शुक्रवार, २५ जुलै, २००८

राज्यातून भय्यांची 'साफसफाई' करणार - राज ठाकरे

महाराष्ट्राचा विकास करायचा आणि तो सारा उत्तर प्रदेशी व बिहारी लोकांच्या घशात घालायचा, हे मला मान्यच नाही. त्यामुळे आधी साफसफाई झाली पाहिजे. त्यानंतर 'नवनिर्माण'!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ग्वाही ........

आपला पक्ष मराठी तरुणांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी काय करीत आहे?

अहो, आधी विविध सरकारी कंपन्या, तसेच बँकांमध्ये भरलेला उत्तर भारतीय व बिहारींचा 'लॉट' तरी बाहेर कादूया. अनेक ठिकाणच्या नोकऱ्या त्यांनी काबीज केल्या आहेत. त्यांचे पितळ उघडे पाडण्याचे काम चालू आहे. त्यांनी छिनलेल्या नोकऱ्या परत मिळविण्याचाच हा एक भाग आहे. विषारी सापाला मारण्यासाठी केवळ बिळाबाहेर काठी आपटून जमत नाही. त्याला बिळाबाहेर काढूनच मारावे लागते.

मराठी टक्का कमी होत आहे, त्याचवेळी अनेक क्षेत्रांत मराठी व्यक्ती चमकताहेत. असा विरोधाभास का?

हा संख्या आणि गुणांचा मुद्दा आहे. महाराष्ट्रात अनेक गुणवान व्यक्ती असून त्यांच्यावरच महाराष्ट्र ताठपणे उभा आहे.

शिवउद्योग तुम्ही सुरू केला होतात ,त्याचे पुढे काय झाले?

चांगलेच काम सुरू आहे. मात्र अनेकांना शिवउद्योगातून चालणाऱ्या कामापेक्षा मायकल जॅक्सनचे काय झाले याचीच काळजी वाटतेय. शिवउद्योगाचे काय झाले याची काळजी ज्यांना वाटतेय, त्यांनी शिवउद्योगाच्या कार्यालयात जाऊन चौकशी करावी.

इंग्रजी भाषेतून शिक्षण घेतल्यास प्रगती झपाट्याने होते काय?

इंग्रजीला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. ही जगभरात बोलणारी भाषा असल्याने ती आलीच पाहिजे. मात्र, म्हणून आपली मातृभाषा कशाला सोडायला हवी? फ्रान्समधली 'एअरबस' ही कंपनी विमाने बनविते तेव्हा त्यासंदर्भातील सर्व सूचना फेंच भाषेतच असतात. इतर देश त्यांच्या सोयीनुसार त्या इंग्रजी भाषेत करून घेतात. तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावर इंग्रजी बोलले जाते, म्हणून तेथील लोक तमीळ भाषा बोलण्याचे सोडून देत नाहीत.

मराठी माणूस नोकरीच्या मागे लागतो, व्यवसाय-धंद्यात पडत नाही, असे सातत्याने बोलले जाते...

हा ज्याच्या-त्याच्यातील गुणांचा प्रश्ान् आहे. महाराष्ट्राच्या मातीतच सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, जयंत नारळीकर, दादासाहेब फाळके यांच्यासारखी रत्ने जन्माला आली आणि त्यांच्यामुळे महाराष्ट्राचा नावलौकिक वाढला आहे. कितीतरी नामवंत वकील, डॉक्टर, चित्रपट कलाकार तसेच आंतराष्ट्रीय चित्रकारांची मोठी जंत्रीच आहे. मराठी साहित्य आणि कवितांना नोबेलच्या दर्जाचे पुरस्कार लाभले आहेत. मात्र, केवळ मराठीमुळे जगाचे याकडे लक्ष गेलेले नाही. महाराष्ट्राला थोर साहित्यिक तसेच संतांचाही वारसा लाभलेला आहे. हे केवळ महाराष्ट्रातच आहे, इतर प्रांतांत नाही. एखादा नामवंत साहित्यिक वा कवी मारवाडी-गुजराती समाजात दिसत नाही. मात्र, त्याचवेळी ही मंडळी व्यवसायात अग्रेसर आहेत.

उत्तर भारतीय मुद्दा वगळता तुम्ही तुमच्या कार्यर्कत्यांना आणखी कोणती प्रगतीची दिशा दाखविणार आहात?

अहो, उत्तर भारतीयांची साफसफाई झाल्याशिवाय महाराष्ट्राचे नवनिर्माण कसे होणार? केवळ विकास करून तो या उत्तर प्रदेश आणि बिहारींच्या घशात घालायला मी अजिबात तयार नाही. आधी त्यांची साफसफाई करणार आणि मग विकासाला हात घालणार

भूमिपुत्रांना उद्योगांत ८० टक्के नोकऱ्या देणे कायद्याने बंधनकारक आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी काय करणार?

उद्योगधंद्यामध्ये ८० टक्के नोकऱ्या मिळायला हव्यात, यासाठी आपण कंपन्यांमध्ये पत्रे पाठविली आहेत. शिवाय तिथे नेमक्या किती जागा भूमिपुत्रांनी भरल्या आहेत आणि किती जागा परप्रांतीयांनी भरल्या आहेत, त्याची आकडेवारी मागवून घेतली आहे. ज्या नव्या नोकऱ्या निर्माण होतील, त्या भूमिपुत्रांनाच कशा मिळतील त्यासाठी व्यूहरचना सुरू आहे.

कार्यर्कत्यांनी पाया पडण्याचा प्रघात आपण बंद केला होतात. मात्र तो अधूनमधून दिसतो..

मला आजही माझ्या कार्यर्कत्यांनी पाया पडलेले आवडत नाही आणि ते मी करूनही घेत नाही. ही एक प्रकारची लाचारी आहे. ती का करू द्यायची आणि करून घ्यायची?

पुढचे पाऊल काय आहे?

सगळ्या गोष्टी एकदम पोतडीतून बाहेर काढायच्या नसतात. त्या हळूहळू बाहेर पडायला हव्यात. त्यामुळे पुढे काय करतोय ते बघत राहा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: