शुक्रवार, ४ जुलै, २००८

माझं स्वप्न ....

माझं स्वप्न ....
एके दिवशी स्वप्नामध्ये संत ज्ञानेश्वर आले

करुनी, करावी गंमत म्हणुन प्रश्न मी त्यांना विचारले

मी म्हणालो - ज्ञानदेवा, तुमची फार मजा होती

मांडे भाजण्यासाठी चक्क तुम्ही तुमची पाठ तापवली होती

मलाही जरा सांगाल का? पाठ कशी तापते

कारण गॅसच्या रांगेत उभा राहुन आमची पाठ दुखते

हे तरी तुम्हाला सांगावच लागेल, रेडा बोलला कसा

चार वेद आणि शास्त्र-वेद पुराण, नेमका शिकला कसा

कारण माणुसरुपी रेडे, आहेत खुप इथे

खोटं बोलुन - स्वार्थ साधुन, संधी साधतात जिथे तिथे

ज्ञानदेवा, निदान सांगा मला हे तरी

की गेलात कसे आपण चालत्या भिंतीवरी

कारण रेल्वे आणि वाहनं चालत नाहीत नीट इथे

आणि आमचं नशीब एवढं वाईट की, सरकार ही निट चालत नाही तिथे

तुमचं ऐकुन आम्ही रोज डोकं खाजऊ

एथे न चालणा-या सा-या वस्तु, रोज आम्ही चालवु

माझे प्रश्न एकुन खरंच ज्ञानदेव हसले

अम्रुतापरी एक एक शब्द , माझ्याकडे पाहुन बोलले

तो काळ असा होता की काहीच नव्हतं कमी

अजुनही तोच काळ आहे, बदलुन गेलात तुम्ही

असावा विश्वास गुरुवरी, आणि भिस्त असावी कर्मावरी

कलयुगाचे अवतार आहेत, बाबा निरंकारी

निरंकारी बाबांनी बोलतं केलयं, लाखो करोडो रेड्यांला

सद्गुगुरु क्रुपे गुढ समजले, "प्रसाद सकट" या वेड्याला

....................... प्रसाद सुखदेव सकट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: