का कळत नाही पण,
हल्ली मन थोड कठोर झालंय
"प्रेम" ह्या शब्दातला जिव्हाळा थोडा कमी झालांय
प्रेम... प्रेम... प्रेम... बसं झालं आता
अरे, एखादी गोष्ट आयुष्यात आपली होणारच नाही
तर मग त्या गोष्टीचा विचार वारंवांर का?
तिलाही माहीती आहे की ती माझी हॊऊ शकत नाही
आणि मला ही माहीती आहे की मी तिचा हॊऊ शकत नाही।
दोघांची गत अशी झालीयं
जसं आळवाच पानं आणि त्यावरचा थेंब
स्पर्श हॊऊ शकेल , पण एकजीव उभ्या जन्मात नाही।
माझ्या मनातल्या भावना तीच्या मनात कधीचं पोहोचल्यात
आणि तीच्या मनातल्या भावनाही माझ्या मनात पोहोचल्यात।
दोघांच्या भावनेत प्रेम आहे, हे दोघानांही माहीती आहे
मग ह्या भावना स्पष्ट का होत नाहीत ???
नाही त्या कधीचं स्पष्ट होणार नाहीत...
त्या मागे एकच कारण असावं...
दोघांनाही एकाच बंधनाने जखडुन ठेवलयं...
संस्कार ...
माझ्या लाडलीला लहानाच मोठं केलं
पोरीनं जे मागीतलं ते बापानं पुरवलं
पण शेवटी कायं, माझी पोरगी पळुन गेली।
रस्त्यानं जाताना बायकांची होणारी ती कुजबुज
हि बघ, हि बघ, हिचीच पोरगी पळुन गेली त्यादिवशी
अशा यातनेनं माझ्या मायेच्या काळजाला चीरा पडु नयेत...
म्हणुन ...
पोराला लहानाचा मोठा केला
स्वतः फाटकी गंजी घातली
पण पोराच्या कपडयाची इस्त्री कधी चुकवली नाही
अरे, काय केलं नाही, ह्या बापांन माझ्यासाठी
स्वतःच्या पोटाची खळगी केली
पण या लेकाला कम्पुंटर इंजीनीयर बनवला
बापांन एकचं मागीतंल माझ्याकडं
पोरां आपल्या जातीचीच पोरगी कर हां लेका...
आयुष्यात एकच गोष्ट मागीतली बापानं , आणि मी ती ही पुर्ण करु नये
...म्हणुन......
खरंच संस्कार म्हणजे बंधंन ???
नाही....
संस्कॄती जपण्यासाठी दोन जिवांचां लागलेला लळा म्हणजे... संस्कार
आणि मगं ह्या लळ्यापुढे बाकी सर्व गोष्टी
स्वहः
आणि मग आम्ही म्हणतो
आमच्या नशीबात प्रेमंच नाही।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा