बुधवार, १८ नोव्हेंबर, २००९

प्रभावी बोलणं जमतं ?

मोटिव्हेशनल स्पीकर हे आजच्या जगातलं अगदी वेगळं असं करिअर आहे. आणि त्यासाठी तुमचं प्रभावी बोलणं याखेरीज कोणत्याही गोष्टीची गरज नाही. शिक्षण असो नाही तर राजकारण तिथे प्रभावी वक्तृत्त्व तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरू शकते.
.....

तुमचं बोलणं प्रभावी असेल, तर अनेकदा तू राजकारणात जा, असं सांगितलं जातं. अनेकांना राजकारणात जाणं मान्य नसतं. त्यामुळे प्रभावी बोलणारी माणसं आपल्याला न आवडणारं काम करत राहतात. आणि अधूनमधून एखाद्या सांस्कृतिक किंवा सामाजिक कार्यक्रमात लोकांवर प्रभाव पाडणारं भाषणंही करतात. मात्र तुमचं प्रभावी बोलणं हेच तुम्हाला करिअरची वेगळी वाट निर्माण करून देईल.

मोटिव्हेशनल स्पीकर हे आजच्या जगातलं अगदी वेगळं असं करिअर आहे. आणि त्यासाठी तुमचं प्रभावी बोलणं याखेरीज कोणत्याही गोष्टीची गरज नाही. शिक्षण असो नाही तर राजकारण तिथे प्रभावी वक्तृत्त्व तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरू शकते. अनेकांनी सभास्थानी केलेली भाषणं ही लोकांच्या एकंदर मानसिकतेवर परिणाम करणारी असतात. अनेकदा प्रभावी संभाषणाची कला ही जन्मजात देणगी असू शकते. तर काही जणांना लाभलेल्या सामाजिक जडणघडणीतूनही उत्कृष्ट वक्तृत्त्व शैली निर्माण होऊ शकते. त्यामुळेच मोटिव्हेशनल स्पीकर हा चांगला ऑप्शन ठरू शकतो.

या क्षेत्राचे स्वत:चे काही नियम नाहीत. पण तुम्हाला त्या क्षेत्रात स्वत:चं स्थान निर्माण करायचं असेल तर मात्र तुम्हाला टप्प्याटप्प्यांने काही गोष्टी शिकून घ्यावा लागतात. आपल्यासमोर बसलेल्यांना भारावून टाकण्याची ताकद त्या व्यक्तीच्या आवाजात, शैलीत असली पाहिजे. अर्थात त्यासाठी आपल्या आयुष्यातल्या काही प्रसंगांना आणि अनुभवांना आपल्या भाषणांतून व्यक्त करता आलं पाहिजे. कारण तुम्ही जोवर आपल्या आयुष्यातले प्रसंग आणि अनुभव बोलण्यात व्यक्त करत नाही तोवर समोरच्यांवर त्याचा प्रभाव पडत नाही.

अनेक जण सर्वसामान्य माणसांप्रमाणे जगत असतात. त्यांनी इतरांपेक्षा वेगळं जगावं यासाठी त्यांना मोटिव्हेशनची गरज असते. हे मोटिव्हेशन देण्याची ताकद मोटिव्हेशन स्पीकरमध्ये असतं. त्यामुळे मुळात त्यांच्या स्वत:च्या कल्पना, स्वप्न आणि तत्व याविषयीच्या स्पष्ट असण्याची गरज असते. मोटिव्हेटशल स्पीकर इतरांवर प्रभाव टाकण्याचं काम करतो. शिवाय त्यामुळे एखाद्या व्यक्ती किंवा व्यक्तीसमूहाची निर्णयक्षमता, कार्यक्षमता वाढवणं शक्य होतं असतं.

अर्थात अशा व्यक्तीने नुसतंच चांगलं बोलणं अपेक्षित नाही तर त्या व्यक्तीकडे इतरांचं ऐकून घेण्याची क्षमताही असावी लागते. शिवाय समोरच्याला समजावून देणं, समजून घेणं हे जमलं पाहिजे. त्यामुळे अनेक प्रश्न समजून घेणं आणि ते सोडवणं यासाठी अशा व्यक्ती उपयोगी पडतात.

शाळा, कॉलेजेसमध्ये विशिष्ट वयोगटातील मुलांना काही सल्ला द्यायचा असतो. त्यांच्यासाठी अशा व्यक्ती खरंच महत्त्वाच्या ठरू शकतात.

अर्थात मोटिव्हेशन स्पीकर म्हणून नाव कमवता येईल पण त्यासाठी कोणताही कोर्स सध्या तरी उपलब्ध नाही. तुमचा पॉझिटिव अॅटिट्यूट असणं अत्यंत गरजेचं आहे. पण या क्षेत्रात नाव मिळवणं कठीण नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: