शुक्रवार, १८ जुलै, २००८

पुन्हा पुन्हा 'मुंबई कोणाची?'

मुख्य म्हणजे हे शहर माझे आहे, या प्रमेयावरच मुंबईकर मराठी माणसाची श्रद्धा राहिलेली नाही, ही भीती वाटावी, अशी परिस्थिती आहे। माणूस असा भयग्रस्त होतो, तेव्हा तो त्या विषयावर वारंवार टाहो फोडत राहतो। जखमेवर खपली धरू लागली, तरी ती नखाने कुरतडून वेदना पुन्हा पुन्हा जागृत करण्याची खोड अनेकांना असते। मराठी माणसालाही ही सवय लागली आहे. ...........
बई, मराठी, मराठी माणूस, त्याचे शहरातील स्थान, त्याचे भवितव्य हे विषय सध्या ऐरणीवर आले असल्याने त्यावर बरेच काही बोलले, लिहिले जात आहे। गल्लीपासून दिल्लीपर्यंत याच विषयावर चर्चा चालू असली तरी मुख्य विषयाला कोणी फारसा स्पर्श करीत नाही। हा विषय म्हणजे ही 'मुंबई नक्की कोणाची?' या प्रश्ानचे उत्तर शोधले, तर बऱ्याच गोष्टी आपसूक स्पष्ट होतील आणि मुंबईच्या विषयावर मुंबईपासून दूर बिहार, उत्तर प्रदेशपर्यंत आणि विधान भवनापासून संसदेपर्यंत गदारोळही होणार नाहीत.
मुंबईसारखी या देशात अनेक शहरे आहेत, तिथे व्यापार, उदिम चालतात आणि नोकरी-धंद्याच्या निमित्ताने बाहेर गावचे लोक येऊन स्थायिक होतात। पण अहमदाबाद कोणाचे, ही शंका कोणाला सतावत नाही आणि चेन्नई कोणाची, हा प्रश्ान्ही चचेर्ला येत नाही। बंगळुरू तर आता नव्या मााहिती युगाचे भारतातील माहेरघर. देशभरातील सुशिक्षित तरुण पिढी आज या शहराकडे आकृष्ट होत आहे. पण बंगळुरू कोणाचे, असे कोणी कोणाला विचारत नाही. कोलकात्याचे रुपही पालटत आहे. तिथे मार्क्सवादी कम्युनिस्टांची राजवट गेली तीन दशके असली, तरी आता तिथे भांडवलदार मोठी गुंतवणूक करू लागले आहेत. मोठे उद्योग आणि त्यापाठोपाठ बाहेर राज्यांतील लोक तिकडे येऊ लागले आहेत. तरीही परराज्यांतील लोक कोलकात्यावर आपला हक्क सांगताना दिसत नाहीत.
मुंबईच्या बाबतीत मात्र हे महानगर नक्की कोणाचे, हा प्रश्ान् वारंवार उद्भवतो आणि विशेष म्हणजे या प्रश्ानचे ठोस उत्तर न शोधता, प्रत्येकजण त्याच्या अवतीभवतीच रेंगाळत राहतो. याचे कारण मुंबई कोणाची? या प्रश्ानचे खरे उत्तर अनेकांची बोलती बंद करणारे ठरेल।
अहमदाबाद गुजरात्यांचे, चेन्नई तामिळींचे, बंगळुरू कन्नडिगांचे आणि कोलकाता जर नि:संदिग्धपणे बंगाल्यांचे, तर मुंबई मराठी माणसांचीच, असे उत्तरही स्वाभाविकपणे अपेक्षित आहे। पण तसे होत नाही. मुंबई व महाराष्ट्रातील मराठी समाजही असे उत्तर देण्यास कचरतो, कारण ते वास्तव नाही, याची बोचरी जाणीव त्यालाही आहे. शहर ज्या भाषिकांचे, त्या भाषेचे व संस्कृतीचे प्रतिबिंब त्या शहराच्या प्रत्येक जाणीवेवर पडायला हवे. मुंबईच्या बाबतीत तसे होत नाही, हे खरे दुखणे आहे. मुंबईतील भय्यांना मारून व त्यांना इथून हाकलून देण्याचा प्रयत्न करून या प्रश्ानचे उत्तर सापडणार नाही. एकतर भय्यांनाच हाकलायचे, तर मराठी संस्कृतीवर आक्रमण करणाऱ्या गुजराती, मारवाडी समाजाच्या लोकांचे काय? आणि मुंबईतील झोपडपट्ट्या आणि अनेक बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्या बांगला देशींचे काय? हे प्रश्ान् उभेे ठाकतात आणि दुसरे असे की, भय्यांना हाकलून देण्यात आपण यशस्वी झालोच व ते खरेच निघून गेले, तर ते ज्या सेवा मराठी माणसांसह सर्व मुंबईकरांना पुरवतात, ती कामे कोण करणार, हा प्रश्ान् उरतोच.
मुख्य म्हणजे हे शहर माझे आहे, या प्रमेयावरच मुंबईकर मराठी माणसाची श्रद्धा राहिलेली नाही, ही भीती वाटावी, अशी परिस्थिती आहे। माणूस असा भयग्रस्त होतो, तेव्हा तो त्या विषयावर वारंवार टाहो फोडत राहतो. जखमेवर खपली धरू लागली, तरी ती नखाने कुरतडून वेदना पुन्हा पुन्हा जागृत करण्याची खोड अनेकांना असते. मराठी माणसालाही ही सवय लागली आहे. मुंबई कोणाची? हा प्रश्ान् गेल्या वषीर् मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने धसाला लागला होता. त्यावेळी मुंबईकरांनी या प्रश्ानचे उत्तर स्पष्टपणे दिले होते. पण राजकीय उत्तर मिळाले, तरी त्यामुळे सामाजिक व सांस्कृतिक उत्तरे मिळाली नाहीत. तिथे वैचारिक गोंधळ चालूच राहिला. गणेशोत्सवावर मराठी संस्कृतीची मक्तेदारी राहिली नाही आणि नवरात्रीवरचे मराठीपण तर केव्हाच नष्ट झाले. दादर, विलेपालेर्, परळ या अस्सल मराठी वस्त्यांमधल्या फुटपाथवर भय्यांनी संस्थाने थाटलीच पण मोठाल्या मॉल्समध्ये विक्रेते म्हणून उत्तर भारतीयच दिसायला लागले. तिथे जे मराठी तरूण आले, त्यांना आपण मराठी आहोत, हे विसरणेच अधिक श्रेयस्कर वाटू लागले. त्यामुळेच मराठीतून ग्राहकाने विचारलेल्या प्रश्ानंना मराठी विक्रेते तरुण सफाईदार इंग्रजीतून उत्तरे देऊ लागले. यामुळे धंद्याचे काय झाले कोणास ठाऊक, पण विक्रेते आणि त्यांचे बॉसेस मात्र सुखावले. यालाच स्वत:चे वैश्विकरण असे ते मानू लागले.
समाजातील मोठ्या घटकाच्या उदासीनतेचा फायदाच अमराठी व मराठी नेत्यांनीही घेतला। जेव्हा वातावरणात कमी दाबाचा पट्टा तयार होतो, तेव्हा बाहेरचे वारे तेथे वेगाने प्रवेश करतात आणि पोकळी भरून काढतात। मुंबईचे तसेच झाले आहे। इथे राहणारा मराठी समाजच इथे मागणीची पोकळी तयार करण्यास कारणीभूत ठरला। ती व्यापण्यासाठी बाहेरील लोक इथे आले आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांचे नेतेही आले. तीस वर्षांपूवीर् चंदकांत त्रिपाठी नावाचा युवक संजय गांधींचा माणूस म्हणून मुंबईत आला आणि अवघ्या सहा महिन्यांत महाराष्ट्राचा नगरविकास राज्यमंत्री बनला. पण याची सुरूवात त्यापूवीर्च झालेली होती. रामनाथ पांडे, एच. एन. त्रिवेदी, रमेश दुबे त्या आधीच आमदार बनले होते. चंदकांत त्रिपाठींनी उत्तर प्रदेशचा निर्ढावलेपणा आणि बेमुर्वतखोरी आणली इतकेच. त्यानंतर कधी कृपाशंकर सिंह तर कधी अबु आझमी आले. मुंबईचं बॅलिवुड अमराठी पण मुंबईकरांच्या ताब्यात होतं. तेही उत्तरेकडे गेलं. मुंबईच्या क्रिकेट टीममध्येही तीच नावं चमकू लागली. याला कारण इथल्या मराठी समाजाने वातावरणात पोकळी निर्माण केली.
मराठी नेत्यांसाठी हीसुद्धा पर्वणीच ठरली। जत्रेत हवशे असतात, तसेच गवशेही असतात. मराठी मनाची मक्तेदारी आपल्याचकडे आहे, असे मानणारा राजकारणात एक वर्ग आहे. या वर्गाने आपले राजकीय अवकाश (पोलिटिकल स्पेस) शोधण्यासाठी मराठी समाजालाच बहकवण्यास सुरुवात केली. त्यातून नेते मंडळींना आपापले अवकाश कदाचित सापडेलही, पण मराठी समाजच द्विधा मन:स्थितीत सापडल्याने त्याचे मोठेच नुकसान होईल. शिवाय मुंबई कोणाची? हा प्रश्ान् तसाच अनुत्तरीत राहील. भय्यांना चोप दिल्याने, अन्य पक्षांच्या नेत्यांवर शाब्दिक वार केल्याने व कायद्याच्या पळवाटा शोधून आक्रमक भाषणे केल्यामुळे प्रसिद्धी व जीवदान दोन्ही मिळते, पण कार्यभाग काही साधला जात नाही।
(लेखक टाइम्स वृत्तसमूहाचे संपादकीय सल्लागार असून शिवसेनेचे राज्यसभा सदस्य आहेत.)
- भारतकुमार राऊत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: