रस्त्याच्या कडेला गिर्हाइकाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या तीलाही
होतं कधी काळी माणसाचं मन
जे गाडलं गेलं होतं
कित्येक वासनांधांच्या वासनेच्या ढीगाखाली
रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या कित्येक
तथाकथीत नैतिकांच्या तुच्छ नजरा
पुन्हा पुन्हा जाळत होत्या
तिचं ते गडलं गेलेलं माणसाचं मन
कदाचीत त्यानां माहीतच नसावं
तिनेही कधी पाहिला होता स्वप्नात राजकुमार
अन् मनोमन ठरवुनही टाकलं होतं त्याच्याशी एकनिष्ट रहान्याचं
आपलं सर्वस्व त्याला वाहात
परीस्थीतीने हतबल झालेल्या तिला
खंत नव्हती स्वप्न भंगन्याची
पण खंत होतीया जाणाऱ्या येणाऱ्या कित्येकांना
आई बहीणी आपल्यामुळे सुरक्षीत असल्याची जाणीव नसण्याची
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा