सोमवार, २१ जुलै, २००८

काँलेजची ती जुनी वही.........

काँलेजची ती जुनी वही

कधी धरावी घटट् ह्रदयाशी

घेत मग तो जुनाट सुगंध

खेळत बसावे आठवणींशी।

प्रत्येक पानाशी क्षणभर थांबावं

त्याच्याशी निगडीत सारं आठवावं

अन् आपला तो बावळेपणा.........

नकळत स्वःताशीच हसावं

एखाद्या पानावरचं सरांच व्यंगचित्र

एखाद्या पानावरची शेरो शायरी

एखाद्या पानवरची ग्राफ़िटी

अन् एखाद्या पानाची तिला पाठवलेली चिठठी।

अन् एखाद्या पानाची तिला पाठवलेली चिठठी।

एखाद्या पानावरचे क्षण काही उदास

एखाद्या पानाच मारलेला बाण

आणि एखाद्या पानावरची कविता छान

क्षणभर् त्या आठवणीत जगावं

जुनं सारं आठवुन पहावं

टीपत पापण्यातले पाणी मग

वर्तमानात हलकेच परतावे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: