नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच
ढगांशी वारा झुंजला रे
काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच, नाच रे मोरा ...
झरझर धार झरली रे
झाडांची भिजली इरली रे
पावसात न्हाऊ, काहीतरी गाऊ
करुन पुकारा नाच, नाच रे मोरा ...
थेंब थेंब तळयात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघात, खेळ खेळू दोघांत
निळया सवंगडया नाच, नाच रे मोरा ...
पावसाची रिमझिम थांबली रे
तुझी माझी जोडी जमली रे
आभाळात छान छान सात रंगी कमान
कमानीखाली त्या नाच, नाच रे मोरा ...
गायक :आशा भोसले
संगीतकार :पु। ल।
*****************************************************
कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगनभरारीचे वेड रक्तातच असावे लागते.. कारण आकाशाची ओढ़ दत्तक घेता येत नाही...
*****************************************************
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा