर्चा केली आणि राष्ट्रीय राजकीय पक्षांच्या नेत्यांना बोलावलं तेव्हा तोंडदेखलं त्यांनी कर्नाल जजमेंटचं स्वागत केलं, पण नंतर हळूच म्हणतात की तुम्ही या वर्षांपासून चालत आलेल्या परंपरांचा मान मात्र राखला पाहिजे. कोणताही राजकीय पक्ष या प्रथा बंद का पाडत नाही, किंबहुना आम्ही त्यांना विरोध करायला भाग का पाडत नाही? त्यासाठी पाठपुरावा, पाठपुरावा. मला कायम असं वाटतं की आत्मविश्वासाची कमतरता, पत्रकार म्हणून आपली हानी करते आहे. आपण कायम चार पावलं मागे येतो. काय आपलं काम फ़क्त माईक त्यांच्या तोंडापाशी धरणं आणि ते काय म्हणतील तसं लिहून घेणं हेच आहे का?

मला परत हेच ठासून सांगायचं आहे की आपण बदल घडवून आणू शकतो. मीडियाचं काम काही आपापसात स्पर्धा करणं हे नाही आहे. मी काही फ़ार आदर्शवादी होत नाही, पण मागे हटण्यापेक्षा जर आपण सगळ्यांनी मिळून हे मुद्दे पुढे रेटले असते तर खाब पंचायत झाल्या नसत्या, माओवादाविरुद्ध प्रतिकार वाढला असता जर आपण त्याकडे दुर्लक्ष न करता वास्तव रिपोर्टिंग केलं असतं, राठोड यापेक्षा खूप अगोदरच गजाआड गेला असता आणि सुभाष भोसलेची तडीपारी रद्द झाली नसती कारम त्याला शिफ़ारस देणाऱ्या मंत्र्याच्या मनात मीडियाबद्दल धाक राहिला असता..

शेवटी, ’जर्नालिझम ऑफ़ इम्पॅक्ट’ साठी हवी चीड जे चुकीचं आहे त्याविरूद्ध. दुसरं म्हणजे झोकून देऊन काम करण्याची वृत्ती जी आपली चीड जागृत ठेवेल. आणि ही वृती जोपासण्यासाठी पत्रकारितेतल्या सीनियर्स जबाबदारी मोठी आहे. अन्यायाविरूद्ध आवाज उठवण्याच्या वृत्तीचं रोपण सीनियर्स कडून तेव्हाच झालं पाहिजे जेव्हा २० वर्षांचा युवक वा युवती पत्रकारितेत प्रवेश करतात. मला वाटतं हीच व्यंकटेश सारख्या पत्रकाराला खरी श्रद्धांजली ठरेल.

बुधवार, २१ ऑगस्ट, २०१३

गणपती बाप्पा मोरया.


| आवर्जून वाचाच | खास तरुणांसाठी | सदर मचकूर कुणाच्या भावना दुखाव्या या हेतूने लिहिला नसून आपण आपल्या भावनांना आवर घालून बुद्धीच्या जोरावर जग जिंकावे आणि वैचारिक गुलामीतून बाहेर पडावे यासाठी लिहीत आहे.

आपल्या कडू, गोड, आंबट, तिखट, तुरट सर्व प्रतिक्रियांचा स्वीकार केल्या जाईल, आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. आपण गणपतीच्या कालाय एक घोषणा नेहमी ऐकतो - 'गणपती बाप्पा मोरया' आज सहज कॉलेज मध्ये असताना ही घोषणा ऐकली आणि लिहावे वाटले. मला एक गोष्ट कळत नाही, एखाद्या व्यक्तीला जर त्याच्या वेगवेगळ्या नावाने हाक मारली तर ती घोषणा होऊ शकते काय ?

प्रत्येकाला अनेक नावे असतातच.. घरचे नाव, शाळेतले, मित्रांमधले..... पण आपण कधी त्याला हाक मारताना असं म्हणतो का ? - काय रे सोन्या, मोन्या, चिंटू, बंडू, बबलू, दादा, भैया...... काय चालले आहे ? नाही ना ? कोणत्या तरी एकाच नावाने हाक मारतो.. बरोबर ना ?

मग गणपती, विघ्नेश्वर, मंगलमूर्ती, बाप्पा, मोरया.... हो सर्व गणपती ला दिलेली नावेच आहेत ना ? मग 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया' ही घोषणा कसकाय होऊ शकते ? ती तर गणपतीची विविध नावे आहेत ? मग घोषणा म्हणून का वापरायचे ? कुणी म्हणेल कि देवाचे आहे, काही बोलायचे नाही, पाप लागते... नाही विषय देवाचा नाही.. विषय तुमच्या मनावर आणि बुद्धीवर असणाऱ्या गुलामीचा आहे. वैचारिक गुलामीचा... परीक्षेच्या वेळेस कुत्र्यागत अभ्यासाच्या मागे लागणारे गुलाम एव्हड्या छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा कधी विचार करत नाही. कारण एकाच आम्हाला कुणी सांगितलेच नाही, कधी विचार करायचा असतो, कशावर चिंतन करायचे असते आणि चिकित्सा तर कशासोबत खातात हेच आजकालच्या तरुणांना माहिती नाहीये.

खरतर 'गणपती' या शब्दाचा अर्थ असा आहे- गण म्हणजे फौज, किंवा ग्रुप.. आणि त्याचा नायक.. त्याचा अधिपती म्हणजे गणपती.. इतिहासात कधी काळी माणूस म्हणून लढाया झाल्या असतील. त्याला तुम्ही आम्ही देव म्हणून पुजायला लागलो. आणि एकदाका माणूस देव झाला कि त्याच सगळ कर्तुत्व संपत असतं. म्हणून मनुवादी लोक तुमच्या सगळ्या महापुरुषांना देव करण्याचा अट्टहास करतात. मग अगदी शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा देव करण्याचे प्रयत्न झाले. त्यांना कुणाचे ना कुणाचे अवतार ठरविण्याचा प्रयत्न झाला. अजूनही होत आहे. देव आणि अवतार न मानणाऱ्या गौतम बुद्धांनाही देवाचा ९ वा अवतार ठरविण्यात आले.

असे का व्हावे ? कोण करत हे सगळ ? कशासाठी करतात ? याचा आपण विचार केला पाहिजे. भारतातील मनुवादी लोक, विषेत: बामन मंडळी हा प्रकार करताना दिसतात. त्यांनी असे का करावे ? याचे मुख्य कारण म्हणजे देव आणि मंदिर आणि त्यातून मिळणारा पैसा हा त्यांचा मुख्य धंदा आहे. त्यांची रोजगार हमी (business without income tax) आहे. आणि मुख्य म्हणजे मनुवाद्यांना वैचारिक गुलामगिरी तुमच्यात लादायची आहे. आणि जवळपास भारतात त्यांनी ते साध्य केलेले आहेच. कारण आजच्या पिढीतील तरुण कोणत्याही बाबतीत विचार करायला तयार होतच नाहीये. कोठेही तर्क लावायला तयारच नाहीये. आणि त्यांना आता मी जो मुद्दा घेतला त्या बद्दल बोललं तर म्हणतात कि तुम्ही देवा-धर्माला शिव्या देतात.. आता यात काय आला देव आणि धर्म ? तुम्ही वैचारिक गुलाम आहात हे मान्य करण्या ऐवजी आम्हालाच गालबोट लावता.

यांना कोण बोलणार ? आपल्याला काय सांगितले ? गणपतीचा जन्म कसा झाला ? तर पार्वतीमाता ह्या स्नानासाठी गेल्या होत्या आणि दरवाजा बाहेर security म्हणून त्यांनी त्यांच्या शरीराला असणाऱ्या मळापासून एका मुलाला जन्म दिला. जरा विचार करा असं कधी होते का हो ? आणि मुख्य म्हणजे पार्वतीमातेच्या शरीराला काय एव्हडा मळ होता का ? किती बदनामी आहे पार्वतीमातेची ? एका स्त्रीची किती बदनामी आहे ? असे असून सुद्धा आम्ही कधी आम्हाला ज्यांनी ह्या भाकड कथा सांगितल्या त्यांना कधी प्रश्न विचारले नाही. का नाही विचारले ? कारण तुमच्या डोक्यात भूत घालून दिलेले होते कि देवाचे आहे, असं बोलायचं नसत. देवाची चिकित्सा करायची नसते. पाप लागत. किती दिवस अजून ह्या वैचारिक गुलामीत जगणार आहात ? आणि पार्वतीमातेच्या bathroom ला काय दरवाजा नव्हता का ? काय चालले आहे ? किती बदनामी करतात एका स्त्रीची ? ते सर्व तुम्हाला चालत... पण खर बोलायला गेल कि मग म्हणतात कि आमच्या भावना दुखावतात.. आणि नंतर काय तर म्हणजे महादेव त्या ठिकाणी आले आणि गणपतीने त्यांना अडविले म्हणून मुंडके कापले. का ? शंकराला एव्हडा काय आतताईपणा ? कि पुन्हा कधी भेटच होणार नव्हती ? कि पार्वतीमातेचे स्नान होई पर्यंत वाट बघवत नव्हती ? काही पण काय बाजार मांडला आहे ? किती बदनामी चालू आहे.. आणि तुम्ही-आम्ही ही बदनामी देव-देव-देव ह्या नावाखाली वर्षानुवार्षे सहन करत आहोत. आणि शंकर यांना मग जे मुंडके उडविले तेच का नाही बसविता आले ? हत्तीचेच का बसविले ? आणखी विद्रूप करायला का ? आणखी बदनामी करायला का ? काय चालेल आहे ? आणि तुम्ही सुद्धा हे मुकाट सहन करता कारण तुमच्या-आमच्या डोकात भरलेले आहे. देवाचे आहे काही बोलायचे नाही.. देवाचे आहे, पाप लागत.. देवाचं आहे... अहो तुम्ही वैचारिक गुलाम आहात आधी ती गुलामी दूर करा मग बघू कसकाय भावना दुखावतात ते. आम्ही माणूस नाही का ? आम्हाला भावना नाही का ? आहे ना ? मग तुम्ही आम्ही काय वेगळे आहोत काय ? मग कशाला असली फालतू करणे देता ? जरा विचार करा.. का म्हणून आपण ही गुलामी स्वीकारायची ? उगाच एखाद्या देवाच्या नावाने हाता-पायामध्ये धागे-दोरे बांधायचे.. का म्हणून ? एक दोरी तुमचे रक्षण करणार आहे काय ? दोरी साठी कच्चा माल पुरवितो शेतकरी, त्याला विकतो व्यापारी, विकत घेणारी कंपनी, आवश्यक बदल करणारी कंपनी, त्याला काळा, भगवा रंग देणारे पेंटर आणि परत त्याला बाजारात विकणारा दुकानदार आणि त्याच्यावर जंतर-मंतर-छू करत मंत्र फुकणारा बामन.. हे तो धागा बनवत असताना फक्त आणि फक्त त्यांच्या धंद्याचा विचार करत असतात. कोणत्याही देवाचा किंवा तुमच्या श्रेद्धेचा किंवा ज्या भावनेच्या नावाखाली तुम्ही वैचारिक गुलामी बाळगली आहे ना ? त्याचाही ते विचार करत नसतात ? मग का म्हणून बांधायचे गुलामीचे धागे-दोरे ? कोणत्याही देवाने तुम्हाला स्वतःहून प्रकट होऊन सांगितले का कि माझा अमुक कंपनी ने एक खूप सुंदर धागा बनविला आहे, तेव्हडा बांध.. मी तुझे रक्षण करतो.. असे म्हणाला का कोणता देव ? नाही ना ? मग तुम्हाला हे सर्व कोणी सांगितले ? तर वर दिलेल्या व्यापारी, दुकानदार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बामन लोकांनी... आणि तुम्ही सुद्धा त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, कारण आमच्या डोकात पक्के फिट्ट आहे. देवाच्या बाबतीत काही बोलायचे नाही. यार देवाला असं म्हणू नये ? अरे देवाचं आहे ते त्यात काही शंका घेऊ नये, देव तुला माफ नाही करणार तू असं बोलला तर ? हेच ऐकता ना तुम्ही ? आणि बोलता सुद्धा.. कशासाठी ? दुसरे कोणतेही कारण नाही तुम्ही फक्त आणि फक्त तुम्ही वैचारिक गुलामगिरी enjoy करत आहात.

तुम्हाला फक्त काय चांगल वाटत ? तर एखादा सलमान, शाहरुख समोर असतो.. त्याच्या विरुद्ध ५०-१०० गुंडे असतात.. त्याला मारत असतात आणि मग अचानक कोठून तरी आभाळातून त्याच्या हातात एक locket पडते आणि त्याच्यात ताकद येते आणि तो लगेच सर्वांना मारतो. पण तसले locket बनविणारी कंपनी त्या शाहरुख, सलमान ला किती पैसे देते याचा कधी विचार केला का तुम्ही ? त्यांनी कधी तुमच्या देवांचा आणि तुमच्या भावनांचा विचार केला का ? आणि आम्ही सांगयला गेलो कि आम्हाला बोलतात. सोडून द्या आता हे सगळे प्रकार, गुलामीत किती दिवस जगणार ? जरा स्वतंत्र व्हा.. तुम्ही ज्या जगात राहत आहात ते फक्त आणि फक्त गुलामीचे आणि गुलामांचे जग आहे. आणि ही गुलामी कोठून आली ? तर लहानपानापासून तुम्हाला जे काही भाकड कथा असणारे ग्रंथ आणि पुराने भटजीने घरी येऊन पारायण करून ऐकविले त्यातून... तुम्ही अक्कलशून्यासारखे जे मनुवादी सिनेमा बघतात त्यातून... देवाच्या नावाने जे धंदा करतात त्या मंदिरातून.. आणि तुमच्या अवती भोवती असणाऱ्या गुलाम परिसरातून.. तुम्हाला गुलाम बनविण्यासाठी..

आणि मग सगळ्यात powerful हत्यार कोणते तर ? तुमचे महामानव नाहीतर देव.. आणि त्यांचा धंदा मात्र जोरात चालू... खरतर आपण विचार केला पाहिजे भारतात जे काही सिनेमा बनतात त्यातील बहुतेक देवावर बनतात, त्या वेळेस ते बनविणारे आणि त्यात काम करणारे हे फक्त त्यांच्या धंद्याचे बघत असतात. पण कधी आपल्या महापुरुशांवर जागतिक पातळीवरील सिनेमे बनविले का हो यांनी कधी ? निदान ज्यांच्या मुळे भारताला शिक्षणाची गंगा मिळाली त्या महात्मा फुले यांच्यावर आजवर किती चित्रपट निघायला हवे होते ? किती मालिका असायला हव्या होत्या ? पण नाही. तसे होत नाही.. शिवाजी महाराज ज्यांना संपूर्ण जगणे वंदन केले आहे त्यांच्यावर तरी आजवर एखादा राष्ट्रीय पातळीवर चालेल असा एकतरी खरा चित्रपट निघाला आहे का ? नाही.. कारण त्यामुळे समाज सुधारतो, विचार करतो आणि गुलामीतून मुक्त होतो. पण तसे होण्या ऐवजी उलटेच कारण मनुवाद्यांना तुम्हाला गुलाम करायचे आहे. अहो कितीतरी मंदिरांमध्ये स्त्रियांना प्रवेशच नाही, का ? त्यांना आजही धर्माचे अधिकार नाही, का ? याचे उत्तर सोपे आहे.. स्त्री गुलाम झाली कि कुटुंब गुलाम होते. कुटुंब गुलाम झाले कि समाज आणि मग राष्ट्र गुलाम होते. शेवटचे सांगतो, वैचारिक गुलामांनो, आपली गुलामी enjoy करणे बंद करा. आणि जरा स्वातंत्र्याच्या मार्गावर चालायला लागा. वैचारिक गुलामगिरी झुगारून द्या.

आतापर्यंत झाले ते खूप झाले.. पण या नंतर मात्र आपन गुलाम राहू नका. स्वतंत्र व्हा.. स्वातंत्र व्हा.. हाता-पायात आणि मुख्य म्हणजे तुमच्या मेंदूत असणारे गुलामीचे धागे दोरे काढून टाका..

टीप : हा लेख कुणाला उद्देशून लिहिला नसून वाचकाच्या मनावर आणि बुद्धीवर योग्य प्रकारे बिंबावा अश्याप्रकारे लिहिला आहे. हा लेख वाचल्या नंतर आपण जर खरोखरच आपल्या हात-पाय आणि मेंदू मधील वैचारिक गुलामीचे धागे-दोरे फेकून दिलेले असतील तर मला एक फोन अवश्य करा आणि आपली प्रतिक्रिया द्या.

मंगळवार, ३० जुलै, २०१३

मुली कशा पटवाव्या…Don't mind Girls..


मराठी मुलं किंवा मुली तसे जरा फास्टंच असतात प्रेमात पडण्याच्या बाबतित. तशीही प्रत्येकाचिच इच्छा असते एकदा तरी प्रेमात पडावं. युजवली जवळपास ९० ट्क्के मुलं ही ‘तुझं आहे तुज पाशी, परी तु जागा चुकलाशी’ या उक्ती प्रमाणे आपलं ‘प्रेम’ कुठे आहे ते ओळखु शकत नाहीत,ते वेळेवर न ओळखल्य मुळे त्या प्रेमाचं कुठे तरी लग्नं ठरतं आणि मग हात चोळत बसावं लागतं. प्रेम कोणावर करावं हा तर सगळ्यात मोठा कधिही न सुटणारा प्रश्न. सगळ्यात सोपं म्हणजे बालपणीची मैत्रिण.. ही म्हणजे अगदी सेफ असते. पण होतं काय, की ज्या मुलिला ( मुलिंच्या बाबतित मुलाला) लहान पणी शेंबुड पुसतांना आणि चड्डीची नाडी लोंबतांना पाहिलं असतं, मोठा झाल्यावर त्याची / किंवा तिची ती नाक पुसणारी प्रतिमा काही विसरली जात नाही, त्या मुळे सुरवंटाचं फुलपाखरु झालंय हीच गोष्ट दुर्लक्षली जाते.. ही गोष्ट बहुतेक ९९ ट्क्के लोकांच्या बाबतित खरी असते, अगदी एक टक्का लोकंच या सुरवंटाचं फुलपाखरात झालेलं रुपांतर ओळखू शकतात, आणि खरं सांगतो, तेच लोकं खरे शहाणे असतात. प्रत्येकच मुलगा कॉलेज मधे गेला, की हिंदी सिनेमातल्या हिरो प्रमाणे एखादी सुंदर मुलगी आपल्या प्रेमात पडणार असं त्याला वाटु लागतं. कधी बरोबर ट्रेक ला गेलो, किंवा कधी एकत्र सिनेमाला गेलो की स्वर्गाला हात पोहोचल्या सारखे वाटतात. जाउ दे.. वर जे लिहिलंय ते माझे विचार आहेत.. पण …बाळ सामंतांची एक कथा वाचली होती.. की मुली कशा पटवाव्या म्हणुन. हा लेख म्हणजे प्रेम करणाऱ्यासाठी एक रेडी रेकनर होऊ शकतो , असं वाटलं म्हणुन थोडक्यात इथे त्यातलेच मुद्दे घेउन लिहितोय. आरडी मधे जशी कंडेन्स्ड कादंबरी असते तसं. मागच्या वर्षी अवाज ने ५० वर्षं पुर्ण झाल्याबद्दल एक सिलेक्टिव्ह लेख असलेला अंक काढला होता . त्या मधे दरवर्षीचा उत्कृष्ट लेख त्यात इन्क्लुड केला होता. त्या अंकामधे हा लेख वाचण्यात आला.१९६५ सालच्या आवाज मधे आली होतं हे छापुन.मुळ लेख आहे १९६५ चा तेंव्हा कालानुरुप थोडे बदल केले आहेत लिहितांना. आता यात दिलेल्या कलुप्त्या या फार जुन्या काळच्या आहेत.. तरी पण आजही त्या पर्फेक्ट ऍप्लिकेबल आहेत.यातल्या बऱ्याचशा युक्त्या या मराठी कथा कादंबऱ्यांमधे वापरलेल्या आहेत, त्या मुळे कदाचित तुम्हाला असंही वाटेल की हे काय… हे तर सगळं माहितीये आम्हाला….

१) बसमधे आपल्या शेजारी बसलेली आणि नेमकं तिकिट काढण्यासाठी तिच्याकडे सुटे पैसे नसणं, आणी तो खविस कंडक्टर सुटे पैसे द्या नाहितर खाली उतरा असं म्हणणार, तेवढ्यात तुम्ही जवळचे सुटे पैसे काढुन देता आणि……पुढे तुमच्यावर अवलंबुन कुठपर्यंत केस नेता ते. २)ट्रेनमधे भरपुर मराठी वाचनिय साहित्य घेउन चला, नशिबाने समोर एखादी सुंदरी असली, तर ती नक्कीच तुम्हाला अहो, ते पुस्तक जरा देता कां वाचायला म्हणुन पुस्तक मागेल, आणि मग ओळख …. वगैरे….

३) खुप लोकप्रिय सिनेमाची तिन तिकिटे काढावी. सिनेमा हाउस फुल्ल जाणार आहे याची खात्री करुनच हे काम करा. सिनेमा सुरु व्हायची वेळ झाली की बाहेर कोणाची तरी वाट पहातोय असा आव आणा, आणि सारखं घड्य़ाळाकडे बघत रहा. हाउस फुल्ल चा बोर्ड लागला की दोन सुंदर तरुणी , ज्यांच्याकडे तिकिटं नाहित अशांना हेरुन त्यांना तिकिटं आहे त्याच किमतित ऑफर करा.. आणि सांगा की आमचा मित्र यायचा होता पण आला नाही म्हणून…. आता इथे दोन तिकिटंएक्स्ट्रॉ कशाला??? तर याचं कारण म्हणजे मुली एकट्या कधिच सिनेमाला जात नाह्ति, एक तर बॉय फ्रेंड तरी असतो, किंवा एखादी मैत्रिण तरी असतेच.तुम्ही मैत्रिणी बरोबर आलेल्या मुलिचा शोध घ्यायचाय हे ध्यानात ठेवा.. जर एकही मुलगी भेटली नाही , तर तीच तिकिटे.. मी ब्लॅक मधे घेतली आहेत असं म्हणुन चढ्या किमतित कुणाही माणसाला विकुन टाका.

४)टॅक्सी साठी उभे आहात, आणि बऱ्याच वेळानंतर टॅक्सी आली की टॅक्सि हायर करुन तिला लिफ्ट ऑफर करा..

५)मुंबईला मरिन लाइन्स वर फिरत असतांना एकदम जोरात पाउस येतो, आणि नेमकी तुमच्या समोर एक सुंदर ललना तयार होऊन कुठे तरी जात असते, जवळपास कुठेच आडोसा नाही, तेंव्हा प्रवास करतांना नेहेमी मोठ्ठी छत्री घेउन चला काय सांगावं कधी उपयोगी पडेल ते??…..

६) एखादी आपल्या घराच्या आसपास रहाणारी सुंदरी हेरुन ठेवा. तिची रोजची प्रवास करण्याची गाडी हेरुन ठेवा, आणि तुम्ही पण शक्यतो त्याच गाडिने प्रवास करा. एकदा तुम्ही स्टेशनवर उतरलात की शेअर रिक्शा वगैरे साठी ऑफर करु शकता. तिच्या येण्याच्या वेळांचे पण पालन करा. म्हणजे पुढे जमण्याची शक्यता जास्त असेल.

७)मुलिंमधे धार्मिक प्रवृत्ती फार वाढिस लागलेली आहे , त्यामुळे सिध्दिविनायक, साईबाबा इत्यादी चलतीच्या देवांच्या मंदिरात जाणं सुरु करा. चेहेऱ्यावर शक्य तेवढे बावळट भाव ठेउन हातात, फुलांची परडी घेउन रांगेत अशा तर्हेने उभं रहा, की तिच्या नजरेस तुम्ही पडाल.एकदा तिचा विश्वास बसला की तुम्ही इतरांसारखे नाही, तेंव्हा हळुच ओळख वाढवायला हरकत नाही. अरे वा…. तुम्ही पण येता कां सिध्दी विनायकाला?? जागृत देवस्थान बरं कां.. असं म्हणत मंदिराच्या कळसालाच बघुन हात जोडा आणि पुढे तुमच्याच हातात आहे सगळं….

८)गणपती विसर्जन ,दहिहंडी अशा इव्हेंट्स कधिच चुकवु नका.अशा प्रसंगी मुलिंना बाहेर फिरायला खुप आवडतं.

९) टीपिकल मराठमोळ्या मुली या नाटकालाच भेटतातच, इथे पण तशिच दोन तिकिटं एक्स्टॉची आयडिया उपयोगी पडु शकते.

१०)दुचाकी वर लिफ्ट द्या. शक्य होईल तेंव्हा मी तिकडेच जातोय, चला तुम्हाला सोडुन देतो, असं म्हणुन लिफ्ट द्यावी. हल्ली चेहेरा ओढणिने झाकुन प्रवास करण्याची पध्दत आहे, म्हणजे कोणी ओळखेल याची भिती नसते.


मुलींचे प्रकार किती तरी असतात . प्रत्येक प्रकारच्या मुलिंशी मैत्री करण्याचे हातखंडे पण वेगवेगळे असतात.

१)स्कॉलर मुली, ज्या केवळ वाचन, अभ्यास यामधेच इंटरेस्ट घेतात त्या.तुम्ही पण शुन्य नंबराचा चष्मा लाउन अभ्यासु आहात असा आव आणला, आणि तिला मला ते मेकॅनिक्स फारच जड जातंय हो, किंवा मला सी प्लस जरा समजत नाही, कारण माझं १२वीला व्होकेशनल नव्हतं म्हणुन.. वगैरे म्हणावं आणि मदत मागावी.

२)वांड्गमय प्रेमी , अशा मुलिंना पुलं , वपु, अशा लेखकांच्या फॅन असतात.यांना गटवायचं असेल, तर तुमचं पण त्या विषयातलं ज्ञान भरपुर असायला हवं, जर तुम्हाला पण अशा लेखकांच्या किमान काही पुस्तकांची नावं माहिती असतिल तर या प्रकारातल्या मुलिंशी गप्पा मारता येतात, आणी तदनंतर प्रेम पण करता येउ शकतं. तुम्हाला त्या लेखकांची काही पुस्तकं तरी वाचाविच लागतिल, म्हणजे कधिही डिस्कशनचा मुद्दा निघाला की तुम्हाला पण थोडं बोलता येईल त्या विषयावर. आता या मुलिंना कसं ….?? तर अगदी सोप्पं आहे,तुम्ही उपरोक्त लेखकाचं एखादं पुस्तक स्वखर्चाने विकत घ्या, आणि नंतर त्याच्या पहिल्या पानावर.. स्नेही.. श्री.. तुमचं नांव.. यांना सप्रेम भेट असं लिहुन खाली त्या लेखकाची सही करा.. ते पुस्तक तिला भेट द्या.. आणी सांगा की हे लेखक माझे चांगले परिचित आहेत.त्यांनी स्वतः भेट दिलेलं हे पुस्तक तिला भेट द्याल, तर तिचा तुमच्यावरचा विश्वास, अन प्रेम नक्कीच सुयोग्य दिशेने वाढु लागेल… . आणि नंतर…….नंतर काय ते सगळं कांही तुमच्याच हातात आहे.

३) कलावंत:- या प्रकारातली जर तुम्हाला आवडणारी मुलगी असेल तर तुम्हाला, कलाकार, नेपथ्यकार, वगैरे प्रकारात प्राविण्य मिळवावेच लागेल.एखादा लहानसा रोल पण त्या नाटकातला पदरी पाडुन घेता आला तर ते पण करावं , म्हणजे तालिमीच्या वेळेस ऑफिशिअली तिथे जाता येईल. जर हे शक्य नसेल तर कमित कमी तुम्हाला एखाद्या नाट्य मंडळाचा सभासद होऊन तिथे तालिमीच्या वेळेस जाणं येणं सुरु ठेवावं लागेल. रात्री उशिर झाला ( तालिमीला) की मी सोडतो ना घरी.. माझ्या बाईक वर … असं म्हणुन लिफ्ट देणं.. वगैरे वगैरे.. बरेच प्रकार आहेत. सुज्ञास जास्त सांगणे न लगे..

४)खेळाडु:- तुम्ही शंभर पाउड वजनाचे किंवा लेंग्याची नाडी न सांभाळता येणारे असाल तर कठिण आहे. ट्रेकिंग , वगैरे प्रकारात इंटरेस्ट असणं आवश्यक आहे . ट्रेक ला गेल्यावर आपण कचरा वगैरे कसा आपल्या बॅगेत भरुन खाली आणतो, आणि मग ड्स्ट बिन मधे फेकतो आणी निसर्ग वाचवण्यास हात भार लावतो हे रंगवुन सांगा. आणि लिंगाणा सर केला होता नां…. तेंव्हा अशी सुरुवात करा…. म्हणजे ह्या प्रकारच्या मुली लवकर मैत्री करतिल.

५)चित्रपट प्रेमी:- अशा प्रकारच्या मुलिंची अजिबात कमतरता नसते. विद्वान ब्राह्मणाप्रमाणे, कुठल्या चित्रपटात कोणी काम केलं कोणाचं संगित आहे, हिरोच्या लहान भावाचं नाव, किंवा होरोइनच्या बहिणीचा वाढदिवस वगैरे माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. चित्रपटातल्या हिरो , हिरोइन्स ची नावं अगदी संध्येतल्या चोविस नावांप्रमाणे पाठ असायला हवित.केंव्हाही कधीही सिनेमा पहाण्याची तयारी आणि एक्स्ट्रा तिकिट यांचा खर्च करण्याची तयारी ठेवावी लागेल. एखादा खुप गाजलेला सिनेमा जेंव्हा रिलिझ होतो तेंव्हा दोन तिकिटं रांगेत उभं राहुन ऍडव्हान्स बुक करुन ठेवावी.. आणि तिला पण चलतेस का म्हणुन विचारलं, तर ती १०१ टक्के हो म्हणणार याची खात्री देतो मी. अशा तर्हेने ओळख वाढवा…!

६)वर्गभगिनी:- हिच्या कडे वर्गातल्या बऱ्याच बांधवांचं लक्षं असतं. तेंव्हा तुमचा नंबर इथे लागण जरा कठिणच , पण काहिही झालं तरिही प्रयत्ने वाळुचे कण रगडीता तेलही गळे.. असंही होऊ शकतं म्हणुन प्रयत्न सोडु नये.

७)शेजारीण: – शेजाऱ्यावर प्रम करा हा येशु चा संदेश आहे हे खरं, पण शेजारच्य सुमीची आई पण डोळ्यात तेल घालुन तिच्यावर नजर ठेउन आहे हे विसरु नका.तसेच इतर शेजारी पण तुमच्यावर नव्हे तर तिच्यावर कायम नजर ठेउन असतात, तेंव्हा तुमची प्रत्येक स्टेप ही कमित कमी दहा लोकं पहाणार आहेत हे लक्षात घेउनच स्टेप्स घ्या.तुम्ही काळजी पुर्वक पणे या प्रश्नाचा ध्यास घेतलात तर हा प्रशन सुटु शकतो अगदी चुटकी सरशी…

८)कचेरितली सहकारी:-यावर काही लिहायची गरज आहे असं वाटत नाही.आपण सगळे जाणकार आहातंच ,काय?? बरोबर नां?

९) मित्र भगिनी:- हे फारच अवघड नातं असतं.जर तुम्हाला सुंदर बहिण असेल , तर इतर मुलं तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतिल, तुम्हाला सिनेमाचे पास, नाटकाचे पास, वगैरे देतिल, तुमच्या घरी येण्यासाठी काहिही करायला तयार असतिल. हा प्रकार जरा डेंजरसच असतो. तेंव्हा सांभाळुन.. ओळख कशी वाढवावी?? आजकालच्या तरुणांना याची काहिच गराज नसावी.तरी पण, एकदा ओळख झाली की मग.. थापा मारणे सुरु करणे अतिशय आवश्यक आहे. माझं तुझ्यावर प्राणापलिकडे प्रेम आहे, लाडके, तु माझी झाली नाहिस तर जीव देईन, चल आपण पळुन जाउन लग्न करु, इत्यादी प्रकारचे डायलॉग्ज वेळोवेळी पेरत रहाणं प्रेम बहरण्यासाठी अतिशय आवश्यक आहे

भेटण्याच्या जागा? चला प्रेम तर जमलं.. आता भेटायला जागा कुठल्या? या मधे खुप जागा असु शकतात. पण ज्या सर्व मान्य जागा आहेत, त्या म्हणजे बागा, आर्ट गॅलरीज, चाळितली गॅलरी, बस स्टॉप , र्लोकलचा प्लॅटफॉर्म, चाळिचा जीना, बॉक्स.. ( हल्ली हा नसतो, पण पुर्वी बॉक्स हा पण एक क्लास होता सिनेमा चा जिथे केवळ दोघांची बसण्याची सोय असायची) समुद्राचा किनारा, आरे कॉलनी चा छोटा काश्मिर अशा अनेक जागा जाणकार लोकं सांगु शकतिल. मी स्वतःचा अनुभव सांगतो, !!! असो!!! वरचा लेख तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल अशी आशा आहे. तर मंडळी आता कामाला लागा लवकर.. !!!

गुरुवार, १३ जून, २०१३

रोमॅंटीक आयडीयाज....Part 2


१. त्याच्या नावाचा टॅटू तुमच्या मानेवर काढून घ्या आणि एकांतात त्याला हलकेच केस बाजूला करून दाखवा.

२. मित्र-मैत्रीणींसोबत तुम्ही गप्पागोष्टी करत असताना, त्यांच्या नकळत त्याचं लक्ष वेधून घेऊन ’लव्ह यू’ म्हटल्यासारखी ओठांची नुसती हालचाल करा.

३. तुम्ही बाईकवर त्याच्या मागे बसला असाल, तर त्याच्या मानेवर एक हलकासा किस करा.

४. तुम्ही कधी तरी सहज म्हणून त्याच्यासोबत काढलेला फोटो फ्रेम करून त्याला गिफ्ट म्हणून द्या.

५. तो दहा-बारा दिवसांसाठी टूरवर चालला असेल, तर त्याच्या बॅगमधे गुपचूप एखादं छोटसं गिफ्ट ठेवून द्या.

६. तुम्हाला कविता, चारोळ्या लिहिणं जमत असेल, तर त्याची स्तुती करणारं काव्य जरूर लिहून त्याला दाखवा.

७. जर तुमचं लग्न झालेलं असेल, तर दिवसभराच्या कामानंतर तो घरी आल्यावर त्याच्यासाठी आंघोळीला छान कोमट पाणी तयार ठेवा. ऍरोमा ऑईल नसेल, तर अगरबत्ती लावा. एखादी मंद संगीताची धून सुरू ठेवा आणि कोमट पाण्याने त्याला आंघोळ घाला. (हे फक्त पाडव्यालाच करायचं असतं, असं कुणी सांगितलं?) आंघोळीनंतर तुमच्या हातचं सुग्रास जेवण जेवल्यावर स्वारीला स्वर्ग दोन बोटे उरलेला असेल.

८. घरातील वीज गेलेली असताना, वीज कंपनीच्या नावानं बोटं मोडण्यापेक्षा, घरातल्या घरातच त्याच्यासोबत कॅंडल लाईट करा. असं डिनर तुम्ही सरप्राईज म्हणूनही देऊ शकता.

९. दिवे गेलेले असताना, घरात तुम्ही दोघंच असाल तर छानच पण जर तुम्ही कुटुंबात रहात असाल आणि दिवे गेलेल्याक्षणी तुम्ही त्याच्या जवळ असाल, तर काय करायचं हे मी तुम्हाला सांगायला हवं का?

१०. त्याच्या वाढदिवशी त्याला ऑफिसमधे एक छानसा बुके पाठवून द्या. तो नुसताच खूष होणार नाही तर ऑफिसच्या लोकांमधेही चांगलाच भाव खाऊन जाईल.

११. तो ज्या क्षेत्रात काम करतो, त्या क्षेत्राशी संबंध असलेलं एखादं बहुचर्चित पुस्तक त्याला गिफ्ट म्हणून द्या.

१२. पावसाळ्य़ात तुमच्या दोघांकडेही छत्र्या असल्या, तरी तुमची छत्री तुम्ही पर्सच्याबाहेर काढलीच पाहिजे असा काही नियम नाही. पावसाळ्यात एकाच छत्रीतून अर्धवट ओलेतं होत चालण्याची मजा काही औरच असते.

१३. कधीतरी त्याला अचानक जवळ बोलावून त्याच्या कानात ’आय लव्ह यू’ असं कुजबुजून सांगा. हे तीन शब्द जादू करून जातात.

१४. शक्य असल्यास त्याला लहानपणी त्याच्या घरचे त्याला कोणत्या नावाने हाक मारायचे हे जाणून घ्या. त्याला ते नाव आवडत असेल, तर त्याच नावाने त्याला हाक मारत चला.

या अशा कितीतरी निरनिराळ्या कल्पनांनी तुम्ही तुमच्या आयुष्यात नवीन रंग भरू शकता. निरोगी असताना हे रंग भरणं सोपं आहे पण तुमचा जोडीदार आजारी पडला असेल, तर तुम्ही काय कराल?

१. शक्य असेल, तर तुम्ही सुटी काढा. त्याच्यासोबत दिवस घालवा. अशा वेळी तुम्ही त्याचा हात हातात धरून बसणं ,त्याला लवकर बरं करण्यासाठी मदत करू शकेल. तुम्ही करून दिलेली साधी पेजसुद्धा त्याच्यासाठी अमृतासारखी असेल.

२. "तरी मी सांगितलं होतं तुला...." अशाप्रकारची लेक्चरबाजी फोनवरून करण्याऐवजी त्याच्या तब्येतीची विचारपूस करा. तुम्हाला त्याच्या जवळ बसणं शक्य नसेल, तर अधूनमधून त्याला एस.एम.एस. पाठवत रहा.

या आयडीयांसोबत मला काही टीप्स तुम्हाला द्यायला आवडतील.

१. मुलींना तारखा लक्षात ठेवण्याची वाईट खोड असते. त्या कसल्या कसल्या तारखा लक्षात ठेवतील त्याचा काही नेम नाही. पहिली भेट, पहिलं स्माईल, पहिल्यांदा एकत्र खाल्लेलं आईसक्रिम, पहिलं भांडण.. इ.इ. बरं, इतकं करून भागत नाही आपल्या मित्राला/नव-यालाही या तारखा लक्षात असाव्यात असं त्यांना वाटतं आणि इथेच त्या चुकतात. पुरूषांना असल्या तारखा अजिबात लक्षात रहात नाहीत. (ज्याच्या लक्षात रहातात, तो सुदैवी). तुमचा वाढदिवस, तुमच्या लग्नाचा वाढदिवस या तारखांचाही त्याला केव्हा केव्हा विसर पडू शकतो. तर तुमच्या जोडीदाराकडून अशा तारखा लक्षात ठेवण्याची अपेक्षा करू नका. नेमका याच्या उलट विचार करा. तुमचं पहिलं भांडण केव्हा झालं होतं, हे जर खरंच तुमच्या नि त्याच्या लक्षात असेल, तर त्या दिवशी मुद्दाम त्याला फुलांचा बुके भेट द्या. "गेल्या वर्षी/गेल्या महिन्यात याच तारखेला तुझ्या माझ्यात दरी निर्माण झाली होती. आज आपण फुलांनी ती पोकळी भरून काढू या." असा संदेश त्या फुलांसोबत पाठवलात, तर त्या तारखेचे सर्व वाईट संदर्भच बदलून जातील.

२. तुम्हाला त्याला एखादं गिफ्ट द्यायचं आहे आणि तुम्हाला कळत नाहिये की काय गिफ्ट द्यावं, म्हणून तुम्ही जर तुमच्या दुस-या एखाद्या मित्राची मदत घेतलीत, तर हे चुकुनही तुमच्या जीवलगाला सांगू नका. मत्सर केवळ स्त्रियांनाच जमतो असं नाही.

३. त्याला भरपूर मैत्रीणी असतील, तर त्या मैत्रीणींचा मत्सर करण्यापेक्षा त्या मैत्रीणींच्यासमोर त्याला एखादं गिफ्ट द्या किंवा प्रेमाचा संदेश असलेलं ग्रिटींग कार्ड द्या. तुमच्या मत्सरापेक्षाही त्याच्या मैत्रीणींसमोर तुम्ही व्यक्त केलेलं प्रेम त्याला जास्त भावेल.

प्रेमाला वयाचं बंधन नसतं. तुमचं तुमच्या जोडीदारावर प्रेम आहे आणि तुम्ही ते व्यक्त करता, हे सर्वात महत्त्वाचं आहे.

रोमॅंटीक आयडीयाज....Part 1


जगात सगळ्यात जास्त काय महत्वाचे असेल तर ते स्वतः मधला रोमॅंटीक ’किडा’ जिवंत ठेवणे. आता वय कितीही असो.. अगदी १६ ते ७५ रोमॅंटीझम शिल्लक असेल तरच आयुष्यात काहीतरी थ्रील शिल्लक रहातं. या रोमॅंटिक वागणं- म्हणजे केवळ ’तिला’ महागड्या हॉटेलमधे घेउन जाउन खूप खर्च करणे, किंवा फार तर एखाद्या सिनेमाला तिला घेउन जाणे, किंवा साडी , ड्रेस, जिन्स घेउन देणे असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते पुर्ण चुकीचे आहे.. पण खरंच असं असतं का?? स्त्रियांच्या रोमॅंटीझम च्या कल्पना काय बरं असतात??

एम ऍंड बी मधे कसे मस्त रोमॅंटीक प्रसंग असायचे? तसंच काही तरी आपल्याही बाबतीत घडावं असं प्रत्येकच मुलीला वाटत असतं. लग्न होऊन इतकी वर्ष झालीत म्हणून काय झालं?? तुमच्या मनातला तो मदनबाण तरुण आहे नां? माझ्या फेवरेट आयडीयाज.. इथे आहेत..

१)तिचा वाढदिवस आहे.. किंवा लग्नाचा वाढदिवस समजा १२ वा… तुम्ही कुठे तरी बाहेर घेउन गेला आहात मे बी शॉपिंग मॉल मधे. एक १२ गुलाबाची सुंदर फुलं घ्या विकत. एका खांबाच्या आड उभे रहा आणि एखाद्या येणाऱ्या माणसाला एक फुल तिला द्यायला सांगा.. आणि म्हणायचं.. हॅपी ऍनिव्हर्सरी.. असे ११ फुलं निरनिराळ्या लोकांच्या तर्फे ( ज्या पैकी काही पुरुष काही स्त्रिया आणि एखादं लहान मुलं पण चालेल) देउन झाले की १२ वं ्फूल तुम्ही स्वतः तिला द्या.. आणि म्हणा….. ( आता ते पण मीच सांगु का?)

२)जर लग्न झालेलं नसेल, अ्जूनही डेटींग करित असाल, तर हाताची झेरॉक्स काढून त्यावर लिहा .. :तुला हा हात तुला आपल्या हातात आयुष्य भरासाठी धरुन ठेवायला आवडेल का?” आणि तो पेपर स्कॅन करुन तिला इ मेल करा. तिला म्हणाव, की उत्तर हो असेल तर आपल्या हाताचा ठसा त्यावर काढून परत पाठव.

३)तिच्या आवडत्या लेखकाचे पुस्तक जुन्या बाजारातून विकत घ्या. त्यावर त्या लेखकाची फेक सही स्वतःच करा ( सहीचा नमुना कुठेही सापडेल ) आणि तिला गिफ्ट रॅप करुन द्या..

४)एक सुंदरशी लव्ह स्टॊरी लिहिणे सुरु करा. मुख्य पात्र तुम्ही दोघंच . ( अगदी रिअल स्टॊरी नको..थोडं काल्पनिक, थोडं खरं) पहिला पार्ट म्हणजे तुम्ही कसे आणि कुठे भेटलात , कशी मैत्री झाली, कसे तुम्ही तिच्या प्रेमात पडलात, आणि तिला सांगतांना तुम्हाला कशी भिती वाटते – कारण तिने नाही म्हंटलं, तर मैत्री पण संपून जाइल म्हणून वगैरे वगैरे…. आणि मग तिला पाठवुन द्या.. म्हणा, पुढल्या भागात काय होणार आहे ते तुलाच माहिती आहे, म्हणून तूच लिहुन पाठव…. आणि गोष्ट पुर्ण करुन मला परत पाठव.

५)पर्सनलाइझ्ड मॅग्झिन कव्हर बनवा तिच्या फोटोचं अन तिला इ मेल करा. कसं बनवायचं? शोधा गुगलवर, नाही सापडलं, तर मला विचारा.आणि स्टॊरीचं हेडींग कुठलं?? तर सगळ्यात सुंदर मुलगी…. असं काहीतरी…

६)पंचविस गॅसचे फुगे विकत घ्या. त्या सगळ्यांच्या दोरा एकत्र बांधुन त्याला एक लहानशी कागदाची पाटी लावा.. आय लव्ह यु ची.. हे सगळं सामान ठेवा आपल्या कारच्या डिकी मधे. बाहेर कुठे तरी फिरायला जा.. लॉंग ड्राइव्हला.. समुद्रावर वगैरे… आणि तिला सांगा, की माझी वॉटर बॉटल डीकी मधे आहे ती आणतेस?? अन तिला चावी द्या कारची. ती कारची डिकी उघडेल आणि सगळे फुगे एकदम बाहेर येतील, तुम्ही बनवून ठेवलेल्या आय लव्ह यु नोट सह..

७)होळीच्या दिवशी.. आम्ही होळी खेळत नाही बॉ.. वगैरे तर नेहेमीच ऐकता तिचं.. या वेळी एक काम करा. दोन पिचकाऱ्या आणून ठेवा, आणि होळीच्या दिवशी तिच्या नकाराची पर्वा न करता तिला भिजवा.. दुसरी पिचकारी पण तिला सापडेल अशीच ठेवा.. किंवा ती झोपेत असतांना तिला गुलालाने रंगवा.. तिच्या नकळत,

८)बायको असेल ,तर तिची तारीफ करा , इतरांसमोर.. शक्यतो एखाद्या कॉमन पार्टी मधे मित्रांच्या गृप मधे जसे.. ही ना, चिकन बिऱ्याणी मस्त बनवते. अरे अगदी ’लकी मधली’ हैद्राबादी बिर्याणी पण झक मारते हिच्या हातच्या बिर्याणी समोर. अन हे सगळं करतांना तिचा हात हलकेच दाबा.. करेक्ट बॉडी लॅंग्वेज पण महत्वाची असते बरं कां…

९)जर मुलं घरात असतील तर त्यांची सोय करा एखाद्या चांगल्या मित्राकडे.. अन शुक्रवारी अनाउन्स करा.. की………..

१०)एक सुंदरसा बॉक्स घ्या विकत. त्या मधे दर महिन्याला काहीतरी एक गिफ्ट ठेवत जा.. लहानसच.. पण न चुकता..पैसे नसतील तर लहानसं चॉकलेटपण चालेल.

११)गर्ल फ्रेंड असेल, तर तिची हॉबी काय ते शोधून काढा. यासाठी तिच्या मैत्रिणीचा उपयोग होऊ शकतो. त्या हॉबी ला उपयुक्त अशी एखादी वस्तु भेट दिलेली तिला खूप आवडेल.

१२)सकाळी ती उठण्यापूर्वी तिच्या साठी कॉफी बनवून ठेवा.. आणि ती उठल्या बरोबरच तिच्या हातात कप द्या आणि मग पहा…. काय होतं ते!

१३)पिलो फाइट.. खास पिलो आणा विकत. पिलो ला छिद्र पाडुन ठेवा.. म्हणजे त्यातली पिसं बाहेर उडतील.पिलो फाइट मधे ्खूप मजा येते बरं कां.. आणि पिलो फाटली असेल तर अजूनच!

१४)लग्नाचा वाढदिवस आहे?? मग सोपं आहे. तिला ऑफिसच्या जवळ बोलवा, ऑफिस संपायच्या वेळेस, आणि दोघंही एक मेकांना ओळखत नाही, आणि पहिल्यांदाच भेटाताहेत असं भासवून - सरळ एखाद्या फाइव्ह स्टार हॉटेल मधे घेउन जा, जिथे एक रुम बुक केलेली असेल ..आणि नंतर पुढे……

१५)तिचा वाढदिवस आहे ?? तिला तिच्या वया इतके फुलं द्या गुलाबाची. त्यामधे एक प्लास्टीकचं फुल ( अगदी खरं दिसणारं ठेवा) आणि तिला सांगा की शेवटचं फूल टवटवीत राही पर्यंत मी तुझ्यावर प्रेम करीन.

१६)गॅसचे फुगे आणा विकत.. तिच्या कपाटात ते फुगे भरुन ठेवा. त्याला एक पेपर लावा.. हॅपी बर्थ डे चा… सरप्राइझ इज द की ऑफ सक्सेस हे लक्षात ठेवा.

१७)बायकॊ समजा लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी जात असेल, तर तिला सांगा, की मला तुझी खूप काळजी वाटते म्हणुन तुझ्या साठी मी एक बॉडी गार्ड आणलाय, अन तिच्या हातात एक लहानसा टेडी द्या..

१८)तिला वाचनाची सवय आहे?? ती एखादं पुस्तक वाचते आहे क? तर तिचं जितकं वा्चून झालंय त्याच्या पुढे काही अक्षरांखाली पेन्सिलने मार्क करा, आणि तिला सांगा की सिक्रेट मेसेज आहे त्यात. मग तो काहीही असू शकतो.. सिनेमाची तिकिटं तुझ्या पर्स मधे आहेत वगैरे.. उदाहरणार्थ या वाक्यात मी तुझ्यावर प्रेम म्हणजे काही भावना नाही तर मी ते करतो हे म्हणणं एक मोठ कठिण काम आहे..

१९)खेळ.. हा पण एक चांगला ऑप्शन आहे. स्पेशिअली रमी.. किंवा तत्सम पत्त्यांचा खेळ, अर्थात गेम विथ बेट्स… आता ’बेट’ काय ते तुम्हीच ठरवा…

२०)तिच्या वाढदिवसाला तिच्या ऑफिसमधे फुलं पाठवा.. सोबतच चॉकलेट्स पण. तिला सगळ्यांसमोर फुलं आलेले बघून खुप एंजॉय करता येइल आणि इतर मैत्रीणींवर माझा नवरा बघ कसा माझ्याकडे लक्ष देतो म्हणून थोडं मिरवता पण येइल.

२१)मुलींना झोपाळ्यावर बसायला खूप आवडतं. तिला फिरायला घेउन जा. एखाद्या बगिच्यात तिला झोपाळ्यावर बसवुन झोका द्या. कितीही वय असो मुली हा खेळ नेहेमीच एंजॉय करतात, आणि जेंव्हा झोपाळ्यावरून उतरतात तेंव्हा एकदम फ्रेश अन बब्ली असतात…

२२)हेअर ब्रश घेउन तिचे केस विंचरत बसा. हे शक्यतो रात्री झोपण्याच्या वेळेस करा.. कमित कमी ३ ते ५ मिनिटे.ती एकदम रि्लॅक्स होईल आणि मग पुढे ….. तुमच्या हातात आहे सगळं.

मेल मधे वाचलेलं , मित्रांकडुन ऐकलेलं आणि थोडं अनुभवलेलं जे काही आहे, ते इथे लिहिलं आहे बरं का. आणि अजुन काही टिप्स माहिती असतील तर इथे लिहा कॉमेंट्स मधे..

बुधवार, १२ जून, २०१३

काही गोष्टी ज्या मुलीना हव्या असतात [What A Girl Want].


काही गोष्टी ज्या मुलीना हव्या असतात पण मुली त्याविषयी कधीच तुम्हाला बोलणार नाहीत!

१) तुम्ही तिला नकळत मिठीत घ्याव

२) तिच्या डोळ्यात – डोळे घालून तिला I LOVE YOU म्हणावे

३) “ आज तू खूपच सुंदर दिसतेस “ अस तुम्ही तिला म्हणाव

४) तिला वाटत कि कधी तरी संध्याकाळी मस्त कुठेतरी एकांतात फिरायला जावे

५) तुम्ही दोघेही जेव्हा एकांतात असाल , तिला नक्की वाटेल कि याने मला घट्ट मिठी मारावी आणि हळूच कपाळावर चुंबन घ्याव.

६) कोणी जर तिला चिडवत असेल तर नेहमी तुम्ही तिची बाजू घ्यावी

७) तिने जर नवीन ड्रेस घातला असेल तर तिला नक्की वाटत कि याने माझी तारीफ करावी

८) तिला नेहमीच अस जाणवून देत जा कि तुम्ही तिच्यावर किती प्रेम करतात

९) ती जर एकटी असेल किव्वा घाबरत असेल तुम्ही तिला दिलासा द्यावा

१०) नेहमी तिला हसवाव... नेहमी प्रेमाच्या गोष्टी कराव्या .

११) अचानक तिला गुलाबच फुल द्याव

१२) तिला कल्पनाही नसतांना अचानक तिला छोटस गिफ्ट द्याव

१३) आणि सगळ्यात महत्वाच ... तिला सर्वात जास्त हेच वाटत कि याने माझ्यावर जीवापाड प्रेम कराव आणि नाजूक परीसारख जपाव..

बुधवार, ५ जून, २०१३

MBA (Degree) in Media and Entertainment


WWI School of Media & Communication:

Promoted by Filmmaker Subhash Ghai, Mukta Arts Limited & Filmcity Mumbai, Whistling Woods International is Asia's largest Film, Communication, Animation and Media Arts institute, providing world-class education in all technical and creative aspects of Media & Entertainment. The institute's campus is based in Mumbai's Film & Television Production centre Filmcity, and offers courses that vary in duration from 10 months to 30 months, both full-time and part time in nature.

The WWI School of Media & Communication is the new age media & communication institute which conducts a two year long Post Graduate/MBA course and a three year long Under Graduate/BBA course in Media, Communication & Entertainment Management. The courses have four areas of Specialization: Journalism (Print, TV, Cyber), Entertainment Media (TV, Radio, Cinema), Advertising & Brand Communication, and PR, Corporate Communication & Event Management.

Overview:

Our Model of Media Education:

The course starts by learning the fundamentals of all forms of media vehicles: online (cyber), on air (radio, television, digital film), offline (printed media), and on ground (events and experiential marketing). - Also it starts by learning all functions of communication in various forms (educate, inform, entertain, info-tain, persuade, interact, engage and empower). - Further, every batch begins by learning the basics of management, marketing, HR, and their applications in the context of Media and Entertainment management. - The course will make the trainees understand the inter-dependence of content creation, content marketing and content delivery, or, in other words, convergence of content, business and technology. - Next, the trainees move towards one of the two areas: Mass Communication or Communication Management, in the second semester. - Then, in the second year of education, that is, in the third and fourth semesters, they move towards further specialization in various areas of journalism, audio visual production, advertising or PR-Events. - Each trainee completes two live projects in each semester with industry clients. - Each trainee completes one internship of 8 weeks, after each of the first three semesters, one in a development sector organization, and two in industry organizations, with the fourth semester ending in a job with one of these interning houses or some other as per performance and market situation. - The trainees participate in live branding and communication experience through outreach programs of the institute around India and other events on campus. - Half the evaluation is through exams at the end of the semester, and the other half through practical assignments which are either online, or field-based, or creative ideation based. - Integrated industry-oriented autonomous PG,UG and Executive courses with exam-based management oriented University formal degree courses. Tie-up with Bharathidasan University through 24X7 Learning/Avagmah for MBA in Media & Entertainment and BBA . - One-fourth sessions are conducted by full-time faculty and three-fourths by visiting professionals and media stalwarts to give industrial relevance.

Curriculumn:

Post Graduate Programme in Media and Entertainment (with four areas of Specialization)

Semester I:

(A) Communication: types, models, functions, theories (B) Journalism: Print & Cyber (C) Journalism: Television & Radio (D) Television & Radio Production (E) Film Appreciation (F) Development & Social Communication (G) Advertising Management (H) Event Management (I) PR & Corporate Communication (J) Communication Design, along with Photoshop, PageMaker/Indesign. (K) Basics of Management, and Media Management (L) NGO Internship and WWI National Outreach

Semester II:

Mass Communication:

(A) Development Journalism (B) News-reporting in Print & Cyber Media (C) News-reporting in Electronic Media (ENG) (D) Editing in Print & Cyber Media (E) Editing in Electronic Media (ENP) (F) Broadcast Technologies & Design Software (QuarkXpress) (G) Documentary Production & Non-fiction TV Production (H) Still Photography (I) Television Production: fiction (J) Radio Production: musicals, features, news (K) History of Indian and World Cinema (L) Industry Internship, Thematic Research Paper (with field-work)

Semester II:

Communication Management:

(A) Still Photography (B) Communication Technologies and Design Software (Freehand) (C) Consumer Behaviour Studies & Communication Research (D) Marketing Management & IMC: Strategy & Execution (E) HRM-HRD & Business Communication Skills (F) Event Management (Advanced) (G) Public Relations (Advanced) (H) Corporate Communication (Advanced) (I) Copy & Corporate Writing Skills (J) Media Investments: Planning & Buying (K) Account Management in Agencies: Advertising, PR, Events (L) Industry Internship & Thematic Research Paper (with field-work done)

Semester III:

Semester III is divided into four specialization areas: Journalism, AV Production, Advertising Management, and PR & Event Management.

There is a second industry internship after semester III.

Journalism across Media:

(A) Laws & Ethics of Journalism (B) Indian Political Economy (C) Indian Society, Art & Culture (D) Advanced News Photography (E) Political, Civic & Development Reporting (F) Business Journalism & Economy Reporting (G) Sports & Entertainment Journalism (H) Magazines Production (I) Publishing Industry (J) News & Current Affairs Production (K) Advanced Broadcast Technologies (L) Radio Features & News Production (M) Portal Content and Management (N) Industry Internship (PPO focused)

Audio-Visual Communication:

(A) Laws & Ethics of Media (B) Advanced Film Appreciation (C) Indian Society, Art & Culture (D) Advanced Photography (E) Theatre & Acting across Media (F) Script and Screenplay Writing (G) Production Design & Management (H) Camera & Lights for AV Production (I) Post-production (J) Direction for AV Production (K) Radio Production (L) AV Technologies (M) Entertainment Business Management (N) Industry Internship (PPO focused)

Advertising & Brand Communication:

(A) Strategic Account Management: Advertising Focus (B) Indian Super-brands & Power-brands Cases (C) Audience Measurement Techniques for Media Investments (D) Advanced Consumer Insights & Qualitative Research (E) Quantitative Research Techniques (F) Advanced Visual Communication Design (G) Creative Thinking: Lateral, Vertical & Out-of-box Thinking Processes (H) Advanced Brand Management (I) Budgeting & Finance Management (J) Digital and New Media Advertising (K) Media Marketing & Sales in Print & Cyber & Electronic Media (L) Laws, Ethics & Challenges in Brand Communication (M) Creative Talent Development & Management (N) Industry Internship (PPO focused)

PR, Corporate Communication & Events:

(A) Strategic Account Management: PR & Events focus (B) Indian Super-brands & Power-brands Cases (C) Corporate Governance & Corporate Social Responsibility (D) Events Categories, Skills & Cases (E) Advanced Tools of PR & Corporate Communication (F) Creative Thinking: Lateral, Vertical & Out-of-box Thinking Processes (G) Advanced Brand Management (H) Budgeting & Finance Management (I) Digital and New Media PR and E-fairs (J) Business Development in PR & Events (K) Laws, Ethics, Permissions & Challenges in PR and Events (L) Event Production Techniques & Technologies (M) Creative Talent Development & Management (N) Industry Internship (PPO focused)

Semester IV:

No written exams at the end of this semester, only reports of each of these to be evaluated by Jury.

(A) Dissertation on an applied field of Specialization Area (B) Master Project: with a client: focused on Specialization. (C) Leadership and Institutional Brand Management Role. (D) Organizing and speaking in Thematic Workshop within Specialization area. (E) Industry/Domain Specific Research Paper and Seminar. (F) Case-study of Media Management in the Domain Area. (G) Field/Market Research Project: Live. (H) Digital Branding & Positioning: Creative Self Branding: Case of Digital Communication (plus Online Quiz Tests in this Semester) (I) Grand Viva on the Entire Course.

There is a second industry internship after semester III. And, placements are compulsory after the end of Semester IV, for those who clear all four semesters. Semester IV will be of 900 marks, including dissertation.

Admissions:

Any bona fide graduate/under graduate from any college/university of India or abroad, recognized by the University Grants Commission, who clears the admission interview and on–the spot assignment given by the WWI Admission team across India or in WWI campus, shall be offered admission to this course.

Fees:

Course : PG Programme in Media & Communication + MBA in Media & Entertainment

Duration : 2 years

Course Fees** : 5,96,120

Security Deposit : 50,000

PAYMENT INSTALMENTS***

WWI School of Media & Communication : MBA

Acceptance : 50,000

Semester 1 : 1,52,300

Semester 2 : 2,00,000

Semester 3 :1,50,000

Semester 4 :1,00,000

Semester 5 :NA

Semester 6 : NA

Total : 6,52,300

शुक्रवार, १५ मार्च, २०१३

MANTHAN RESORT - Arnala(Virar) Snaps