सोमवार, २३ नोव्हेंबर, २००९

टीव्हीची दुनिया

दशकभरात भारतीय टीव्ही इण्डस्ट्रीने भरपूर मोठी झेप घेतली आहे. चॅनल्सच्या या वाढत्या संख्येमुळे वेगवेगळ्या कार्यक्रमांची निमिर्ती होऊ लागली. यामुळे टीव्ही प्रोड्युसर्सना असणारी मागणी प्रचंड प्रमाणात वाढलीय.

आज चॅनल जगताने बरीच मोठी झेप घेतली आहे. १९९३ मध्ये फक्त दहा चॅनल्स होते. आज या चॅनल्सची संख्या २२० च्या वर पोहोचली आहे. भारतीय टीव्ही इण्डस्ट्रीने गेल्या दशकभरात प्रचंड झेप घेतली आहे. एण्टरटेन्मेण्ट, न्यूज ते स्पोर्ट्स, बिझनेस संबंधित चॅनल्सचा सुळसुळाट झाला आहे. चॅनल्सची संख्या वाढली तशी त्यावरील कार्यक्रमांची संख्या वाढली. यामुळे टीव्ही प्रोड्युसर्सना असणारी मागणीही भरपूर प्रमाणात वाढली. म्हणूनच आज या क्षेत्रात फूल टाइम करिअर करता येणं शक्य आहे.

मीडिया इण्डस्ट्रीत आलेल्या बुममुळे वेगवेगळे चॅनल्सना चांगले दिवस आले आहेत. यामुळे टीव्ही प्रोडक्शन या क्षेत्रातही कामाच्या संधी खूप वाढू लागल्या आहेत. टीव्ही प्रोडक्शनमध्ये वेगवेगळ्या टीव्ही मालिका, व्हिडीओ प्रोडक्शन, डिजिटल व्हिडीओ आणि लाइटिंग, एडिटिंग या सगळ्यांचा समावेश होतो.

या क्षेत्रात करिअर करण्यासाठी कोणत्याही क्षेत्रातून ग्रॅज्युएशन पूर्ण असणं आवश्यक आहे. टीव्ही प्रोडक्शन या क्षेत्राचं प्रशिक्षण घेतल्यावर टीव्ही प्रोडक्शन प्रोसेस, फिल्म अॅण्ड व्हिडीओ डिजिटल एडिटिंग, यूज ऑफ डिजिटल कॅमेरा, फिल्म अॅण्ड टीव्ही ग्राफिक्स, लाइट डिझाइन टेक्निक्स, मीडिया प्लॅनिंग, पोस्ट प्रोडक्शन टेक्निक्स आदी क्षेत्रांत काम करता येतं.

टीव्ही प्रोडक्शनचं प्रशिक्षण घेतल्यावर स्वतंत्र प्रोड्युसर किंवा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम करता येतं. एखाद्या टीव्ही प्रोड्युसरकडे पर्सनल असिस्टण्ट म्हणून काम करण्याचा पर्यायही आहे.

कोणत्याही कार्यक्रमाच्या टीव्ही प्रोड्युसरला त्या कार्यक्रमातील कलाकारांच्या येण्याजाण्यापासून कॉश्च्युम, एडिटिंग, शूटिंग, प्रॉपटीर्, बजेट प्लॅनिंग अशा सगळ्याच गोष्टी सांभाळाव्या लागतात.

दूरदर्शन, झी, सोनी, एनडीटीव्ही, स्टार, ई टीव्ही अशा अनेक चॅनल्समध्ये एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर, ऑन लाइन प्रोड्युसर, प्रोडक्शन डिझायनर अशा प्रकारच्या कामाच्या संधी उपलब्ध असतात. या चॅनल्सवरील संस्कृती, डान्स, कला, मनोरंजनात्मक अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांची निमिर्ती करण्यासाठी प्रत्येक चॅनलला टीव्ही प्रोड्युसरची गरज असते. या क्षेत्रातील ज्ञानाबरोबरच टेक्निकल बाजूची माहिती असणाऱ्या प्रोफेशनल्सना बालाजी टीव्ही हाउससारख्या विविध प्रोडक्शन हाउसेसमध्ये असिस्टण्ट एडिटर, असिस्टण्ट साऊण्ड रेकॉडिर्स्ट, असिस्टण्ट कॅमेरामन म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते.

बीबीसी, सीएनबीसी, सीएनएन, डिस्कव्हरी, नॅशनल जीओग्राफीसारख्या इण्टरनॅशनल चॅनल्समध्येही नोकरीसाठी अर्ज करता येईल. फ्रेशर म्हणून कमीतकमी पाच हजार रुपये पगार तर हमखास मिळतो. तर अनुभवी व्यक्तींना २० हजार आणि त्याहून अधिक पगार मिळतो.

काही संस्थांमध्ये या क्षेत्राचं परिपूर्ण प्रशिक्षण देणारे स्पेशलाइज्ड् कोसेर्स उपलब्ध आहेत (फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, पुणे). इथे तीन वर्षांचा डिप्लोमा कोर्स इन फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन उपलब्ध आहे. तसंच एक वर्षाचा सटिर्फिकेट कोर्सही आहे. तर काही संस्थांमध्ये मास कम्युनिकेशन कोर्सच्या सिलॅबसमध्ये टीव्ही प्रोडक्शन हा एक भाग असतो. या कोर्समधून विद्यार्थ्यांना कॅमेरा, दिग्दर्शन, एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी अशा विविध विषयांशी ओळख करून घेता येतेत.

एजेके मास कम्युनिकेशन रिसर्च सेण्टर, दिल्ली इथे दोन वर्षांचा एमए हा डिग्री कोर्स आहे. तर दिल्लीच्याच इंदप्रस्थ कॉलेजमध्ये बॅचलर मास मीडिया अॅण्ड कम्युनिकेशन कोर्सचा एक भाग म्हणून या विषयाचं प्रशिक्षण देण्यात येतं. दिल्लीच्याच द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनने त्यांच्या पीजी डिप्लोमा इन रेडिओ अॅण्ड टीव्ही जर्नलिझम कोर्सचा एक भाग म्हणून नुकताच टीव्ही प्रोडक्शन हा विषय सुरू केला. काही प्रायव्हेट संस्थांमध्ये शॉर्ट टर्म प्रोग्राम्स उपलब्ध आहेत. काही संस्थांतफेर् या विषयाची ओळख करून देणारे सेमिनार्स आणि वर्कशॉप्सही घेतले जातात. स्कूल ऑफ ऑडिओ अॅण्ड इंजिनीअरिंग इथेही डिप्लोमा इन डिजिटल फिल्म मेकिंग, डिग्री इन फिल्म मेकिंग, सटिर्फिकेट कोर्स इन टेलिव्हिजन प्रोडक्शन हे कोसेर्स उपलब्ध आहे.

या संस्थांमध्ये प्रवेश घेणं तितकंसं सोपं नसतं. संस्थांची मर्यादित संख्या आणि विद्यार्थ्यांची वाढती संख्या यामुळे इथली प्रवेश प्रक्रिया थोडी कठीण असते. यासाठी प्रथम लेखी परीक्षा पास व्हावं लागतं.
........

हे कोसेर्स उपलब्ध असणाऱ्या काही नामांकित संस्था :

झेविअर्स इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्स, सेण्ट झेविअर्स कॉलेज, महापालिका मार्ग, मुंबई ०१सत्यजीत रे फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, कोलकाता

फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे

मास कम्युनिकेशन रिसर्च सेण्टर, नवी दिल्ली

मैसूर युनिव्हसिर्टी, मैसूर

सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, पुणे

स्कूल ऑफ ऑडिओ अॅण्ड इंजिनीअरिंग, अंधेरी/चेन्नई/नवी दिल्ली/बंगलोर.
-मिताली मापुस्कर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: