लोकशाही नागरी समाजव्यवस्थेत समर्थ राज्ययंत्रणेइतकाच समाजातील संवाद आवश्यक असतो. आदर्श संवाद घडवून आणायचा , तर त्यासाठी वक्ता व श्रोता यांनी आपापल्या भूमिका सातत्याने व परस्पर सामंजस्याने बदलत राहायला हव्यात. दुर्दैवाने हा समंजसपणा आटत राहिल्याने संवादाची मुळेच तुटली. समाजातील सौहार्द टिकवायचे व वाढवायचे तर या संवादाची पुर्नस्थापना होणे गरजेचे आहे. ' मन:पूर्वक ' मधून असाच संवाद घडवून आणण्याचा इरादा आहे. .............................................................................. महाराष्ट्र टाइम्स ' च्या सर्व चोखंदळ , सुबुद्ध व सव्यसाची वाचकांना ' मन:पूर्वक ' अभिनंदन. जेव्हा जेव्हा समाजाच्या मानसशास्त्राचा विचार होतो , तेव्हा समाजाच्या विविध घटकांतील वाढत्या तणावांचा उल्लेख केला जातो. समाजातील तणाव वाढत चालला आहे , हे खरेच. त्याला अनेक कारणे आहेत. बदलत्या समाजव्यवस्थेत समुदायांची संख्या वाढत चालली आणि त्यांची प्रकृतीही बदलत चालली. पण समुदाय वाढत असताना समुदायातील प्रत्येक माणूस एकटा व एकाकी होऊ लागला आहे. वाढत्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा व भौतिक सुखांची अथक हाव यामुळे समुदायातील माणूस त्या समुदायाचे हित पाहण्याऐवजी वैयक्तिक उत्कर्षाचाच विचार करू लागला व त्यामुळे एकटा पडू लागला. व्यक्ती आणि समुदायांतील तणाव वाढू लागले. त्यामुळे दंगली , हिंसाचार यात वाढ झालीच. परंतु सर्वात चिंताजनक बाब ही की , समाजातील परस्पर संवाद खुंटला. लोकशाही नागरी समाजव्यवस्थेत समर्थ राज्ययंत्रणेइतकाच समाजातील संवाद आवश्यक असतो. आदर्श संवाद घडवून आणायचा , तर त्यासाठी वक्ता व श्रोता यांनी आपापल्या भूमिका सातत्याने व परस्पर सामंजस्याने बदलत राहायला हव्यात. दुदैर्वाने हा समंजसपणा आटत राहिल्याने संवादाची मुळेच तुटली. समाजातील सौहार्द टिकवायचे व वाढवायचे तर या संवादाची पुर्नस्थापना होणे गरजेचे आहे. ' मन:पूर्वक ' मधून असाच संवाद घडवून आणण्याचा इरादा आहे।
चार दिवसांपूर्वीच आणखी एक महाराष्ट्र दिन साजरा झाला। दरवषीर्प्रमाणेच याही वषीर् ' मराठा तितुका मेळवावा , महाराष्ट्र धर्म वाढवावा ,' या व अशा निरर्थक प्रतिज्ञा व घोषणा करण्यात आल्या. महाराष्ट्र सरकारतफेर् शिवाजी महाराजांच्या गावागावांतील पुतळ्यांची साफसफाई झाली , त्यांच्यावर हार आले. झेंडावंदने , परेड , भगवे ध्वज नाचवीत व पटके उडवत शोभायात्रा हे सारे सोपस्कार पार पडले. त्यामुळे मराठी भाषिक समुदाय आनंदीत झाला.
प्रश्न हा आहे की , महाराष्ट्रातील मराठी समुदाय तरी ' समाज ' म्हणून एकोप्याने राहण्यास तयार आहे का ? या प्रश्नाचे उत्तर स्पष्टपणे नकारार्थी आहे. समुदाय म्हणून मराठी समाज जे धक्के खात आहे , त्याचे महत्त्वाचे कारण या समाजातील एकोप्याचा कमालीचा अभाव हेच आहे. ' व्यक्तिवादा ' वर विश्वास ठेवणारा मराठी समाज पोखरला गेला आहे. या समाजातील माणसे ' व्यक्ती ' म्हणून सक्षम व समर्थ आहेत. परंतु ती ' समुदाय ' म्हणून एकत्रित राहण्यास तयार नाहीत. त्यामुळे सारे एकांडे शिलेदार स्वतंत्रपणे लढण्यास सिद्ध झाले. अशा एकेकट्याच्या लढाया होतात , तेव्हा प्रत्येकाची ताकद व क्षमता थिटीच पडते आणि प्रत्येकजण स्वतंत्रपणे पराभूत ठरतो
मराठी समाजातील माणसे अशीच पराभूत होत राहिल्याचे इतिहासाचे दाखले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना अपशकुन व विरोध करणारे मराठे होतेच. पेशवाईत वितुष्ट आले , कारण मराठेशाहीच्या सरदारांनी आतून सुरूंग पेरले. १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात ब्रिटिश कंपनी सरकारला यश मिळाले , कारण या अस्तित्त्वाच्या अंतिम लढाईतही मराठी लढवय्ये एकत्र येऊ शकले नाहीत. स्वातंत्र्य चळवळीतही लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांच्यातील सहकार्यापेक्षा त्यांच्यातील वादच अधिक गाजले. या वादांतही त्यांच्या बुद्धीची चमक आणि जनहिताची तळमळ प्रदशिर्त होत होतीच. पण हा मराठी समाज जर ' समुदाय ' म्हणून एकत्र राहिला असता , तर इतिहासाच्या पानांवर वेगळाच मजकूर वाचायला मिळाला असता.
आजही चित्र वेगळे नाही। निदान महाराष्ट्रातील मराठी समाजाचे हित साधायचे , तर जीवनाच्या सर्व क्षेत्रातील मराठी नेत्यांनी एकत्र राहायला हवे। चित्र नेमके उलटे आहे. मराठी समाजाच्या हितासाठीच उभ्या ठाकलेल्या सांस्कृतिक , सामाजिक व राजकीय संघटना एकमेकांविरुद्ध उभ्या ठाकून अहमहमिकेने आपसातच लढताना दिसतात. त्याचा परिणाम एकच , समुच्च मराठी समाजाचा पराभव व पतन.
जेव्हा समुदायातील माणसे व्यक्ती म्हणून स्वत:चा उत्कर्ष करण्यास अधिक महत्त्व देतात , तेव्हा स्वकीय , स्वत:ची संस्कृती , स्वभाषा या सा-यांबद्दलचा अभिमान गळून पडू लागतो। ज्याचा स्वत:च्या अस्तित्वाबद्दलचा अभिमान नष्ट झाला. असा माणूस देशाचा अभिमान बाळगूनही त्यासाठी काही करू शकत नाही. मी माझ्या कुटुंबाबद्दल अभिमान बाळगणार नाही. पण देशाभिमानाची टिमकी वाजवत राहीन , असे कोणी म्हटले तर ती केवळ वायफळ बडबड ठरते.
ज्याला स्वत:च्या समाजाबद्दल अभिमान उरलेला नाही , अशांना स्वत:ची भाषासुद्धा ' परकी ' वाटू लागते व म्हणून नकोशी होती। अशांची मुळेच तुटलेली असतात. राज्यसभेच्या द्वैवाषिर्क निवडणुकांत निवडून आलेल्या नव्या सदस्यांचा शपथविधी नुकताच मोठा थाटामाटात पार पडला. आंध्र , आसामपासून पश्चिम बंगाल , केरळ , पंजाबपर्यंत वेगवेगळ्या राज्यांतील नवे खासदार शपथ घेत होते. वेगवेगळ्या समाजांचे सारे प्रतिनिधी , विविध भाषांमधून प्रत्येक जण शपथ घेत होता. उडिया , तेलगू , तामीळ , गुजराती , कन्नड , बंगाली , मल्याळम अशा विविध भाषांतून शपथ घेण्याचा कार्यक्रम चालू होता. राज्यसभेचे कामकाज साधारणत: हिंदी व इंग्रजीत चालत असले , तरी मातृभाषेत सवोर्च्च सभागृहाच्या सदस्यत्वाची शपथ घेत बहुतेक सर्व जण आपापल्या मातीशी असलेले नाते जाहीर करत होते. हे वातावरण हृद्य होते. काँग्रेसच्या जयंती नटराजन पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या. त्यांचे इंग्रजीवरील प्रभुत्व सारा देश दररोज अनुभवतो. पण त्यांनी शपथ मात्र मातृभाषेत तामीळमध्येच घेतली. भारतीय भाषा भगिनींचे असे सुंदर संमेलन भरले असताना महाराष्ट्रातील खासदारांनी मात्र वेगळा सूर लावलाच. महाराष्ट्रातून निवडून आलेल्या सातपैकी सहा सदस्यांनी हिंदी व इंग्रजीतून शपथ घेतली व आपले मराठी मातीशी काय नाते आहे त्याचे विदारक दर्शन घडवले. हिंदी व इंग्रजीतून शपथ घेणा-यांपैकी तीन सदस्यांची आडनावे मराठी आहेत. उरलेल्या तिघांनी ' महाराष्ट्र ' हे आपले राज्य असल्याचे जाहीर केले आहे. ज्यांना मराठीत शपथ घ्यायची लाज वाटते , ते या मराठी समाजाच्या हितसंबंधांचे राज्यसभेत कसे रक्षण करणार ?
हे आणि असे अनेक प्रश्न. सा-यांचा रोख अस्तित्वाच्या भवितव्याकडेच. मराठी समाज टिकवायचा आणि त्याचे भवितव्य उज्ज्वल करायचे , तर ' मऱ्हाटी तितुका मेळवावा ' हे ध्येय ठेवण्यास काय हरकत ? महाराष्ट्र दिन उलटल्यावर हा धडा अंमलात आणला तरी आणखी दोन वर्षांनी महाराष्ट्राचा ' सुवर्णमहोत्सव ' अर्थपूर्ण करता येईल.
-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा