जगात सगळ्यात जास्त काय महत्वाचे असेल तर ते स्वतः मधला रोमॅंटीक ’किडा’ जिवंत ठेवणे. आता वय कितीही असो.. अगदी १६ ते ७५ रोमॅंटीझम शिल्लक असेल तरच आयुष्यात काहीतरी थ्रील शिल्लक रहातं. या रोमॅंटिक वागणं- म्हणजे केवळ ’तिला’ महागड्या हॉटेलमधे घेउन जाउन खूप खर्च करणे, किंवा फार तर एखाद्या सिनेमाला तिला घेउन जाणे, किंवा साडी , ड्रेस, जिन्स घेउन देणे असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते पुर्ण चुकीचे आहे.. पण खरंच असं असतं का?? स्त्रियांच्या रोमॅंटीझम च्या कल्पना काय बरं असतात??
एम ऍंड बी मधे कसे मस्त रोमॅंटीक प्रसंग असायचे? तसंच काही तरी आपल्याही बाबतीत घडावं असं प्रत्येकच मुलीला वाटत असतं. लग्न होऊन इतकी वर्ष झालीत म्हणून काय झालं?? तुमच्या मनातला तो मदनबाण तरुण आहे नां? माझ्या फेवरेट आयडीयाज.. इथे आहेत..
१)तिचा वाढदिवस आहे.. किंवा लग्नाचा वाढदिवस समजा १२ वा… तुम्ही कुठे तरी बाहेर घेउन गेला आहात मे बी शॉपिंग मॉल मधे. एक १२ गुलाबाची सुंदर फुलं घ्या विकत. एका खांबाच्या आड उभे रहा आणि एखाद्या येणाऱ्या माणसाला एक फुल तिला द्यायला सांगा.. आणि म्हणायचं.. हॅपी ऍनिव्हर्सरी.. असे ११ फुलं निरनिराळ्या लोकांच्या तर्फे ( ज्या पैकी काही पुरुष काही स्त्रिया आणि एखादं लहान मुलं पण चालेल) देउन झाले की १२ वं ्फूल तुम्ही स्वतः तिला द्या.. आणि म्हणा….. ( आता ते पण मीच सांगु का?)
२)जर लग्न झालेलं नसेल, अ्जूनही डेटींग करित असाल, तर हाताची झेरॉक्स काढून त्यावर लिहा .. :तुला हा हात तुला आपल्या हातात आयुष्य भरासाठी धरुन ठेवायला आवडेल का?” आणि तो पेपर स्कॅन करुन तिला इ मेल करा. तिला म्हणाव, की उत्तर हो असेल तर आपल्या हाताचा ठसा त्यावर काढून परत पाठव.
३)तिच्या आवडत्या लेखकाचे पुस्तक जुन्या बाजारातून विकत घ्या. त्यावर त्या लेखकाची फेक सही स्वतःच करा ( सहीचा नमुना कुठेही सापडेल ) आणि तिला गिफ्ट रॅप करुन द्या..
४)एक सुंदरशी लव्ह स्टॊरी लिहिणे सुरु करा. मुख्य पात्र तुम्ही दोघंच . ( अगदी रिअल स्टॊरी नको..थोडं काल्पनिक, थोडं खरं) पहिला पार्ट म्हणजे तुम्ही कसे आणि कुठे भेटलात , कशी मैत्री झाली, कसे तुम्ही तिच्या प्रेमात पडलात, आणि तिला सांगतांना तुम्हाला कशी भिती वाटते – कारण तिने नाही म्हंटलं, तर मैत्री पण संपून जाइल म्हणून वगैरे वगैरे…. आणि मग तिला पाठवुन द्या.. म्हणा, पुढल्या भागात काय होणार आहे ते तुलाच माहिती आहे, म्हणून तूच लिहुन पाठव…. आणि गोष्ट पुर्ण करुन मला परत पाठव.
५)पर्सनलाइझ्ड मॅग्झिन कव्हर बनवा तिच्या फोटोचं अन तिला इ मेल करा. कसं बनवायचं? शोधा गुगलवर, नाही सापडलं, तर मला विचारा.आणि स्टॊरीचं हेडींग कुठलं?? तर सगळ्यात सुंदर मुलगी…. असं काहीतरी…
६)पंचविस गॅसचे फुगे विकत घ्या. त्या सगळ्यांच्या दोरा एकत्र बांधुन त्याला एक लहानशी कागदाची पाटी लावा.. आय लव्ह यु ची.. हे सगळं सामान ठेवा आपल्या कारच्या डिकी मधे. बाहेर कुठे तरी फिरायला जा.. लॉंग ड्राइव्हला.. समुद्रावर वगैरे… आणि तिला सांगा, की माझी वॉटर बॉटल डीकी मधे आहे ती आणतेस?? अन तिला चावी द्या कारची. ती कारची डिकी उघडेल आणि सगळे फुगे एकदम बाहेर येतील, तुम्ही बनवून ठेवलेल्या आय लव्ह यु नोट सह..
७)होळीच्या दिवशी.. आम्ही होळी खेळत नाही बॉ.. वगैरे तर नेहेमीच ऐकता तिचं.. या वेळी एक काम करा. दोन पिचकाऱ्या आणून ठेवा, आणि होळीच्या दिवशी तिच्या नकाराची पर्वा न करता तिला भिजवा.. दुसरी पिचकारी पण तिला सापडेल अशीच ठेवा.. किंवा ती झोपेत असतांना तिला गुलालाने रंगवा.. तिच्या नकळत,
८)बायको असेल ,तर तिची तारीफ करा , इतरांसमोर.. शक्यतो एखाद्या कॉमन पार्टी मधे मित्रांच्या गृप मधे जसे.. ही ना, चिकन बिऱ्याणी मस्त बनवते. अरे अगदी ’लकी मधली’ हैद्राबादी बिर्याणी पण झक मारते हिच्या हातच्या बिर्याणी समोर. अन हे सगळं करतांना तिचा हात हलकेच दाबा.. करेक्ट बॉडी लॅंग्वेज पण महत्वाची असते बरं कां…
९)जर मुलं घरात असतील तर त्यांची सोय करा एखाद्या चांगल्या मित्राकडे.. अन शुक्रवारी अनाउन्स करा.. की………..
१०)एक सुंदरसा बॉक्स घ्या विकत. त्या मधे दर महिन्याला काहीतरी एक गिफ्ट ठेवत जा.. लहानसच.. पण न चुकता..पैसे नसतील तर लहानसं चॉकलेटपण चालेल.
११)गर्ल फ्रेंड असेल, तर तिची हॉबी काय ते शोधून काढा. यासाठी तिच्या मैत्रिणीचा उपयोग होऊ शकतो. त्या हॉबी ला उपयुक्त अशी एखादी वस्तु भेट दिलेली तिला खूप आवडेल.
१२)सकाळी ती उठण्यापूर्वी तिच्या साठी कॉफी बनवून ठेवा.. आणि ती उठल्या बरोबरच तिच्या हातात कप द्या आणि मग पहा…. काय होतं ते!
१३)पिलो फाइट.. खास पिलो आणा विकत. पिलो ला छिद्र पाडुन ठेवा.. म्हणजे त्यातली पिसं बाहेर उडतील.पिलो फाइट मधे ्खूप मजा येते बरं कां.. आणि पिलो फाटली असेल तर अजूनच!
१४)लग्नाचा वाढदिवस आहे?? मग सोपं आहे. तिला ऑफिसच्या जवळ बोलवा, ऑफिस संपायच्या वेळेस, आणि दोघंही एक मेकांना ओळखत नाही, आणि पहिल्यांदाच भेटाताहेत असं भासवून - सरळ एखाद्या फाइव्ह स्टार हॉटेल मधे घेउन जा, जिथे एक रुम बुक केलेली असेल ..आणि नंतर पुढे……
१५)तिचा वाढदिवस आहे ?? तिला तिच्या वया इतके फुलं द्या गुलाबाची. त्यामधे एक प्लास्टीकचं फुल ( अगदी खरं दिसणारं ठेवा) आणि तिला सांगा की शेवटचं फूल टवटवीत राही पर्यंत मी तुझ्यावर प्रेम करीन.
१६)गॅसचे फुगे आणा विकत.. तिच्या कपाटात ते फुगे भरुन ठेवा. त्याला एक पेपर लावा.. हॅपी बर्थ डे चा… सरप्राइझ इज द की ऑफ सक्सेस हे लक्षात ठेवा.
१७)बायकॊ समजा लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी जात असेल, तर तिला सांगा, की मला तुझी खूप काळजी वाटते म्हणुन तुझ्या साठी मी एक बॉडी गार्ड आणलाय, अन तिच्या हातात एक लहानसा टेडी द्या..
१८)तिला वाचनाची सवय आहे?? ती एखादं पुस्तक वाचते आहे क? तर तिचं जितकं वा्चून झालंय त्याच्या पुढे काही अक्षरांखाली पेन्सिलने मार्क करा, आणि तिला सांगा की सिक्रेट मेसेज आहे त्यात. मग तो काहीही असू शकतो.. सिनेमाची तिकिटं तुझ्या पर्स मधे आहेत वगैरे.. उदाहरणार्थ या वाक्यात मी तुझ्यावर प्रेम म्हणजे काही भावना नाही तर मी ते करतो हे म्हणणं एक मोठ कठिण काम आहे..
१९)खेळ.. हा पण एक चांगला ऑप्शन आहे. स्पेशिअली रमी.. किंवा तत्सम पत्त्यांचा खेळ, अर्थात गेम विथ बेट्स… आता ’बेट’ काय ते तुम्हीच ठरवा…
२०)तिच्या वाढदिवसाला तिच्या ऑफिसमधे फुलं पाठवा.. सोबतच चॉकलेट्स पण. तिला सगळ्यांसमोर फुलं आलेले बघून खुप एंजॉय करता येइल आणि इतर मैत्रीणींवर माझा नवरा बघ कसा माझ्याकडे लक्ष देतो म्हणून थोडं मिरवता पण येइल.
२१)मुलींना झोपाळ्यावर बसायला खूप आवडतं. तिला फिरायला घेउन जा. एखाद्या बगिच्यात तिला झोपाळ्यावर बसवुन झोका द्या. कितीही वय असो मुली हा खेळ नेहेमीच एंजॉय करतात, आणि जेंव्हा झोपाळ्यावरून उतरतात तेंव्हा एकदम फ्रेश अन बब्ली असतात…
२२)हेअर ब्रश घेउन तिचे केस विंचरत बसा. हे शक्यतो रात्री झोपण्याच्या वेळेस करा.. कमित कमी ३ ते ५ मिनिटे.ती एकदम रि्लॅक्स होईल आणि मग पुढे ….. तुमच्या हातात आहे सगळं.
मेल मधे वाचलेलं , मित्रांकडुन ऐकलेलं आणि थोडं अनुभवलेलं जे काही आहे, ते इथे लिहिलं आहे बरं का. आणि अजुन काही टिप्स माहिती असतील तर इथे लिहा कॉमेंट्स मधे..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा