सोमवार, २१ जुलै, २००८

देणार्याने देत जावे

देणार्याने देत जावे;

घेणार्याने घेत जावे।

हिरव्यापिवळ्या माळावरून

हिरवीपिवळी शाल घ्यावी,

सह्याद्रीच्या कड्याकडून

छातीसाठी ढाल घ्यावी।

वेड्यापिशा ढगाकडून

वेडेपिसे आकार घ्यावे;

रक्तामधल्या प्रश्नांसाठी

प्रुथ्वीकडून होकार घ्यावे।

उसळलेल्या दर्याकडून

पिसाळलेली आयाळ घ्यावी;

भरलेल्याश्या भीमेकडून

तुकोबाची माळ घ्यावी

देणार्याने देत जावे;

घेणार्याने घेत जावे;

घेता घेता एक दिवस

देणार्याचे हात घ्यावे !

- विंदा करंदीकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: