शुक्रवार, ४ जुलै, २००८

या देशाला जिजाऊचा, शिवा पाहिजे...

या देशाला जिजाऊचा, शिवा पाहिजे...

अंधार होत चाललाय
दिवा पाहिजेया देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे ॥


नेते झाले अफ़जलखान
काश्मिरचे झाले स्मशान।
शायिस्तेखानची बोटे तोडण्यास
युवा पाहिजे।
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे ॥


मराठे झाले यौवनभक्त
मराठ्यांच्याच तलवारीवर
मराठ्यांचेच रक्त
पुन्हा एकदा रायगडावर
मराठ्यांचा दावा पाहिजे
हर हर महादेव 'हवा' पाहिजे
'हवा' पाहिजेया देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: