'' मराठी'च्या मुद्यांवर शिवसेनेला संकुचित किंवा जातीय ठरविण्याचा प्रयत्न होऊनही शिवसेनेने 'मराठी'चा ध्यास कधी सोडला नाही। कारण मराठी हाच शिवसेनेचा 'श्वास' आहे। भय्याने हात-पाय पसरले म्हणून त्यातील काहीजणांचे हात-पाय तोडले जातील. पण भय्यांनी रिकाम्या केलेल्या इस्त्री, दूध, भेळपुरी, टॅक्सी व्यवसायांत मराठी तरुण उभा राहणार आहे काय? ज्या दिवशी तो असा उभा राहील त्या दिवशी त्याचे कल्याण होईल. त्या कल्याणाचा वसा शिवसेनेने घेतलाच आहे. तो सोडला कधी?' सांगत आहेत शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत ......
' शिवसेनेची मराठी माणसाबाबतची भूमिका काय?' असा प्रश्न विचारणे मूर्खपणाच आहे। मराठीहित, मराठी कल्याण हीच शिवसेनेची भूमिका आहे. 'जन्मदात्या आईची तिच्या मुलाविषयी जी भूमिका असते तीच शिवसेनेची मराठी माणसाविषयी भूमिका आहे व राहील. त्यामुळे असे प्रश्न विचारणे गैरवाजवी आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून जे वातावरण निर्माण झाले त्यामधून हे प्रश्न विचारले गेले. मुंबईतील टॅक्सीवाले उत्तर हिंदुस्थानी आहेत व त्यांचा उपदव मुंबईला होतो. हे टॅक्सीवाले दादागिरी करतात, उद्धटपणे वागतात व त्यांच्या लोकसंख्येच्या बळावर मस्तवालपणे वागतात. ही भावना येथील मराठी भाषिकांतच नव्हे तर ती सार्वत्रिक आहे. गुजराती, दाक्षिण्यात्य समाज मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात राहतो. त्यांच्याही मनात हाच संताप खदखदत असतो. पण मराठी माणसाप्रमाणे 'अरे ला कारे' करून मर्दानगी दाखविण्याची हिम्मत त्यांच्यात नसल्याने हे सर्व 'राडे' मराठी माणसाने करावे व आपण त्याची मजा घ्यावी या वृत्तीने ते मस्त जगत असतात. मुंबईत टॅक्सीवाल्यांना मारहाण झाली व त्याचे पडसाद प्रसिद्धीमाध्यमांनी मोठ्या प्रमाणात उमटवले. पण एक-दोन हिंदीभाषिकांना धोपटून 'मराठी'वरील आक्रमणाचा प्रश्न सुटणार आहे काय? दोन टॅक्सीवाल्यांना चोपूनही मुंबईच्या रस्त्यांवर त्याच टॅक्सीवाल्यांचा महापूर कायम आहे व ज्यांच्या टॅक्सी फुटल्या त्यांना मदत म्हणून अमरसिंग यांनी २० लाख रुपयांची मदत महात्मा अबू आझमी यांच्याकडे सुपूर्द केली.
अमरसिंग, अबू आझमी, उत्तर प्रदेश किंवा बिहारचे 'यादव' नेते यांच्याविरुद्ध महाराष्ट्राच्या मनात असंतोष खडखदत आहे तो त्यांच्या याच विकृतीमुळे। मुंबईतील मराठी माणसांवर यापेक्षा भयंकर संकटे आली. पण या अमरसिंगाने २० दमड्याही दिल्या नाहीत. त्यामुळे अमरसिंगांसारख्यांनी मुंबई-महाराष्ट्रातील मराठी माणसाला शहाणपणा शिकवू नये. प्रश्न फक्त मराठीचा नाही तर महाराष्ट्र धर्माचा आहे व त्या धर्मावरचे आक्रमण रोखण्यासाठी शिवसेनेने जिवाची बाजी लावली आहे.
मुंबई शहराची परिस्थिती तर अतिशय विचित्र आहे। मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावा म्हणून इतका मोठा लढा सर्वांनी दिला. मुंबई ही भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राची झाली, परंतु व्यवहारात ती सर्वांची राहिली. कोलकाता, चेन्नई, बंगळूर ही शहरे मुंबईसारखीच मोठी असूनही तेथील सर्व व्यवहार हे स्थानिक भाषेत चालतात. त्या राज्याची भाषा येत असल्याशिवाय तुम्हाला तेथे वास्तव्य करता येत नाही. मुंबईत राहण्यासाठी मराठी भाषा यावी लागत नाही. कोलकाता व चेन्नई, बंगळूर ही मुंबईइतकी बहुरंगी नाहीत, असे उत्तर त्यावर दिले जाईल. पण या बहुरंगात मराठीचा रंग आहे व तो गेल्या ४० वर्षांत फक्त शिवसेनेमुळेच टिकला आहे हे सिद्ध करण्यासाठी कुणाच्या सटिर्फिकेटची गरज शिवसेनेला नाही.
' डोईवर सोनेरी मुकुट आणि अंगावर फाटके कपडे' अशी अवस्था मराठीची झाल्याचे मत कुसुमाग्रजांनी मांडले। ते खरे असेल, तर त्यास जबाबबदार आमचे मराठी राज्यकतेर्च आहेत. बंगळूर व हैदराबाद ही शहरे आय.टी. क्षेत्रात प्रगत झाली तरी तेथील राज्यकतेर् मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, चेन्नई, बंगळूर, हैदराबाद ही शहरे संपूर्ण देशाची. आवो जावो घर तुम्हारा असे ते कधीच म्हणत नाहीत. ही शहरे प्रथम आमच्या राज्याची व मगच देशाची ही त्यांची भूमिका असते. हिंदुस्थानच्या राजधानीत सुसंवाद साधण्यासाठी त्यांना एखादा कृपाशंकरही लागत नाही व निरुपमही लागत नाही, याचे भान महाराष्ट्राचे राजकारणी कधी ठेवणार? मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे व त्यामुळेच मराठी माणसाचा त्यावर पहिला हक्क आहे, असे बोलणे हा मात्र गुन्हा व देशदोह ठरवला जातो.
हिंदुस्थानातील साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा असे सांगणारे पंतप्रधान मनमोहन सिंग मात्र अबू आझमी, मुलायम, लालू, अमरसिंगांच्या दृष्टीने गौरवास पात्र ठरतात। हिंदुस्थानचे पंतप्रधानपद भूषवलेले देवेगौडा हे बंगळुरात येऊन नारायणमूतीर्ंसारख्या उद्योगपतींना दम देऊन सांगतात, ''बंगळुरात तुम्हाला उद्योगांसाठी जमीन दिली आहे ती काही बाहेरच्या लोकांना रोजगार देण्यासाठी नाही. तुम्हाला कानडी तरुणांना रोजगारात प्राधान्य द्यावेच लागेल, नाहीतर गाशा गुंडाळा!'' देवेगौडांच्या या वक्तव्यावर ते प्रांतीय किंवा जातीय असल्याचा ठपका पडलेला नाही. छत्तीसगढचे मुख्यमंत्री डॉ. रमणसिंग यांनी तर 'एनटीपीसी'चे ऊर्जा प्रकल्पच रोखून ठेवले आहेत. त्यांची मागणी अशी आहे की, ''एनटीपीसी'ने छत्तीसगढ सरकारशी करार करून सांगावे की, या प्रकल्पातून निर्माण होणारे सर्व प्रकारचे रोजगार फक्त भूमिपुत्रांनाच मिळतील.'' रमणसिंगही प्रांतीय किंवा जातीय ठरलेले नाहीत. मात्र 'मराठी'च्या मुद्यांवर शिवसेनेला संकुचित किंवा जातीय ठरविण्याचा प्रयत्न होऊनही शिवसेनेने 'मराठी'चा ध्यास कधी सोडला नाही. कारण मराठी हाच शिवसेनेचा 'श्वास' आहे.
सर्व विरोध व दबाव झुगारून शिवसेनेने राष्ट्रपतीपदासाठी प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला तो 'मराठी' म्हणूनच ना? शरद पवार यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देण्याची भाषाही 'मराठी'च्याच भावनिक गुंतवणुकीतूनच केली जाते ना? गेल्या ४० वर्षांत शिवसेनेने मराठी भाषा, मराठी माणूस व मुंबईच्या रक्षणासाठी ज्या खस्ता खाल्ल्या त्याचे मोल कुणालाही करता येणार नाही। 'एअर इंडिया' असो की 'आरसीएफ' असो- भूमिपुत्रांना नोकऱ्यांत प्राधान्य मिळालेच पाहिजे यासाठी शिवसेनाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली विराट मोचेर् काढले व त्या आस्थापनांच्या अडेलतट्टू संचालकांना 'मराठी हिसका'ही दाखवला. त्यामुळेच आजही विमानतळांवर आणि हवेत झेपावलेल्या विमानांतही 'जय महाराष्ट्र'ने आपले आगतस्वागत होते. पंचतारांकित हॉटेलांपासून ते खासगी विमान कंपन्यांत, बँकांपासून मल्टीनॅशनल कंपन्यांत 'मराठी' टक्का राहावा यासाठी शिवसेनेने ४० वर्षांपूवीर् टाकलेली अस्मितेची ठिणगी आजही तशीच धगधगते आहे. प्रश्न रेल्वे नोकरभरतीचा असो नाहीतर मॉल्समधील भरतीचा, प्रश्न गिरणी कामगारांच्या थकीत देण्यांचा असो नाहीतर घरांचा, प्रश्न यूएलसी अॅक्ट रद्द करून मुंबई बिल्डरांना विकण्याचा असो की स्वतंत्र विदर्भाची भुताटकी गाडून महाराष्ट्र अखंड ठेवण्याचा, बेळगावातील मराठीजनांवर होणाऱ्या अन्यायाचा असो की महाराष्ट्रात येणाऱ्या 'सेझ'च्या बुलडोझरखाली चिरडणाऱ्या भूमिपुत्र मराठी किसानांच्या न्याय्य हक्कांचा; शिवसेनेने पहिले प्राधान्य दिले ते फक्त मराठी माणसांच्या हिताला.
मुंबईसारख्या शहरात आज इंग्रजीच्या आक्रमणाने नामवंत मराठी शाळा बंद पडत आहेत। त्यामुळे हजारो मराठी शिक्षकांवर बेकारीचेच संकट ओढवले. अशा वेळी हा प्रश्न शिवसेनेने उचलून धरला. उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातले. त्या सर्व मराठी शाळांना महापालिकेचे अनुदान देण्यास भाग पाडले व हजारो मराठी शिक्षकांच्या नोकऱ्या वाचविल्या. टॅक्सीवाल्या भय्यांना मारून संस्कृती रक्षणाचा आव आणणे सोपे आहे. पण हजारो मराठी तरुणांना रोजगार देणे व आहेत ते वाचविणे हे अवघड आहे. शिवसेना ते अवघड काम करीत आहे.
शिवसेनेने मराठी माणसाला मराठी म्हणून जगायला आणि लढायला शिकविले व हे कुणीही अमान्य करू शकणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुण्यात सुरेश कलमाडींंविरुद्ध जी मोहीम उघडली ती मराठी अस्मितेमुळेच. पुण्याचे नेतृत्व मराठी माणसाकडे हवे या त्यांच्या भूमिकेस पुणेकरांनी समर्थन दिले. ही मूळ भूमिका शिवसेनेचीच आहे. अमराठी माणसांना मारहाण करून मराठी माणसांचा विकास होणार नाही, अशा प्रकारचे परखड मत 'मनसे'प्रमुख राज ठाकरे यांनी अगदी अलीकडेच मांडले होते व त्याच्या नेमकी विरुद्ध भूमिका त्यांनी आता घेतल्याचे दिसते.
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे कुणी त्रिपाठी नामक व्यक्तीने आयोजित केलेल्या उत्तर प्रदेश दिन समारोहास हजर राहिले यावर टीका होते। पण त्याच समारोहात उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले की, ''परप्रांतीय म्हणून इकडे किती दिवस जगणार? उत्तर प्रदेश दिन इकडे साजरे करण्याची गरज नाही. महाराष्ट्र दिन साजरा करा.'' या त्यांच्या वक्तव्याकडे मात्र हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले गेले. शिवसेनेच्या बाबतीत हे सर्व पहिल्यापासून ठरवून केले जाते. मुंबईतल्या 'टॉवर्स'मध्ये मराठी माणसांना जागा मिळाल्याच पाहिजेत. नाहीतर टॉवर्सची एकही वीट रचून देणार नसल्याची भूमिका शिवसेनाप्रमुख या वयातही तळमळीने घेतात ती कोणासाठी? अर्थात मराठी माणसाचा कचखाऊपणा व वैगुण्य यावर बोट दाखविण्याची ही जागा नाही. पोटापाण्यासाठी दिलेली झुणका-भाकर केंदे स्वत: न चालवता ती 'परप्रांतीयां'ना देऊन महिन्यास फक्त भाडे घेणाऱ्या 'मराठी बाण्या'नेच महाराष्ट्राचे नुकसान केले. भय्याने हात-पाय पसरले म्हणून त्यातील काहीजणांचे हात-पाय तोडले जातील. पण भय्यांनी रिकाम्या केलेल्या इस्त्री, दूध, भेळपुरी, टॅक्सी व्यवसायांत मराठी तरुण उभा राहणार आहे काय? ज्या दिवशी तो असा उभा राहील त्या दिवशी त्याचे कल्याण होईल. त्या कल्याणाचा वसा शिवसेनेने घेतलाच आहे. तो सोडला कधी?
मराठी एक विषय म्हणून न शिकताही शालान्त परीक्षा उत्तीर्ण होता येते, ही महाराष्ट्रातील स्थिती आधी बदलायला हवी।
नरसिंहरावांना आंध्रात कुणी विचारीत नव्हते तेव्हा महाराष्ट्राने तीनवेळा लोकसभेत निवडून दिले। मात्र पंतप्रधान होताच लोकसभा निवडणूक लढवण्यास ते आंध्रात रवाना झाले व तेलगू अस्मितेसाठी तेलगू देसमने त्यांना बिनविरोध पाठिंबा देऊन निवडून दिले. म्हणजे महाराष्ट्राचा वापर दिल्लीच्या वाटेवरील 'पायपुसणे' म्हणून सगळ्यांनीच केला. आजही तो होतच आहे. शिवसेनेने त्यास कायम विरोध केला. '' मुसलमानांची धर्मांधता व दाक्षिणात्यांची जात्यंधता आपल्यात भिनवल्याशिवाय मराठी माणसाचा विकास होणार नाही.'' हे कडवट विचार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सातत्याने मांडत आहेत.
शिवसेना या विचारापासून तसूभरही ढळलेली नाही.
-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा