गुरुवार, १५ एप्रिल, २०१०

मोठा माणूस

- राज ठाकरे
शिवाजी पार्कमधील आम्ही सगळे 'अंडरआर्म'वाले... जोरजोरात बॉल टाकणारे. मीही त्यावेळी जोरात बॉल टाकायचो. एकदा आम्ही एमआयजी क्लबवर सचिनसोबत 'अंडरआर्म'ची मॅच घेतली. सचिन टूरवर जाण्याआधी आमची मॅच होती. आधीच रबरी बॉल, त्यात विकेट ओलसर असल्याने तो तुफान वेगात जायचा. अतुल रानडे, सुनील हषेर् अशी सगळी आमची टीम होती. सचिनने त्यावेळी तुफान बॅटिंग केली... दोन-तीन रबरी बॉल फोडूनही टाकले. माझ्या बोलिंगवरही त्याने फोर-सिक्स मारले. माझी बोलिंग त्याने चांगलीच झोडपली तरीही सचिनच्या फोर-सिक्सचेच मला अधिक कौतुक होते.

मॅच संपवून आम्ही नेटबाहेर बसलो होतो. रात्री मी आणि सचिन जेवायला जाणार होतो. आम्ही तसे बऱ्याचदा जेवायला भेटतो. मात्र त्यादिवशी सचिन म्हणाला, 'माझा हात खूप दुखतोय, आजचे रात्रीचे जेवण आपण कॅन्सल करूया. हाताचे दुखणे सहन होत नसल्याने रात्रीचे जेवण आपण एकत्र घेणे मला जमणार नाही.' तो दिवस सचिनच्या 'टेनिस एल्बो'चा होता. पुढे सचिनचा हात फारच दुखायला लागला आणि त्याला 'टेनिस एल्बो'ची शस्त्रक्रिया करावी लागली. यात जवळपास महिना गेला. ऑपरेशन झाले लंडनमध्ये. हॉस्पिटलमधून ज्या दिवशी सचिनला डिस्चार्ज मिळाला तेव्हा योगायोगाने त्यादिवशी मीही लंडनमध्ये होतो. त्यामुळे आमच्या जेवणाचा बेत त्यादिवशी लंडनमध्ये पार पडला. ज्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो होतो, तिथे ब्रम्हदेशाचे फूड फार छान मिळते. जेवताना त्याने मला त्याच्यावरील ऑपरेशनबाबत सगळी बारिकसारिक माहिती सांगितली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: