समोर आहे त्याच्या नावाने, उगीचच कह्णतात लोक
कधिच दिसत नाही त्याला मात्र, "देव" म्हणतात लोक
जो तो आपल्या साठी आपले आयुष्य जगत असतो
मग प्रेम, त्याग वगैरे शब्द कुठून आणतात लोक?
नातं जर असेल नाजूक धागा, तर थोडं सैल सोडायला हवं
सगळं कळूनही तुटेपर्यंत, का बरं ताणतात लोक?
माहित नसते कशासाठी, आहे हा सर्व खटाटोप
मृगजळाच्या मागे धावून तरी पण शिणतात लोक
जो मेला त्याच्यासाठी "अमर रहे" च्या घोषणा देतात
आणि जो जिवंत आहे त्याची, कबर खणतात लोक
-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा