आजचा दिवस नकोसा झालाय....
डोळ्यासमोर सारखी तीच चित्र नाचतायत....
भिषण, बिभत्स वगैरे शब्द फिके पडतील अशा हिसाचाराची....
छिन्नविछीन्न झालेले डबे, फटलेले पत्रे,
रक्तमासाचा चिखल, किन्काळ्या, आक्रोश....
मेल्यावर स्वता उठून चालता येत नही म्हणून
रुळालगत पडून रहीलेली प्रेत....
आजून किती काळ हेच पहाव लागणार आहे?
कि सारीच चक्र उलट फिरताहेत...
भिम रणान्गणात हतबल झालाय
आणि दुःशासन त्याच रक्त पित बिभत्स नाच करतोय...
कहीच कळेनास झालय...
मनात वेदना, सन्ताप, असहाय्यता
सगळच एकदम दटून आलय...
हजारो लोक आपल्या घरापसून दूर,
हजारो लोक एक फोनची वात बघत,
तोडा वेळ का असेल पण मरणच जगतायत
हे सतत अस का घडतय?
आमचे पोलिस पिचलेत म्हणून?
आमचे गुप्तहेर फ़सलेत म्हणून?
आमचे नेते बरबटलेत म्हणून?
परिणामाच्या कागदावर एकूण बेरीज शून्य आहे
उमटल्याच तर॥ चार दोन शिव्या, निन्दा, निषेध
आताशा केराची टोपलीही लक्शा देत नसेल त्यान्च्याकडे...
आपलही रक्त उकळत ना... मग जात कुठे?
कदचीत त्याची वाफ होतेजाते
वर वर चढत मेन्दूपर्यन्त
मेन्दूत असतात विचार आपल्या स्वर्थाचे
'जाऊ दे ना आपण वाचलो ना...
''नशिबात असेल तेच होणार...''
आपल्या हतात काय आहे?'
यासारखे विचार त्या वाफेला हळू हळू दाबून टाकतात
आणि मग कळत......
आपण ज्याला रक्त समजत होतो इतके दिवस त्याच केव्हाच पाणि झालय
आम्ही केव्हाच षन्ढात जमा झलोय
म्हणूनच हे सगळ सतत घडतय...
कोणी महात्मा ओरडला 'अहिसा अहिसा'
आम्ही आन्धळे, त्याच्या प्रेमात पडलो
घरात साप पाळत राहीलो
कोणी बोम्बलला 'सर्वधर्मसमभाव'
आम्ही विषारी बान्डगूळ पोसत रहीलो
अतिरेकी दोघेही,
ते हिसेचा अतिरेक करतात
आपण अहिसेचा करतो
पण आता मात्र वेळ आली आहे
किव्वा इतकीच वेळ उरली आहे
हि विषारी वेल निखन्दून टाकण्याची
शक्ती मनगटात नक्कीच आहे
गरज आहे,
मनःशक्तीची, इच्छाशक्तीची
आणि मुळावर एक जबरदस्त घाव घालण्याची
हे अस्सेच विचार डोक्यात घुमतायत....
हेच उशाशी घेऊन रात्री कढायच्या आहेत....
आणि सकाळी ते तस्सेच राहीले तरच म्हणायच,
शरिरात अजून थोड रक्त शिल्लक आहे....
मन अजून जिवन्त आहे....
आणि नसतील तरचालू पडायच आपल कलेवर सम्भाळीत... रोजच्या गर्दीत...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा