शुक्रवार, १८ जुलै, २००८

मुंबई, मराठी आणि मराठी माणूस!

' मराठी' म्हणजे काय, हा वृथा वाद समाजातील सुशिक्षित धुरीणांनी घातला। मराठीचा उत्कर्ष व संरक्षण म्हणजे मराठी भाषेचे 'सोवळेपण' असा केला गेल्याने भाषेची शुद्धता टिकवण्यावरच महाराष्ट्राची ऐन तारुण्यातील दोन दशके वाया गेली। या वृत्तीमुळे मराठी भाषा व समाज या दोन्हीची एकाच वेळी परवड झाली। मराठीचे हित म्हणजे मराठी भाषेचे नव्हे, मराठी समाजाचे हित, हे या मंडळींच्या लवकर ध्यानात यावे। .........
बरोब्बर ४६ वर्षांपूवीर् महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनात नवी पहाट उजाडली, तेव्हा जी पिढी मध्यमवयीन, कतीर्सवरती होती, ती आता आयुष्याच्या संध्याछाया अनुभवते आहे आणि तेव्हा जे शाळकरी होते, ते आता मध्यमवयाची सीमा ओलांडून निवृत्तीचा प्रवास करत आहेत। १८ जून १९६२ रोजी टाइम्स ऑफ इंडिया समूहाचे 'महाराष्ट्र टाइम्स' हे दैनिक वृत्तपत्र प्रकाशित झाले. मराठी समाजासाठी हा एक अनोखा अनुभव होता. महाराष्ट्र राज्याची स्थापना होऊन जेमतेम दोन वषेर् उलटली होती. मोठा लढा देऊन मुंबई महाराष्ट्रात आली होती. पण मुंबईतून महाराष्ट्र मात्र निसटू लागला असल्याची भावना मुंबईतल्या सुशिक्षित मराठी समाजाच्या मनाला बोचू लागली होती. अशा वेळी 'महाराष्ट्र टाइम्स'चा जन्म झाला. मुंबईतील मराठी माणसाच्या मनात जी भावना तेव्हा होती, ती आज महाराष्ट्रातील बहुतेक मोठ्या व मध्यम आकाराच्या शहरांत पसरली आहे. त्यामुळेच 'महाराष्ट्र टाइम्स'ची जी गरज ४६ वर्षांपूवीर् होती, ती आज तितकीच कायम आहे, किंबहुना वाढली आहे.
म्हणूनच 'महाराष्ट्र टाइम्स'च्या ४६व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने 'मुंबई, मराठी आणि मराठी माणूस' यांचा संयुक्तपणे विचार व्हायला हवा। मुंबईत अठरापगड जाती-जमातींचे लोक राहत असल्याने मराठी माणसाचा टक्का कायमच कमी होता. तो घसरत चालला. याचा अर्थ मराठी माणसांची संख्या कमी झाली, असे नव्हे. अन्य भाषिकांची आवक वाढत गेली. त्यामुळे मुंबईवरचा मराठी संस्कृतीचा ठसा पुसट होऊ लागला. जेव्हा एखाद्या समाजाच्या अस्तित्वालाच आव्हान निर्माण होते, तेव्हा तो समाज बंड करून उठतो. त्यातून आंदोलने निर्माण होतात. या आंदोलनाची नावे काहीही असली, तरी मुळात तो अस्तित्वाचाच लढा असतो. अमेरिकेत कृष्णवणीर्यांचे आंदोलन काही दशके चालले; पाकिस्तानात मोहाजिरांचे बंड झाले. काश्मिरातील मुसलमानांनी लढा पुकारला, चीनमध्ये माओ-त्से-तुंगच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी एकजूट केली. हे घडत राहिले, याचे कारण त्या त्या प्रांतातील समाजांसमोर ञ्जश्ा ड्ढद्ग श्ाह्म हृश्ाह्ल ह्लश्ा ड्ढद्ग असा सवाल उभा राहिला. महाराष्ट्रातील मराठी समाजासमोर अशीच समस्या उभी असल्याचे जाणवते. त्यामुळेच कधी मुंबई, ठाणे, नाशिकच्या महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने, कधी ठाण्यातील लोकसभा पोटनिवडणुकीच्या धकाधकीत, कधी शिववडापावाच्या वादात तर कधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली मराठी समाज एकवटतो. तो जेव्हा असा एकत्रपणे उभा राहतो, तेव्हा त्याचा झंझावात बनतो, हे जुन्या व नव्या इतिहासावरून स्पष्ट दिसते. अडचण हीच आहे की, हा समाज आपले ऐक्य फारच क्वचित दाखवून देतो.
याचे कारण 'मराठी'ची 'प्रभुता' म्हणजे काय, याविषयी वेगवेगळे समज आणि बरेचसे अपसमज आहेत। शिकल्या-सवरल्या समाजातील, ज्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली व ज्यांच्यात तशी क्षमता होती, अशांनी सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रांत या प्रभुतेच्या वेगवेगळ्या व्याख्या तयार केल्या व त्या जनतेच्या गळी उतरवल्या। त्याचे तीन परिणाम झाले। समाज कायम दुभंगलेला राहिला, 'मराठी' म्हणजे नक्की काय, याविषयी कायम संभ्रमावस्था राहिली आणि त्यामुळे समाजाच्या उद्धारासाठी समाजच राजकीय नेते व त्यांच्या व्यवस्था यांच्या अधीन झाला. समाजाच्या सर्वंकष हिताच्या दृष्टीने हे तिन्ही परिणाम अपरिहार्य व घातकच ठरले.
महाराष्ट्राची स्थापना होण्यापूवीर् व त्यानंतरही राज्यातील सामाजिक, सांस्कृतिक चळवळ समाजातील एका घटकाच्या ताब्यात होती। तीच ती आडनावे व नावे वेगवेगळ्या क्षेत्रांत चमकत होती। त्यामुळेच मराठी समाज म्हणजे केवळ 'आपली जात' व केवळ 'आपली माणसे' अशी स्वत:ची समजूत बिनीला वावरणाऱ्यांनी करून घेतली व त्यामुळे उरलेल्या समाजाला 'ती' संस्कृती कधी 'आपली' वाटलीच नाही. ग्रामीण शिक्षण व्यवस्था, दलितांचे प्रश्ान्, गरिबी निवारणाची समस्या इथपासून ग्रामीण वाङ्मय आणि लोककला या सर्वच क्षेत्रांमध्ये तळागाळातून येणाऱ्या नेतृत्वाऐवजी मुंबई-पुण्यातील मंडळींचेच वर्चस्व. एखादे अण्णाभाऊ साठे, अमर शेख, राम नगरकर असायचे, पण त्यांचे मोठेपण सिद्ध होण्यासाठी या मंडळींचेच प्रशस्तिपत्र आवश्यक असायचे. त्यामुळे मुंबईसारख्या महानगरात जेव्हा गिरणी कामगारांचा प्रश्ान् निर्माण झाला, दलितांची अस्मिता जागी झाली आणि मुसलमान समाजालाही आपल्या अस्तित्वाची जाण आली, तेव्हा त्यांचे समर्थ नेतृत्व करण्यासाठी कोणी पुढे आला नाही. गिरणी कामगाराच्या प्रश्ानची खरी उत्तरे शोधण्यास डॉ. दत्ता सामंत कमी पडले आणि दलितांना तर त्यांच्याच नेत्यांनी राजकीय स्वार्थापायी वाऱ्यावर सोडले. ज्यांनी नेतृत्व घेतले, त्या साऱ्यांचाच प्रवास 'अस्थैर्याकडून स्थैर्याकडे' या दिशेने असल्याने दलित नेते, साहित्यिक, सनदी अधिकारी आणि राजकारणी या साऱ्यांनी आपापल्या खुर्च्यांची 'आसने' केली. अशा तऱ्हेने सारा समाजच दुभंगत राहिला.
' मराठी' म्हणजे काय, हा वृथा वाद समाजातील सुशिक्षित धुरीणांनी घातला। मराठीचा उत्कर्ष व संरक्षण म्हणजे मराठी भाषेचे 'सोवळेपण' असा केला गेल्याने भाषेची शुद्धता टिकवण्यावरच महाराष्ट्राची ऐन तारुण्यातील दोन दशके वाया गेली. मराठी टिकवायची, तर मराठी समाज टिकायला हवा आणि मराठीचा विकास करायचा, तर आधी मराठी समाज सार्मथ्यवान व्हायला हवा, याकडे या मंडळींचे लक्षच नव्हते. त्यामुळेच एकीकडे मराठी समाजातील अख्खी तरुण पिढी इंग्रजी माध्यमातील शिक्षणाकडे ओढली जात असताना त्यांचे सुज्ञ, सुजाण व सुशिक्षित पालक मात्र समाजातील 'मराठी' कोणत्याही 'प्रदूषणा'पासून मुक्त कशी राहील, याची काळजी घेत राहिले. आपल्या मुलाला मराठीत एक शब्द वाचण्याची वा बोलण्याची गोडी राहिली नाही तरी बेहत्तर, पण मराठी भाषेत परभाषेतील एक शब्दही येऊ देणार नाही, या वृत्तीमुळे मराठी भाषा व समाज या दोन्हीची एकाच वेळी परवड झाली. मराठीचे हित म्हणजे मराठी भाषेचे नव्हे, मराठी समाजाचे हित, हे या मंडळींच्या लवकर ध्यानात येईल, तर बरे.
जात, वर्ग आणि संस्कृती यामुळे दुभंगणाऱ्या समाजात 'मराठी'ची 'प्रभुता' म्हणजे काय, याविषयीच वैचारिक गोंधळ सुरू झाल्यामुळे समाजाचे सामाजिक, सांस्कृतिक नेतृत्वही राजकीय नेत्यांच्या हातात गेले। राजकारण म्हटले की, जातपातीचा 'व्यवहार' होणार, हेही ओघाने आलेच. 'बळी तो कान पिळी' या न्यायाने जी जात पैसा, शक्ती व संख्येने श्रेष्ठ तिचे राजकारण चालू झाले. अशा व्यवस्थेचे फायदे असतात, तसेच तोटेही असतात. ते सारे महाराष्ट्राने अनुभवले. त्यातून काही शहाणपण आले, काही येण्याची गरज आहे.
आणखी दोनच वर्षांनी महाराष्ट्राच्या स्थापनेचा सुवर्ण महोत्सव साजरा होईल, तेव्हा हे राज्य खरेच संपन्न असणार की, त्याच त्या खस्ता खाणारे, दुहीच्या गतेर्त अडकलेले केवळ नावाचे 'महा'राष्ट्र असणार, याचा निर्णय आजच राज्यातील जाणिते कोणत्या दिशेने पावले टाकतात, त्यावर ठरणार आहे. मुंबईतील मराठी माणसाकडे वैयक्तिकरीत्या खूप संपदा आहे. अशी संपदा केवळ तिजोरीबंद धनराशींचीच असायला हवी, असे नाही. मराठी माणसाकडे विचारधन, कल्पकतेची चमक आणि संस्कृतीची महत्ता हे सारे काही आहे. त्याचा सामुदायिक परिणाम साधायचा, तर 'सार्मथ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, मात्र तेथे भगवंताचे, अधिष्ठान पाहिजे' हा मंत्र ध्यानात ठेवून वाटचाल करावी लागेल. त्यासाठीच तर 'महाराष्ट्र टाइम्स'ची तीव्र गरज आहे.
(लेखक शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार आणि टाइम्स समूहाचे संपादकीय सल्लागार आहेत.)
- भारतकुमार राऊत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: