बुधवार, २३ जुलै, २००८

मुंबई

किडया मुंगीसारखी माणसे मारुन
सैतान मजेत जगताहेत
शिष्टाचाराच्या नावाखाली
नेते मेजवान्या झोडताहेत
गहाण पडलेय राष्ट्रप्रेम
भीक मागताना मतांची
कीड लागलीये देशाला
रक्त मागणारया पशुंची
काय ते एकदा संपवत का नाहीत
विषारी साप ठेचत का नाहीत
असल्या स्फ़ोटात कधीच कसे
नेते अजिबात मरत नाहीत
गोळीबारात एक अतिरेकी मरताच
मानवाधिकार वाले पेटुन उठतात
तडफ़डुन शेकडो माणसे मेली
बघताना का त्यांचे डोळे फ़ुटतात ?
देशाला मुंबईतला पैसा दिसतो
सुळावरलं जगणं दिसत नाही
सैतानांनी पोखरलिये मुंबई
तिची वाहती जखम दिसत नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: