बुधवार, २१ ऑक्टोबर, २००९

पत्रकारिता-'इति' पर्यंत

'पत्रकारिता विद्या' हे पुस्तक मुख्यत: मराठीत पत्रकारिता करू पाहणार्‍Zया विद्यार्थ्यांसाठी, नवोदित पत्रकारांसाठी आहे; पण केवळ मराठी वऋत्तपत्रं आणि मराठी पत्रकारिता यामध्ये न अडकता राष्ट्रीय व जागतिक स्तरावरील पत्रकारितेच्या इतिहासातील आवश्यक, महत्त्वाच्या घटनांचा, नोंदींचा संदर्भ या पुस्तकात आढळतो.

पुस्तकाचे संपादक किरण गोखले हे ज्येष्ठ पत्रकार कै. दि.वि. गोखले यांचे पुत्र. प्रास्ताविकात त्यांनी पुस्तकामागची भूमिका स्पष्ट केली आहे. पुस्तक तीन भागात आहे. पहिला भाग 'पत्रकारितेचे अंतरंग- वऋत्त संकलन, संपादन व लेखन.' दुसर्‍Zया व तिसर्‍Zया भागात 'पत्रकारितेची विविध क्षेत्रे: राजकीय पत्रकारिता, शोध पत्रकारिता, क्रीडा पत्रकारिता इत्यादी... आणि 'पत्रकारितेसाठी आवश्यक ज्ञन - कौशल्ये' या विषयावर अनुक्रमे माहिती मिळते. तीनही भागात पत्रकारितेतील सर्व घटकांवर, विषयांवर त्या त्या क्षेत्रातील अनुभवी, तज्ज्ञ व्यक्तींचे लेख आहेत. उदाहरणार्थ, भाग एकमध्ये दैनिकांच्या रविवार पुरवणीच्या संपादनासंबंधी शंकर सारडा, स्तंभलेखन व वाचकांचा पत्रव्यवहार यासंबंधी प्रकाश बाळ, साप्ताहिकाच्या संपादनासंबंधी ह.मो. मराठे आणि दैनिकाच्या संपादनासंबंधी कुमार केतकर यांनी लिहिले आहे.

पत्रकारितेतील सर्व स्तरांतील ऐतिहासिक घडामोडींचा, बदलांचा, विकास टप्प्यांचा केवळ उल्लेख न करता त्या मागच्या कारणांची, पुढे होणार्‍Zया परिणामांची, आव्हानांची चर्चा करायचा प्रयत्न केतकरांनी केला आहे. हा लेख वाचल्यावर पुढील तीन भागातील विषय समजून घेण्याची मानसिकता तयार होते. मराठे यांनी 'भूज भूकंपांची घटना दैनिके, न्यूज चॅनेल्स आणि साप्ताहिकांनी कशी 'कव्हर' केली हे सांगून 'साप्ताहिकांचे संपादन' आणि इतर वऋत्तपत्रांचे, नियतकालिकांचे संपादन यामधील साम्यभेद नेमकेपणाने मांडला आहे बातमी कशी ओळखायची, मिळवायची आणि लिहायची? बातमीदार कसा असावा व नसावा, संपादकाची भूमिका, संपादकीय विभागाची कार्यपद्धती, वऋत्तपत्राचे दैनंदिन कामकाज, वितरण व छपाई विभागाची भूमिका इत्यादी सर्व अंगांची व वऋत्तपत्रांच्या संबंधातील कायद्याची माहिती पुस्तकात मिळते; मनोहर बोडेर्करांच्या 'प्रूफ रीडिंग व शुद्धलेखन' या लेखात 'प्रूफ रिडिंग' व 'प्रूफ रीडर' यांचे महत्त्व सांगणारी सोदाहरण माहिती आहे. भाषांतर व अनुवाद यातील फरक समजावून देण्याचे काम अशोक जैन यांच्या 'मराठी भाषांतर व भाषांतर कला' या लेखाने केले आहे. दत्तात्रय पाडेकरांनी मांडणी व सजावर यावर माहितीपूर्ण लेख लिहिला आहे. मजकूर मांडणी, टाईप, साईझ किंवा फॉण्टस साईझ, शीर्षकासाठी 'सुलेखन'चा वापर, रेखाचित्रांचे प्रकार, नकाशे व व्यंगचित्रांचा वापर इत्यादी मजकुराची मांडणी, सजावट यासंबंधीची माहिती पाडेकर यांच्या नुसत्या शब्दांतून नव्हे, तर अनेक चित्रांतून प्रकट होते.

दूरचित्रवाणीवरील बातम्यांचे जग नितीन केळकर यांनी उलगडले आहे, तर विश्वास मेहेंदळे यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियातील कामाच्या संधींविषयी मार्गदर्शन केले आहे.

'पत्रकारितेतील क्षेत्रे' या भागात राजकीय (दिनकर रायकर), क्रीडा (वि.वि. करमरकर), चित्रपट व नाट्य (कमलाकर नाडकणीर), वऋत्तसंस्था (प्र.के. नाईक), अर्थ-उद्योग (निरंजन राजाध्यक्ष), विज्ञन (डॉ. बाळ फोएंडके), शोध (अरुण साधू), युद्ध (दिवाकर देशपांडे), ग्रामीण (बा.भा. पुजारी) हे लेख आहेत. संपादक व लेखकांनी सर्वसमावेशक माहिती पोचवण्याचे काम शक्य करून दाखवले आहे. नवोदित पत्रकारांना 'पत्रकारिता' या विषयातील सैद्धांतिक माहिती, आवश्यक कला-कौशल्यांची जाणीव, नीतिमूल्ये आणि उपलब्ध रोजगार संधी यांची माहिती एका पुस्तकाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे.

- रवींद पालेकर
महाराष्ट्र टाईम्स नोव्हेंबर २६ २००५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: